Ghibli स्टाईल इमेजनंतर आता Videos ने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ! असा करू शकता वापर
सध्या सर्वांच्या सोशल मीडियाची फीड Ghibli स्टाईल ईमेजने भरलेली आहे. चॅटजीपीटीसह आणि इतर टूल्स त्यांच्या युजर्सना Ghibli स्टाईल ईमेज तयार करण्यासाठी मदत करत आहेत. यामुळे सध्या Ghibli ईमेज ट्रेंडिंग टॉपिक बनला आहे. एका रात्रीच सोशल मीडियावर Ghibli ईमेजचा महापूर आला आहे. अगदी कोणतंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ओपन केलं की सर्वात आधी समोर येतात Ghibli स्टाईल फोटो. राजकारणी नेते, सेलिब्रिटी, कालाकारांपासून अगदी सर्वांनाच Ghibli ने वेड लावले आहे.
Free Fire MAX मध्ये सुरु झालाय नवीन ईव्हेंट, Fell the electricity ईमोटसह मिळतायत हे खास रिवॉर्ड्स
बहुतेक युजर्स Ghibli आर्ट स्टाईल सारख्या ईमेज मोफत तयार करत आहेत आणि त्या सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. Ghibli स्टाईल फोटोंनंतर आता Ghibli स्टाईल ईमेज देखील प्रचंड व्हायरल झाले आहेत. तुम्ही Ghibli स्टाईल फोटो व्हिडिओमध्ये रूपांतरित करू शकता. खरंतर, ओपनएआयच्या सोरा या टूलच्या मदतीने फोटो व्हिडिओमध्ये रूपांतरित करता येतात. तथापि, यासाठी तुम्हाला पेड सबस्क्रिप्शन खरेदी करावे लागेल. म्हणजेच हे टूल वापरण्यासाठी युजर्सकडे ChatGPT Plus किंवा ChatGPT Pro चे सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुमच्याकडे ChatGPT Plus किंवा ChatGPT Pro चे सबस्क्रिप्शन नसेल, तरीही तुम्ही Ghibli सारखे व्हिडिओ मोफत तयार करू शकता. घिबली ईमेज व्हिडिओमध्ये रूपांतरित करण्यासाठी, तुम्हाला एआय टूल वापरावे लागेल. यासाठी तुम्हाला काही सोपी प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.
असे केल्याने २० सेकंदांपर्यंतची क्लिप तयार होईल. तुम्ही ही क्लिप रील्ससाठी देखील वापरू शकता. अशा काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही Ghibli स्टाईल ईमेज तयार करू शकता.
ग्रोक AI आणि चॅटजीपीटीच्या मदतीने तुम्ही Ghibli सारख्या प्रतिमा मोफत तयार करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चॅटजीपीटी वेबसाईट ओपन करा आणि अकाऊंट लॉगिन करा. यानंतर फोटो अपलोड करा आणि Convert to Ghibli असा प्रॉम्प्ट द्या. यानंतर Ghibli ईमेज तयार होईल.
ग्रोक AI च्या मदतीने ईमेज तयार करण्यासाठी प्रथम X वर खात्यात लॉगिन करा. यानंतर, डाव्या बाजूला असलेल्या Grok आयकॉनवर क्लिक करा. तळाशी तुम्हाला अटॅचमेंट पर्याय दिसेल. फोटो जोडण्यासाठी त्यावर क्लिक करा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फोटो कॉपी आणि पेस्ट देखील करू शकता. प्रतिमा जोडल्यानंतर, तुम्हाला Convert to Ghibli लिहावे लागेल. असे केल्याने घिबली सारखी प्रतिमा तयार होईल.