Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: किती वर्षांनी बदलावा WiFi Router? उशीर केल्यास इंटरनेट स्पीडवर होतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

स्मार्टफोन वारण्यापासून टिव्ही चालू करण्यापर्यंत इंटरनेटची सर्वांसाठी गरज असते. यासाठी अनेक लोकं घरात वायफायचा वापर करतात. पण वायफाय राऊटर किती वर्षांनी बदलावा याबाबत अनेकांना माहिती नसतं.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2026 | 07:10 AM
Tech Tips: किती वर्षांनी बदलावा WiFi Router? उशीर केल्यास इंटरनेट स्पीडवर होतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

Tech Tips: किती वर्षांनी बदलावा WiFi Router? उशीर केल्यास इंटरनेट स्पीडवर होतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • इंटरनेट स्पीड कमी का होते? तुमचा WiFi Router तर जुना नाही ना?
  • घरातील WiFi स्लो झालाय? Router बदलण्याची वेळ आली आहे का ते जाणून घ्या
  • किती वर्षांनी घ्यावा नवा WiFi Router? नाहीतर कनेक्टिव्हिटीवर होईल परिणाम
अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबत स्मार्टफोन आणि इंटरनेट या देखील आपल्या मुलभूत गरजा बनल्या आहेत. सध्याच्या डिजीटील काळात स्मार्टफोन आणि इंटरनेटपासून दूर राहणं म्हणजे संपूर्ण जगापासून दूर राहण्यासारखं आहे. कारण स्मार्टफोन रोजच्या जीवनात आपली अनेक कामं चुटकीसरशी पूर्ण करतो. याशिवाय वेगवान इंटरनेट देखील प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा असतो. ऑनलाइन क्लास असो, ऑफीसची काम असो नाहीतर ओटीटीवर चित्रपट पाहणं असो, सर्व कामांसाठी इंटरनेट आवश्यक असतो. या सर्व कामांसाठी मोबाईलचा इंटरनेट वापरण्यापेक्षा वायफायचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरतं. कारण वायफायची इंटरनेट स्पीड अतिशय वेगवान असते.

Free Fire Max: गेममध्ये प्रो प्लेअर बनायचं? असा मारा परफेक्ट हेडशॉट आणि जिंका प्रत्येक मॅच

वायफाय राऊटर जुना झाला आहे का?

अनेकदा असं होतं की, तुम्ही वायफाय इंटरनेटचा चांगला प्लॅन खरेदी केला असेल मात्र तरी देखील इंटरनेटची स्पीड स्लो झाली असेल, तर यामागे एक मोठं कारण असू शकतं. जर तुमचा वायफाय राऊटर जास्त जुना झाला असेल तर इंटरनेट स्पीड स्लो होऊ शकते. सहसा वायफाय राऊटरचे आयुष्य 3 ते 5 वर्षांचे असते. यानंतर तुमच्या वायफाय इंटरनेटची स्पीड स्लो होते. वायफाय राऊटर बदलण्याची योग्य वेळ म्हणजे राऊटर खरेदी केल्यानंतर 4 ते 5 वर्षांचा कालावधी.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

वायफाय राऊटरच्या हार्डवेअरवर परिणाम

काळानुसार वायफाय राऊटरच्या हार्डवेअरवर परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय, जुने वायफाय राऊटर नव्या तंत्रज्ञानाला देखील सपोर्ट करत नाही. जसे वायफाय 5 किंवा वायफाय 6. जर तुम्ही जास्त डिव्हाईस कनेक्ट केले असतील तर तुमच्या जुन्या वायफाय राऊटरची क्षमता कमी होते आणि इंटरनेट स्लो होते. याशिवाय डिव्हाईस गरम होऊ लागते आणि त्याच्या परफॉर्मंसवर देखील परिणाम होतो.

वायफाय राऊटर बदलण्याची योग्य वेळ

जर तुम्हाला असं वाटत असेल की इंटरनेटची स्पीड वारंवार कमी होत आहे आणि व्हिडीओ बफरिंग जास्त होत आहे किंवा घराच्या कोपऱ्यांमध्ये सिग्नल पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत, याचा अर्थ तुमता वायफाय राऊटर बदलण्याची वेळ आली आहे. तसेच जर वायफाय राऊटर वारंवार रिस्टार्ट करावा लागत असेल तर हे संकेत आहेत की आता तुम्हाला तुमच्या घरातील वायफाय राऊटर बदलावा लागणार आहे.

POCO X8 Pro vs OnePlus Nord 5: कॅमेऱ्यापासून बॅटरीपर्यंत… 32 हजारांच्या रेंजमध्ये कोण आहे खरा किंग? खरेदीपूर्वी ही तुलना वाचा

नवीन राऊटर खरेदी काय लक्षात ठेवाल?

नवीन राऊटर खरेदी करताना तुम्हाला लेटेस्ट टेक्नोलॉजीवर लक्ष द्यावे लागणार आहे. WiFi 5 किंवा WiFi 6 सपोर्ट असणारे राऊटर अधिक चांगली स्पीड आणि कवरेज ऑफर करतात. ड्यूल-बँड किंवा ट्राई-बँड राउटर जास्त डिव्हाईस कनेक्टिव्हिटी संभाळण्यासाठी सक्षम असतात. तसेच तुम्हाला तुमच्या घराच्या हिशोबाने आणि वापरानुसार वायफाय राऊटर खरेदी करावे लागणार आहे. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कोपऱ्यात चांगली नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

Web Title: After how many years wifi router have to change otherwise it will affect on internet speed tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 07:10 AM

Topics:  

  • internet
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
2

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
3

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
4

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.