ऑपरेशन सिंदूरच्या यशामागे ‘हळदी घाटी’चा हात, काय होती सैन्याची जबरदस्त योजना
6 मे 2025 हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीला जाणार आहे. कारण या दिवशी भारताने पाकिस्तानाचे 9 दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत. 6 मे रोजी रात्री भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या काश्मिरमधील दहशतवादी स्थळं उध्वस्त केली. हा हल्ला 9 दहशतवादी ठिकाणांवर करण्यात आला आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू कश्मीरच्या पहलगाम भागात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करत 26 पर्यटकांची हत्या केली. यामुळे संपूर्ण भारतात संतापाची लाट आली. या हल्ल्यात ज्या पर्यटकांचा जीव गेला त्यांना न्याय मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानातील पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. शिवाय पाकिस्तानातला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असं आश्वासन देखील त्यांनी देशवासीयांना दिलं. (फोटो सौजन्य – X)
पहलगाम हल्ल्यानंतर ठिक 15 दिवसांनी भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान अधिकृत कश्मीर (POK) मध्ये हल्ला केला. या हल्ल्याला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं. भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर अनेक नेत्यांच्या सध्या प्रतिक्रिया येत आहेत. पण या ऑपरेशन सिंदूरनंतर सोशल मीडियावर देखील पोस्ट्सचा पूर आला आहे. प्रत्येक भारतीय ऑपरेशन सिंदूरवर त्याची प्रतिक्रिया देत आहे. सोशल मीडियावर शेअर केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये भारतीय सैन्याचं कौतुक केलं जात आहे. सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर ऑपरेशन सिंदूरसंबंधित अनेक विषय आणि हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहेत. यातील काही टॉप हॅशटॅग्सबद्दल जाणून घेऊया.
Wishing Our Forces Safety and Success. Blessings. -Sg #OperationSindoor pic.twitter.com/wwx0OXwRtz
— Sadhguru (@SadhguruJV) May 6, 2025
Justice for Served.
Never underestimate the Indian Army Power.🇮🇳
Jai Hind.#PahalgamTerrorAttack#OperationSindoor pic.twitter.com/16spVDu3RR
— _yashoo_p_rjn (@Antriksha_Das) May 7, 2025
Ministry of Defence, Government of India: India has launched #OperationSindoor, a precise and restrained response to the barbaric #PahalgamTerrorAttack that claimed 26 lives, including one Nepali citizen. Focused strikes were carried out on nine #terrorist infrastructure sites in… pic.twitter.com/sCGgvxJDPy
— Rahul Shivshankar (@RShivshankar) May 6, 2025
Justice is Served.
Jai Hind! pic.twitter.com/Aruatj6OfA
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) May 6, 2025
जय हिंद..#OperationSindoor #IndiaStrikesBack #JusticeForPahalgam pic.twitter.com/aABOiHvYh2
— Pankaj Srivastava (@tweetbypk) May 7, 2025
Jai Hind! #JusticeForPahalgam
India Destroys 9 terror camps in Pakistan and POK pic.twitter.com/NTFvzA0vLj— Sakshi Batra (@sakshibatra18) May 7, 2025
They thought India will attack after black-out mock drill.
😂
But
India carried out “operation sindoor” a night before mock drill.Actual masterstroke of Indian Army and Modi Government.
#IndiaPakistanWar #JusticeForPahalgam pic.twitter.com/dBBsGvIDxj— vyas laxminarayana(lakhan vyas)🚩 (@BJP__Vyas) May 7, 2025
#PahalgamTerrorAttack: 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम निष्पाप पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. याच हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवले. या हॅशटॅग अंतर्गत लोक पाकिस्तानने पहलगाम येथे केलेल्या हल्ल्याचा निषेध करत आहेत आणि दहशतवादाविरुद्ध एकता दाखवत आहेत.
#JusticeForPahalgam: या हॅशटॅगद्वारे लोक पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप लोकांना न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत. त्यामुळे हा हॅशटॅग देखील सध्या ट्रेंड करत आहे.
#OperationSindoor: भारताच्या या कारवाईबाबत लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण याला दहशतवादाविरुद्ध एक कठोर पाऊल मानत आहेत, तर काही जण ते युद्धाच्या दिशेने एक पाऊल मानत आहेत.
भारतीय सैन्याने X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, ‘Justice is Served’ आणि #PahalgamTerrorAttack हॅशटॅगचा वापर केला आहे. यावरून हे स्पष्ट होते की भारतीय लष्कर या कारवाईला दहशतवादाविरुद्धची प्रत्युत्तराची कारवाई म्हणून पाहते.