AI परिवर्तनामुळे 2028 पर्यंत 2.73 मिलीयन टेक रोजगार निर्माण होणार; सर्विसनाऊ एआय स्किल्स अँड जॉब्स रिपोर्ट
AI प्लॅटफॉर्म सर्विसनाऊने AI परिवर्तनासाठी संशोधन केलं. या संशोधनाच्या मते AI तंत्रज्ञान भारतातील प्रमुख विकास क्षेत्रांमधील टॅलेंटमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणेल. 2028 पर्यंत 2.73 मिलीयन नवीन टेक रोजगार निर्माण होतील. जगातील झपाट्याने विकसित होत असलेल्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक भारत देश आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या 2023 मधील 423.73 दशलक्षवरून 2028 पर्यंत 457.62 दशलक्षपर्यंत वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ज्यामध्ये 33.89 दशलक्ष कर्मचाऱ्यांची भर होण्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा- Google आणि Microsoft ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच होणार नवं सर्च इंजिन, या कंपन्यांची घोषणा
जगातील आघाडीची लर्निंग कंपनी पीअरसनने केलेल्या संशोधनामधून निदर्शनास आलं की, रिटेल क्षेत्र रोजगार वाढीचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे, जेथे त्यांच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त 6.96 दशलक्ष कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. ही वाढ रिटेल व्यावसायिकांना सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन डेव्हलपमेंट आणि डेटा इंजिनीअरिंग अशा क्षेत्रांमध्ये अपस्किल करण्याची बहुमूल्य संधी देते. या क्षेत्रानंतर उत्पादन (1.50 दशलक्ष रोजगार), शिक्षण (0.84 दशलक्ष रोजगार) आणि आरोग्यसेवा (0.80 दलशक्ष रोजगार) यांचा क्रमांक येतो, ज्यांना अपेक्षित आर्थिक वाढ आणि टेक परिवर्तनाचे पाठबळ मिळाले आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
सर्विसनाऊ इंडिया टेक्नॉलॉजी अँड बिझनेस सेंटरचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुमीत माथूर म्हणाले, “AI भारतात रोजगार निर्मितीसाठी, विशेषत: प्रगत टेक्निकल कौशल्यांमध्ये आवश्यक असलेली पदे निर्माण करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. या धोरणात्मक पुढाकारामुळे व्यावसायिकांसाठी अधिक महत्त्वपूर्ण संधी निर्माण होईल. ‘राइजअप विथ सर्विसनाऊ’ सारखे उपक्रम आणि स्थानिक युनिव्हर्सिटीज व सरकारी उपक्रम कौशल्य वाढीसाठी उपयुक्त ठरणार आहेत. भारतातील टॅलेंट आणि कौशल्यामुळे भारत जागतिक टेक अर्थव्यवस्थेमध्ये लीडर राहिल.
हेदेखील वाचा- Amazon कर्मचाऱ्यांचा डेटा लिक; ईमेल, फोन नंबर सारखी माहिती हॅकर्सच्या हाती
उद्योगांमध्ये टेक-संबंधित रोजगार वाढत आहे, जेथे क्षेत्रांमधील प्रोफेशनल, सायण्टिफिक व टेक्निकल सर्विसेस, मॅन्युफॅक्चुरिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स विस्तारीकरणासाठी सज्ज आहेत. या ट्रेण्डमध्ये अग्रस्थानी असलेल्या सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन डेव्हलपर्समध्ये 109,700 पदांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. इतर उल्लेखनीय पदांमध्ये सिस्टम्स सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आणि डेटा इंजिनीअर्स यांचा समावेश आहे. तसेच, डेटा इंटीग्रेशन स्पेशालिस्ट्स, डेटाबेस आर्किटेक्ट्स, डेटा सायण्टिस्ट्स आणि कम्प्युटर अँड इम्फर्मेशन सिस्टम्स मॅनेजर्स अशा पदांमध्ये 42,700 ते 43,300 पदांपर्यंत वाढ दिसण्याची अपेक्षा आहे. ऊर्जा, सरकारी सेवा व युटिलिटीज अशा उद्योगांमध्ये देखील AI तंत्रज्ञानाचा प्रभाव दिसून येईल.
AI तंत्रज्ञानाचा प्रभाव मुख्य टेक पदांना कशाप्रकारे वेगवेगळे करतो याचा शोध घेण्यासाठी टास्क पातळीवर या पदांचे मूल्यांकन करण्यात आले. यापैकी सिस्टम्स अॅडमिनिस्ट्रेटर्स पदामध्ये मोठा बदल दिसून येईल. AI सिस्टम्स इंजीनिअर्सला देखील जेन एआयमधून मोठा फायदा होईल, जेथे या पदावरील एकूणपैकी अर्धा टेक प्रभाव प्रत्यक्ष AI तंत्रज्ञानांमधून येतो. तसेच, इम्प्लीमेन्टेशन कन्सल्टण्ट्सला जनरेटिव्ह AI च्या एकीकरणामधून मोठा फायदा मिळेल. कमी प्रभावित पद प्लॅटफॉर्म ओनर्स देखील दर आठवड्याला जवळपास अर्धा तासाची बचत करू शकतील. उदयोन्मुख तंत्रज्ञान टेक इकोसिस्टम्मधील पदांमध्ये क्रांती घडवून आणतील, ज्यामुळे व्यावसायिक अधिक स्मार्टपणे व जलदपणे काम करण्यास सक्षम होतील.
सुमीत माथूर पुढे म्हणाले, “सर्विसनाऊ जेन AI च्या अंमलबजावणीच्या पहिल्या 120 दिवसांमध्ये आम्ही किमान टेक्निकल प्रयत्नासह 5 दशलक्ष डॉलर्सहून अधिक वार्षिक खर्च टेकआऊट आणि सर्विसनाऊमधील उत्पादकतेमध्ये 4 दशलक्ष डॉलर्सहून अधिक वार्षिक खर्च टेकआऊट संपादित केले आहे. आज, सर्विसनाऊच्या एकूण एआय मूल्यापैकी 30 टक्के मूल्य नाऊ असिस्टमधून प्राप्त होते. आम्हाला साप्ताहिक उत्पादकता तासांमध्ये 10 टक्के वाढ आणि कोड स्वीकृती दरामध्ये 48 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तसेच, आम्हाला कर्मचारी सेवांसह मोठा प्रभाव निदर्शनास आला आहे, जेथे आम्ही फक्त सर्चमध्ये 62 हजार तासांची बचत केली आहे आणि कर्मचारी डिफ्लेक्शन दरामध्ये 14 टक्के वाढ केली आहे.”
‘राइजअप विथ सर्विसनाऊ’ प्रोग्राम जागतिक उपक्रम आहे, जो तरूण इंजीनिअर्सना व्यावहारिक, रोजगार-सुसज्ज कौशल्यांसह सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करतो. या उपक्रमाचा 2024 पर्यंत जगभरातील उच्च मागणी असलेल्या डिजिटल क्षमतांमध्ये एक लाख व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचा मनसुबा आहे. 97,695 भारतीयांनी गेल्या 12 महिन्यांमध्ये कंपनीच्या एआय प्लॅटफॉर्मवर कौशल्ये अवगत केली आहेत. सर्विसनाऊने 16 राज्यांमधील 20 युनिव्हर्सिटीजसोबत सहयोग करत, तसेच सरकारी संस्था फ्यूचरस्किल्स प्राइम बाय नॅसकॉम आणि एआयसीटीई यांच्यासोबत भागीदारी करत आपला युनिव्हर्सिटी अकॅडेमिक प्रोग्राम देखील लाँच केला आहे. या प्रयत्नांच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे.