Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?

सोशल मीडियावर फॅशन, मेकअप आणि प्रॉडक्ट प्रमोशन करणाऱ्या अनेक इन्फ्लुएंसर्सना आता AI ची टक्कर मिळत आहे. AI द्वारे तयार करण्यात आलेले व्हर्च्युअल इन्फ्लुएंसर्स 24 तास काम करू शकतात, लाखो लोकांशी संवाद साधू शकतात आणि मोठ्या ब्रँड्सची पहिली पसंती बनत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 26, 2026 | 11:23 AM
AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?

Follow Us
Follow Us:
  • AI इन्फ्लुएंसर्स सोशल मीडियावर वेगाने लोकप्रिय होत असून 2027 पर्यंत भारतातील इन्फ्लुएंसर मार्केटमधील 25-35% हिस्सा मिळवू शकतात.
  • लेन्सकार्ट, मिंत्रा आणि अजिओ सारखे मोठे ब्रँड AI इन्फ्लुएंसर्सच्या माध्यमातून मार्केटिंगचे नवे प्रयोग करत आहेत.
  • कायरा, नैना अवतर, राधिका, लिल मिकेला आणि लू डो मगलु यांसारख्या AI इन्फ्लुएंसर्सनी लाखो फॉलोअर्स मिळवत ब्रँड प्रमोशनमध्ये आपली छाप पाडली आहे.
सोशल मीडियावर तुम्ही विविध इन्फ्लुएंसर्सना फॉलो करता. काही जण स्वतःच्या पेजसाठी काम करतात तर काहीजण वेगवेगळ्या ब्रँडचे प्रमोशन करत असतात. सोशल मीडियावर लाखो इन्फ्लुएंसर्स वेगळेवेगळे व्हिडिओ अपलोड करत असतात. पण आता या इन्फ्लुएंसर्सना टक्कर द्यायला AI स्टार्स आले आहेत. सोशल मीडियावर फॅशन टिप्स देणारे, मेकअप शिकवणारे किंवा एखादे प्रॉडक्ट विकणारे जे चेहरे तुम्ही पाहता त्यापैकी बहुतेक चेहरे आता एआय जनरेटेड असणार आहे. हे AI द्वारे तयार करण्यात आलेले वर्चुअल कॅरेक्टर्स असतील जे 24 तास काम करू शकतात आणि एकाच वेळी लाखो लोकांसोबत संवाद देखील साधू शकतात. याला AI इन्फ्लुएंसर्स म्हटले जात आहे.

WhatsApp Update: व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार! iPhone यूजर्सना मिळणार नवं अपडेट, आता iMessage सारखा असणार चॅटचा लूक

समोर आलेल्या एका रिपोर्ट नुसार, 2027 पर्यंत भारतात AI इन्फ्लुएंसर्स मानवी इन्फ्लुएंसर्सच्या बजेटचा 25 ते 35% भाग मिळवू शकतात. एआय इन्फ्लुएंसर्स तयार करण्यासाठी 2022 मध्ये तब्बल 3.6 करोड रुपयांचा खर्च येत होता. मात्र आता हे AI इन्फ्लुएंसर्स तयार करण्यासाठी केवळ 26 लाख रुपये खर्च केला जाऊ शकतो. भारतात हा ट्रेंड बऱ्याच प्रमाणात वाढला आहे. याचे कारण म्हणजे कायरा, माया आणि राधिका सुब्रह्मण्य सारख्या AI कॅरेक्टर्सने लाखों फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. तसेच अनेक ब्रँड्स देखील यांच्यासोबत काम करतात. ज्यामध्ये लेन्सकार्ट, मिंत्रा आणि अजिओ सारख्या ब्रँडचा समावेश असल्याची सांगितले जात आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

लेंसकार्टने बनवलेले AI-बेस्ड कोरियन पॉप बँड

भारतात कोरियन पॉप (K-pop) ची लोकप्रियता पाहता, लेंसकार्टने ‘Astro Iris’ नावाने AI K-pop बँड तयार केले आहे. यामध्ये चार डिजिटल मेंबर्स आहेत. प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. कंपनीने मिडजर्नी आणि रनवे सारख्या AI टूल्सचा वापर करून त्यांचे व्हिडिओ बनवले आहेत.

मिंत्रामधील AI इन्फ्लुएंसर स्टाइलिस्ट

मिंत्राने माया नावाने एक वर्चुअल फॅशन इन्फ्लुएंसर बनवली आहे. ती 6000 हून जास्त ब्रँड्सचे प्रॉडक्ट सुचवते. तसेच ती 21 लाखांहून अधिक फॅशन कॉम्बिनेशनवर सल्ला देखील देऊ शकते.

जगातील आणि भारतातील AI इन्फ्लुएंसर्स

कायरा: शार्क टँकमध्ये दिसली इन्फ्लुएंसर

या AI इन्फ्लुएंसरला भारतातील पहिली प्रसिद्ध AI इन्फ्लुएंसर मानले जात आहे. तीने नायका, प्युमा, बोट, रिअलमी आणि ॲमेझॉनसारख्या ब्रँड्ससोबत काम देखील केले आहे. तसेच ती शार्क टँक इंडियामध्ये देखील दिसली होती. इंस्टाग्रामवर तिचे 2.3 लाख फॉलोअर्स आहेत.

नैना अवतार : भारताची पहिली AI सुपरस्टार

या डिजिटल कॅरेक्टरने ओप्पो आणि कोटक महिंद्रा बँक सारख्या ब्रँड्ससाठी अनेक कॅम्पेन चालवले आहेत. ती फॅशन आणि लाईफस्टाइल संबंधित व्हिडिओ बनवते इंस्टाग्रामवर तिचे 3.7 लाख फॉलोवर्स आहेत.

राधिका: ट्रॅव्हल व्हिडीओ

ही भारताची पहिली मल्टीलिंगुअल AI इन्फ्लुएंसर आहे, जी ट्रॅव्हल्स संबंधित व्हिडिओ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिने कॅम्पस फुटवेअर आणि सुपर यू सारख्या ब्रँडसोबत देखील काम केले आहे. ती तमिळपासून इंग्लिशपर्यंत सर्व भाषा बोलू शकते.

सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट… काय आहे नवीन नियम? वाचा सविस्तर

Lil Miquela: प्राडा आणि सॅमसंगचा चेहरा

या AI इन्फ्लुएंसरने प्राडा, बीएमडब्ल्यू आणि सॅमसंग सारख्या ग्लोबल ब्रँड्स सोबत देखील काम केले आहे. इंस्टाग्रामवर तिचे 22 लाख फॉलोवर्स आहेत.

Lu do Magalu: 93 लाख फॉलोअर्स

ही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या वर्चुअल इन्फ्लुएंसर्सपैकी एक आहे. इंस्टाग्रामवर तिचे 93 लाख फॉलोवर्स आहेत. तिने सॅमसंग आणि आदिदास संख्या मोठ्या ब्रँड्ससाठी कॅम्पिंग चालवले आहेत.

Web Title: Ai influencers are changing social media marketing in india kyra maya radhika and more

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • AI technology
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

WhatsApp Update: व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार! iPhone यूजर्सना मिळणार नवं अपडेट, आता iMessage सारखा असणार चॅटचा लूक
1

WhatsApp Update: व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार! iPhone यूजर्सना मिळणार नवं अपडेट, आता iMessage सारखा असणार चॅटचा लूक

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?
2

Jio VS Airtel: जिओचा 999 रुपयांचा प्लॅन की एअरटेलचा 899 रुपयांचा प्लॅन? डेटा आणि आणि ओटीटी फायद्यांमध्ये कोण आहे भारी?

सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट… काय आहे नवीन नियम? वाचा सविस्तर
3

सावधान! लपून-छपून लोकांचे व्हिडीओ बनवताय? डिलीट होऊ शकतं तुमचं Instagram अकाऊंट… काय आहे नवीन नियम? वाचा सविस्तर

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त घरबसल्या करा भन्नाट फोटोशूट! Google Gemini च्या व्हायरल प्रॉम्प्ट्सची सर्वत्र चर्चा
4

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त घरबसल्या करा भन्नाट फोटोशूट! Google Gemini च्या व्हायरल प्रॉम्प्ट्सची सर्वत्र चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.