Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुर्ल्यातील १३ मजली इमारतीला भीषण आग; ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी, इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने घेतला पेट

मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात मंगळवारी पहाटे १३ मजली इमारतीला भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने पेट घेतल्यानंतर संपूर्ण इमारतीत धूर पसरला. या घटनेत ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी झाले. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणली; मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 20, 2026 | 03:26 PM
कुर्ल्यातील १३ मजली इमारतीला भीषण आग; ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी, इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने घेतला पेट

कुर्ल्यातील १३ मजली इमारतीला भीषण आग; ५ वर्षांच्या चिमुकल्यासह ९ जण जखमी, इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने घेतला पेट

Follow Us
Follow Us:
  • कुर्ल्यात १३ मजली इमारतीला आग
  • ५ वर्षांच्या बालकासह ९ जण जखमी
  • धुरामुळे ८ जणांना श्वसनाचा त्रास

मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिम भागात मंगळवारी पहाटे भीषण आगीची घटना घडली. येथील कोहिनूर HDIL इमारत क्रमांक ५ मधील इलेक्ट्रिक डक्टच्या वायरिंगला अचानक आग लागली. ही इमारत तळमजला अधिक १२ मजल्यांची असून, आगीमुळे संपूर्ण इमारतीत धूर पसरला. या घटनेत पाच वर्षांच्या बालकासह एकूण नऊ जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं.

इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगने घेतला पेट

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती देण्यात आली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान, मुंबई पोलीस, महावितरणचे कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. इमारतीतील इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगला आग लागल्याने ज्वाळा आणि धुराचा प्रचंड फैलाव झाला. आगीची तीव्रता वाढल्याने विविध मजल्यांवरील लोखंडी दरवाजांचंही नुकसान झालं. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत सकाळी ७ वाजून २१ मिनिटांच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवलं.

धुरामुळे आठ जणांना श्वसनाचा त्रास

आगीमुळे इमारतीत मोठ्या प्रमाणात धूर साचला होता. या धुरामुळे आठ जणांना श्वसनाचा त्रास झाला, तर एका व्यक्तीच्या उजव्या पायाला दुखापत झाली. जखमींमध्ये पाच वर्षांचा मोहम्मद शेख, दोन अल्पवयीन मुली आणि ६५ वर्षांच्या वृद्धाचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे.

हेही वाचा: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

या घटनेतील जखमींमध्ये ईशान अहमद (३०), फरिना बोनो (२७), एजाज अहमद (६५), फरीन शेख (१८), नायदा शेख (१४), कलिमा सहा (४५), अलिना शेख (१७) आणि जाहेद अली शेख (५५) यांचा समावेश आहे. जाहेद अली शेख यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. नवव्या जखमीमध्ये पाच वर्षांच्या मोहम्मद शेखचा समावेश आहे. दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. इलेक्ट्रिक डक्टमधील वायरिंगला आग कशी लागली, याचा तपास पोलीस आणि अग्निशमन दलाकडून केला जात आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कुर्ल्यात आग कुठे लागली?

    Ans: मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील कोहिनूर HDIL इमारत क्रमांक ५ मध्ये आग लागली.

  • Que: आग कशामुळे लागली?

    Ans: इमारतीतील इलेक्ट्रिक डक्टच्या वायरिंगला आग लागल्याची माहिती आहे. मात्र, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

  • Que: जखमींना कुठे उपचारासाठी दाखल करण्यात आलं?

    Ans: सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

Web Title: Kurla kohinoor hdil building fire 9 injured sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Electric
  • Fire
  • Fire News
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबई महापालिकेचा कारभार होणार डिजिटल! ‘ई-ऑफिस’ प्रणाली लागू; १४ हजार कर्मचाऱ्यांचा टप्प्याटप्प्याने समावेश
1

मुंबई महापालिकेचा कारभार होणार डिजिटल! ‘ई-ऑफिस’ प्रणाली लागू; १४ हजार कर्मचाऱ्यांचा टप्प्याटप्प्याने समावेश

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा
2

टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबारासाठी वापरलेली बाईक २५ हजारांना खरेदी; नवरात्रीमुळे कागदपत्रं रखडली, तपासात मोठा खुलासा

गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! १५ लाखांत मिळणार तयार घरं; सरकारचा नवा निर्णय, कुठे मिळणार फ्लॅट?
3

गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी! १५ लाखांत मिळणार तयार घरं; सरकारचा नवा निर्णय, कुठे मिळणार फ्लॅट?

Mumbai News: मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! चहा, कॉफीच्या विक्रीला बंदी, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्टोअरवर मिळणार
4

Mumbai News: मध्य रेल्वेच्या १५ स्थानकांवर किराणा स्टोअर! चहा, कॉफीच्या विक्रीला बंदी, दैनंदिन गरजेच्या वस्तू स्टोअरवर मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.