वाढत्या प्रदूषण आणि धुक्यापासून एअर प्युरिफायर करेल तुमचं संरक्षण, खरेदी करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरातील प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. दिल्ली प्रदूषण आणि धुक्याच्या विळख्यात अडकली आहे. अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वास घेणं देखील कठिण होत आहे. अशा परिस्थितीत आपण आपली स्वत:ची सुरक्षा करणं, फार महत्त्वाचं आहे. तुमचं आणि तुमच्या कुटूंबाचं प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही एअर प्युरिफायरचा वापर करू शकता. पण आपल्या घरासाठी एअर प्युरिफायर खरेदी करण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे.
हेदेखील वाचा- iOS 18.2 Update: बॅटरी हेल्थ ट्रॅक करण्यासाठी iPhone युजर्सना मिळणार नवीन फीचर, कधी होणार रिलीज?
प्रदूषणापासून सुटका मिळवण्यासाठी एअर प्युरिफायर हा तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. एअर प्युरिफायर धूळ, धूर, धुके, बॅक्टेरिया यांसारख्या हानिकारक गोष्टी फिल्टर करते आणि मोठ्या प्रमाणात शुद्ध हवा देते. बाजारात विविध श्रेणींमध्ये एअर प्युरिफायर उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 8000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. नवीन एअर प्युरिफायर खरेदी करण्यापूर्वी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण अत्यंत गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- Laptop Tips: लॅपटॉपच्या बॅटरी लाईफ समस्येने हैराण झालात? या टीप्स करतील मदत
एनर्जी स्टार रेटिंगबद्दल देखील जाणून घ्या. 35 डेसिबल असलेले एअर प्युरिफायर खरेदी करा, यापेक्षा जास्त आवाज असलेला प्युरिफायर रात्रीच्या झोपेवर परिणाम करू शकतो.
एअर प्युरिफायर खरेदी करताना सर्वात सामान्य चूक म्हणजे बहुतेक लोक सर्टिफिकेशन तपासत नाहीत. दोन सर्टिफिकेशनसह एअर प्युरिफायर प्रामुख्याने भारतात उपलब्ध आहेत, ज्यामध्ये AHAM (अमेरिकन) आणि चीन सर्टिफिकेशन यांचा समावेश आहे. जर या सर्टिफिकेशनसह एअर प्युरिफायर असेल तर तुम्ही ते खरेदी करू शकता. नसल्यास खरेदी करणे टाळावे. कारण AHAM (अमेरिकन) आणि चीन सर्टिफिकेशन असलेले एअर प्युरिफायर तुम्हाला अधिक चांगला अनुभव देऊ शकतात.
प्युरिफायर किती प्रभावीपणे काम करेल, हे त्या प्युरिफायरमध्ये कोणते फिल्टर आहे यावर ते अवलंबून आहे. फिल्टरचे अनेक प्रकार आहेत ज्यांची वेगवेगळी कामं असतात. सर्वात सामान्य फिल्टर HEPA (हाय एफिशिएंसी पार्टिक्यूलेट एयर) आहे. हे 99.9% पर्यंत हवा स्वच्छ करू शकते.
काही लोकप्रिय AHAM व्हेरिफाईड ब्रँड आहेत ज्यांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. यामध्ये ब्लूएअर, बॉश, इलेक्ट्रोलक्स, हनीवेल, एलजी, फिलिप्स, शार्प, व्हर्लपूल यांचा समावेश आहे. तथापि, खरेदी करण्यापूर्वी या ब्रँडबद्दल आणि फिल्टर प्रकाराबद्दल जाणून घेणं गरजेचं आहे. कारण त्यांची काही मॉडेल्स रेट नसलेली आणि खराब फिल्टर असलेली असू शकतात.






