मुंबई : भारतातील सर्वात विश्वासू आणि मोठा इलेक्ट्रॉनिक ब्रँड असणाऱ्या सॅमसंगने (Samsung) आज त्याची पॉवर पॅक्ड इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) सक्षम एअर प्युरिफायरची (Air Purifier) नवीनतम श्रेणी लाँच केल्याची घोषणा केली आहे. जे कोणत्याही वातावरण किंवा खोलीतील हवेच्या परिस्थितीत शुद्ध हवा प्रदान करतात. हे नवीन एअर प्युरिफायर 645 स्क्वेयर फूट पर्यंतच्या विस्तीर्ण क्षेत्रापर्यंत हवा शुद्ध करत असल्यामुळे मास्टर बेडरूम, फिटनेस स्टुडिओ, हॉस्पिटल रूम आणि इतर मोठ्या जागांसाठी योग्य पर्याय आहे.
नवीन एअर प्युरिफायर – AX46 आणि AX32 मॉडेल्स – एक-बटण नियंत्रणासह विचारपूर्वक डिझाइन केले गेले आहेत जे 99.97% नॅनो-आकाराचे कण, अति सूक्ष्म धूळ, बॅक्टेरिया आणि ऍलर्जी काढून टाकतात. ग्राहकांना शुद्ध हवेचा श्वास सहजतेने घेता यावा यासाठी ते फॉर्मल्डिहाइडसह संभाव्य धोकादायक वाष्पशील सेंद्रिय संयुगे (VOCs) देखील नष्ट करतात.
SmartThings ॲप ग्राहकांना एअर प्युरिफायर दूरस्थपणे नियंत्रित करण्यास सक्षम करते. शिवाय, SmartThings ॲपसह, एअर प्युरिफायर सोयीस्करपणे चालू आणि बंद करणे शक्य आहे ज्यामुळे ऊर्जेची बचत होते. ग्राहक कधीही आणि कुठेही त्यांच्या स्मार्टफोनच्या मदतीने हवेची गुणवत्ता तपासू शकतात आणि एअर प्युरिफायरची इतर कार्ये नियंत्रित करू शकतात.
अत्याधुनिक शुद्धीकरण क्षमता असलेले अद्ययावत एअर प्युरिफायर घरातील खराब दर्जाची हवा ज्यात वायू, धूळ, रसायने आणि विविध गंधांचा समावेश असतो त्याबद्दल ग्राहकांच्या चिंतेचे निराकरण करतात, कारण यामध्ये फ्रंट एअर इनटेक आणि थ्री वे एअर फ्लो यांचा समावेश आहे. फ्रंट एअर इंटेक हवा सहजपणे आत खेचण्यासाठी डिझाइन केलेले आहे. शुध्दीकरण प्रक्रियेतून पुढे गेल्यानंतर, पॉवर फॅन त्याच्या 3-वे एअर फ्लोचा वापर करून त्यानंतर त्वरीत स्वच्छ हवा अनेक दिशांना वितरित करतो.
नवीन श्रेणीमध्ये अत्यंत बारीक धूळ काढून टाकण्यासाठी बहु-स्तरित उच्च-कार्यक्षमता शुद्धीकरण प्रणाली देखील आहे. या प्रणालीमध्ये धुण्यायोग्य प्री फिल्टरचा समाविष्ट आहे जे मोठ्या धूळ कण काढते, सक्रिय कार्बन डीओडोरायझेशन फिल्टर नंतर हानिकारक वायू काढून टाकते आणि धूळ गोळा करणारे फिल्टर जे 99.97% अत्यंत बारीक धूळ पकडते.

AX46 मॉडेलमध्ये न्यूमेरिक इझी व्ह्यू डिस्प्ले आणि लेझर PM1.0 सेन्सर आहे. हा सेन्सर रिअल टाइममध्ये हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करतो आणि वायू दूषित घटक ओळखतो. वापरकर्ते डिस्प्लेवर परिणाम पाहू शकतात, जे PM1.0/2.5/10 प्रदूषकांची पातळी आणि 4-रंग निर्देशकासह एकूण हवेच्या गुणवत्तेची पातळी दर्शविते.
SmartThings कनेक्टिव्हिटी ग्राहकांना अतिरिक्त सुविधा आणि कधीही, कुठेही नियंत्रण प्रदान करते.शुद्ध व ताज्या हवेचा श्वास घेण्यासाठी सॅमसंगच्या वेगवान आणि शक्तिशाली एअर प्युरिफायर्स आजच लावा; IoT-सक्षम आणि 645 स्क्वेयर फूट पर्यंतच्या हवा शुद्ध करणारे एअर प्युरिफायर्स मोठ्या जागेसाठी आदर्श आहेत.
अगदी अत्यंत बारीक धूळ काढून टाकण्यासाठी आणि याचे SmartThings ॲ प कोणत्याही वेळी, कोठेही नियंत्रणासाठी बहुस्तरीय उच्च-कार्यक्षमता शुद्धीकरण प्रणालीसह सुसज्ज आहे
नवीन एयर प्युरिफायर्स AX46 आणि AX32 या दोन प्रकारांमध्ये फिकट तपकिरी आणि राखाडी रंगांमध्ये 12,990 रूपयाच्या च्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध असेल.






