सर्वचजण उष्णतेपासून वाचण्यासाठी पावसाची वाट बघतात. पण जव्हा खरंच पाऊस येतो तेव्हा घरातील आर्द्रतेमुळे लोकं हैराण होतात. आर्द्रतेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण आता असे काही स्मार्ट गॅजेट्स उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही अगदी सहज ही समस्या टाळू शकता.
फोटो सौजन्य -iStock

सर्वचजण उष्णतेपासून वाचण्यासाठी पावसाची वाट बघतात. पण जव्हा खरंच पाऊस येतो तेव्हा रस्त्यावरचं चिखल आणि घरातील आर्द्रतेमुळे लोकं हैराण होतात. पावसाळ्यात घरात, गाडीमध्ये, काचेवर सर्वत्र आर्द्रता पाहायला मिळते. त्यामुळेआर्द्रतेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आर्द्रता टाळण्यासाठी लोक एसी आणि पंखे वापरतात. पण त्याचा फारसा परिणाम होत नाही. आर्द्रतेचा परिणाम फर्निचरवर देखील होतो. ओलाव्यामुळे फर्निचर खराब होण्याची शक्यता असते. पण आता असे काही स्मार्ट गॅजेट्स उपलब्ध आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही अगदी सहज ही समस्या टाळू शकता.

आर्द्रता टाळण्यासाठी आपण Smart dehumidifier वापरू शकतो. Smart dehumidifier वाय-फायशी कनेक्ट करता येते. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घरातील वातावरण नियंत्रित करू शकता.

तुम्ही Smart dehumidifier सह Air purifier देखील वापरू शकता. दोन्ही उपकरणे एकत्र वापरल्याने, तुम्हाला आर्द्रतेपासून मुक्ती आणि ताजी हवा मिळेल. दोन्ही उपकरणे हवेतील आर्द्रता आणि प्रदूषण स्वच्छ करतात.

आर्द्रता टाळण्यासाठी, तुम्ही सामान्य पंख्यांऐवजी smart fans चा वापर करू शकता. स्मार्ट पंखे बाजारात सहज उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला शेड्यूलिंग, ऑसिलेशन आणि कस्टमाइज्ड स्पीड यांसारखे फीचर्स मिळतील.

आर्द्रता टाळण्यासाठी Smart curtains and blinds खूप उपयुक्त ठरतील. तुम्ही तुमच्या सोयीनुसार Smart curtains and blinds शेड्यूल करू शकता.






