
OnePlus इंडियाने घेतला मोठा निर्णय! भारतातील ऑफलाइन स्टोअर्सची संख्या होणार कमी, हे आहे महत्त्वाचं कारण
मिळालेल्या माहितीनुसार, वनप्लसने अधिकतम पार्टनर्ससह चालवले जाणारे एक्सक्लूसिव स्टोअर्स बंद करण्यास सांगितलं आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये विक्री संभाळणारे स्टोअर्स आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, कंपनीच्या मालकिचे काही आउटलेट्सच सुरु राहणार आहेत. डिस्ट्रीब्यूटर्सला देखील कंपनीने एका निश्चित वेळेपूर्वी त्यांचा स्टॉक क्लियर करण्यास सांगितलं आहे. यानंतर ऑफलाईन बिल्डींग बंद होणार आहे. हा बदल अत्यंत कमी काळात बंद होणार आहे. याचा अर्थ असा आहे की, कंपनी जे नवीन स्मार्टफोन्स किंवा इतर डिव्हाईस अगदी सहज उपलब्ध होणार नाहीत. अनेक रिपोर्ट्समधून देखील अशी माहिती मिळाली आहे की, कंपनीचे आगामी डिव्हाईस ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर सादर केले जातील. (फोटो सौजन्य – Pinterest)
महत्त्वाच्या बदलांसोबतच वनप्लस कंपनी त्यांच्या सर्विस सेंटरचा विस्तार करण्यावर देखील भर देत आहे. भारतात सर्विस सेंटरची संख्या 400 हून वाढून 600 होणार आहे. नवीन सेंटर तयार करण्याऐवजी कंपनी ओप्पोच्या सर्विस नेटवर्कचा वापर करत आहे. याचा अर्थ असा आहे की, वनप्लस यूजर्सना आता पूर्वीपेक्षा अधिक शहरांमध्ये सर्विस सेंटरची सुविधा मिळणार आहे.
कंपनीने घेतलेल्या या निर्णयानंतर पुन्हा एकदा ऑनलाईन क्षेत्रात कंपनीचा दबदबा निर्माण होणार आहे. वनप्लस नॉर्ड 6 सह अपकमिंग डिव्हाईसच्या विक्रीसाठी कंपनीची वेबसाईट आणि अॅमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहवे लागण्याची शक्यता आहे. याचे कारण असे की, ऑनलाइन विक्रीमुळे वितरण आणि किरकोळ नफ्याशी संबंधित खर्च कमी होतो, तसेच कंपनीला किंमत आणि मालाच्या साठ्यावर अधिक चांगले नियंत्रण मिळते.
यूजर्ससाठी सर्वात मोठा बदल खरेदीवेळी होणार आहे. कारण ऑफलाईन स्टोअर्समधून खरेदी करणारे ग्राहक आता ऑनलाईन स्टोअरमधून खरेदी करणार आहेत. ऑनलाईन चॅनेल्स यूजर्ससाठी महत्त्वाचा मार्ग बनणार आहेत.