Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel ची ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ सेवा लाँच; 5G स्लायसिंगमुळे यूजर्सना मिळणार सुपरफास्ट नेटवर्क अनुभव

भारती Airtel ने पोस्टपेड ग्राहकांसाठी ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ ही नवी 5G सेवा लाँच केली आहे. 5G स्लायसिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांना गर्दीच्या परिस्थितीतही अधिक वेगवान, स्थिर आणि अखंड नेटवर्क अनुभव मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 20, 2026 | 10:19 AM
Airtel ची ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ सेवा लाँच; 5G स्लायसिंगमुळे यूजर्सना मिळणार सुपरफास्ट नेटवर्क अनुभव

Airtel ची ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ सेवा लाँच; 5G स्लायसिंगमुळे यूजर्सना मिळणार सुपरफास्ट नेटवर्क अनुभव

Follow Us
Follow Us:
  • एअरटेलची ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ सेवा 5G स्लायसिंग तंत्रज्ञानावर आधारित असून पोस्टपेड ग्राहकांना प्रीमियम नेटवर्क अनुभव देणार आहे.
  • गर्दीच्या भागात, लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा ऑनलाइन मीटिंगदरम्यानही ग्राहकांना अधिक स्थिर आणि विश्वासार्ह इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल.
  • एअरटेलच्या सर्व पोस्टपेड ग्राहकांना ही सेवा उपलब्ध असून, प्रीपेड युजर्सही सहजपणे पोस्टपेडमध्ये स्विच करून याचा लाभ घेऊ शकतात.
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या भारती Airtel ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन सेवा सुरु करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ ही नवी सेवा सुरु केली आहे. 5G स्लायसिंग तंत्रज्ञानावर आधारित ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ सेवा एअरटेल यूजर्सना उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण नेटवर्क अनुभव प्रदान करण्यासाठी सक्षम आहे. असे यूजर्स जे काम, मनोरंजन किंवा ऑनलाइन सहयोगासाठी अखंड कनेक्टिव्हिटीवर अवलंबून असतात, विशेषतः कंपनीने त्यांच्यासाठी ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात Motorola चा डबल धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोन्सची एंट्री… सुरुवातीची किंमत केवळ 13,999 रुपये

‘प्रायोरिटी पोस्टपेड’ सेवा सुरु करण्यासाठी एअरटेलने आपल्या 5G नेटवर्कमध्ये स्लायसिंग तंत्रज्ञानाच्या प्रगत क्षमतांसह सुधारणा केली आहे. यामुळे आता नेटवर्क पूर्वीपेक्षा अधिक कार्यक्षम बनते, अधिक क्षमता निर्माण होते. ही क्षमता विशिष्ट पद्धतीने वापरून प्रायोरिटी ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव प्रदान करणं देखील शक्य होणार आहे. नेटवर्क क्षमतेचे हुशारीने आणि गतिमानतेने वाटप करून, एअरटेल जास्त रहदारीच्या परिस्थितीतही पोस्टपेड ग्राहकांना स्थिर, विश्वासार्ह आणि सातत्यपूर्ण अनुभव प्रदान करत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

अमेरिका, सिंगापूर, युनायटेड किंगडम आणि मलेशिया यांसारख्या अनेक देशांमध्ये गेल्या वर्षभरात स्लायसिंग-आधारित 5G सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. आता भारतातील ग्राहकांना देखील याचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. भारतातील अशा प्रकारची ही एअरटेलची पहिलीच सेवा आहे. टेलिकॉम कंपनी एअरटेलने सुरु केलेली ही नवीन सेवा अधिक स्मार्ट, सक्षम आणि भविष्यकालीन डिजिटल नेटवर्क उभारण्यासाठी कंपनी करत असलेल्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे प्रतीक आहे. तसेच कंपनीची सेवा प्रगत तंत्रज्ञान आणि ग्राहक-केंद्रित नवकल्पना यांची सांगड घालण्याच्या कंपनीच्या वचनबद्धतेलाही हे अधोरेखित करते.

भारती एअरटेलच्या ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ सेवेच्या लाँचिंगवेळी प्रतिक्रिया देताना एअरटेल इंडियाचे एमडी आणि सीईओ शाश्वत शर्मा म्हणाले की, “एअरटेल ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करणाऱ्या अर्थपूर्ण नवकल्पना सादर करण्यावर आमचा भर अधिक आहे. ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ ही आमची नवीनतम सेवा 5G स्लायसिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. ही नवीन सेवा ग्राहकांना अधिक दर्जेदार, विश्वासार्ह आणि सुलभ अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे, मग ते वाहतूक कोंडीत अडकलेले असताना ग्राहकांशी संवाद साधत असोत, गर्दीच्या संगीत कार्यक्रमात थेट प्रक्षेपणाचा आनंद घेत असोत किंवा गर्दीच्या बाजारात टॅक्सी बुक करत असोत.”

एअरटेलची ‘प्रायोरिटी’ सेवा कंपनीच्या सर्व पोस्टपेड प्लॅन्सवरील ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. विद्यमान ग्राहकांना हा लाभ आपोआप मिळण्यास सुरुवात होईल. प्रीपेड ग्राहक किंवा ज्या यूजर्सना ‘एअरटेल प्रायोरिटी पोस्टपेड’मध्ये स्विच करण्याची इच्छा असेल असे यूजर्स एअरटेल अ‍ॅपद्वारे किंवा कोणत्याही एअरटेल स्टोअरला भेट देऊन सहजपणे ही सेवा सक्रिय करू शकतात.

क्रिकेट लव्हर्ससाठी भन्नाट ट्रेंड! घरबसल्या तयार करा IPL स्टेडियममधील रिअ‍ॅलिस्टिक फोटो, वापरा हे व्हायरल Gemini AI प्रॉम्प्ट्स

ग्राहक त्यांच्या 5G SA सक्षम स्मार्टफोनवर, नवीनतम सॉफ्टवेअर अपडेटसह, आमच्या प्रायोरिटी सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. ज्या ग्राहकांच्या फोनमध्ये अपडेट प्रलंबित असेल, त्यांना त्यांच्या फोनच्या ‘सेटिंग्ज’ विभागात प्रलंबित कृती दिसेल. तसेच ग्राहक एअरटेल अ‍ॅप वर लॉग इन करून त्यांच्या फोनची ‘एअरटेल प्रायोरिटी’ सेवेसाठीची तयारी तपासू शकतात.

मासिक शुल्क प्लॅन प्रकार फायदे उपलब्ध सुविधा
449 + GST वैयक्तिक – फास्टलेन तंत्रज्ञानासह 5G वर प्रायोरिटी सेवा
– फसवणूक शोध आणि स्पॅम अलर्ट सेवा – अमर्यादित डेटा आणि कॉलिंग
– 3000 SMS
– Airtel Xstream Play
– Adobe Express Premium
– 100 GB क्लाउड स्टोरेज
699 + GST 2 सदस्यांचे कुटुंब – फास्टलेन तंत्रज्ञानासह 5G वर प्रायोरिटी सेवा
– फसवणूक शोध आणि स्पॅम अलर्ट सेवा – अमर्यादित डेटा आणि कॉलिंग
– 3000 SMS
वरील सर्व सुविधा + Amazon
Prime + Jio Hotstar
999 + GST 3 सदस्यांचे कुटुंब – फास्टलेन तंत्रज्ञानासह 5G वर प्रायोरिटी सेवा
– फसवणूक शोध आणि स्पॅम अलर्ट सेवा – अमर्यादित डेटा आणि कॉलिंग
– 3000 SMS
वरील सर्व सुविधा + Apple TV +
Apple Music
1199 + GST 4 सदस्यांचे कुटुंब – फास्टलेन तंत्रज्ञानासह 5G वर प्रायोरिटी सेवा
– फसवणूक शोध आणि स्पॅम अलर्ट सेवा – अमर्यादित डेटा आणि कॉलिंग
– 3000 SMS
वरील सर्व सुविधा + Apple TV +
Apple Music
1749 + GST 5 सदस्यांचे कुटुंब – फास्टलेन तंत्रज्ञानासह 5G वर प्रायोरिटी सेवा
– फसवणूक शोध आणि स्पॅम अलर्ट सेवा – अमर्यादित डेटा आणि कॉलिंग
– 3000 SMS
वरील सर्व सुविधा + Netflix

Web Title: Airtel launches priority postpaid service with 5g network slicing technology tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 07:30 AM

Topics:  

  • airtel
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर
1

Tech Tips: ‘या’ कारणांमुळे सतत गरम होतो तुमचा Smartphone! आत्ताच बदला सेटिंग… ओव्हरहिटींगची समस्या होईल दूर

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार
2

Jio AI Glasses: चष्मा घाला आणि पेमेंट करा! Jio आणतोय स्वस्त AI Glass; Live Translationही मिळणार

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय
3

Technology News: स्मार्टफोन चार्जिंगसाठी बोटची नवी पॉवरबँक सीरिज बाजारात; ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
4

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.