भारतात Motorola चा डबल धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोन्सची एंट्री... सुरुवातीची किंमत केवळ 13,999 रुपये
Moto G37 सिंगल 4GB + 64GB व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून या डिव्हाईसची किंमत 13,999 रुपये आहे. Moto G37 Power स्मार्टफोन 4GB + 128GB आणि 8GB + 128GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही डिव्हाईस 25 मेपासून फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडिया वेबसाईट आणि देशभरातील रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहे. कंपनी या डिव्हाइसेसवर एक विशेष लाँच ऑफर देखील देत आहे, ज्यामध्ये ग्राहक आयडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास Moto G37 आणि Moto G37 Power वर 5,000 रुपयांची त्वरित सूट मिळवू शकतात. (फोटो सौजन्य – Motorola)
कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही हँडसेटमध्ये 8-bit वाली 6.6-इंच HD+ LCD स्क्रीन देण्यात आली आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1,050 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शन दिले आहे.
डिव्हाईसमध्ये पावरफुल मीडियाटेक डेमेन्सिटी 6400 चिपसेट देण्यात आला आहे. तर, G37 मध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम दिले आहे, तर G37 पावर मध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम दिले आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये खास रॅम बूस्ट फीचर देखील दिले आहे, ज्याचा वापर करून तुम्ही फोनची रॅम 12GB पर्यंत वाढवू शकता.
फोटोग्राफीसाठी Moto G37 आणि Moto G37 Power मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. तर डिव्हाईसचा दुसरा कॅमेरा 2-इन-1 लाइट सेंसर आहे. डिव्हाईसच्या समोरील बाजूला 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
Motorola G37 मध्ये 20W फास्ट चार्जिंगस सपोर्टसह 5,200mAh बॅटरी दिली आहे. तर G37 Power मध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. हे स्मार्टफोन मॉडेल 6W च्या रिवर्स वायर्ड चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
Ans: होय, Moto G37 आणि Moto G37 Power दोन्ही स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतात.
Ans: दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.
Ans: Moto G37 Power मध्ये 7000mAh दमदार बॅटरी दिली आहे.






