Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung Galaxy Tab S12 : सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

Samsung Galaxy Tab S12: सॅमसंग इंडियाने आपल्या नव्या गॅलॅक्सी टॅब S12 सिरीजच्या विक्रीला भारतात सुरुवात केल्याची घोषणा केली आहे. अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्स आणि आकर्षक स्लिम डिझाइन ही या टॅबलेट सिरीजची प्रमुख वैशिष्ट्ये असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 08, 2026 | 04:53 PM
सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच; Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • सॅमसंग इंडियातर्फे ‘गॅलॅक्सी टॅब एस१२ सिरीज’च्या विक्रीला सुरुवात
  • एआय फीचर्ससह आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅबलेट लाँच
  • Galaxy Tab S12 सिरीजमध्ये मिळणार अत्याधुनिक AI फीचर्स
Samsung Galaxy Tab S12: कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीच्या सॅमसंग इंडियाने आपल्या ‘गॅलॅक्सी टॅब एस१२ सिरीज’च्या देशभरातील विक्रीची अधिकृत घोषणा केली आहे. अल्ट्रा-थिन डिझाइन, उत्कृष्ट कार्यक्षमता आणि आधुनिक गॅलॅक्सी एआयची सांगड घालणारी ही सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली व बहुउद्देशीय टॅबलेट सिरीज आहे. हे नवीन टॅबलेट्स ग्रे आणि सिल्व्हर या दोन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत.(Samsung Galaxy Tab S12)

गॅलॅक्सी टॅब एस१२ अल्ट्रा (१४.६-इंच) आणि टॅब एस१२+ (१२.६-इंच) मध्ये १६०० निट्सपर्यंत पीक ब्राईटनेस असलेला डायनॅमिक एएमओएलईडी २एक्स डिस्प्ले देण्यात आला आहे. यातील व्हिजन बूस्टर वैशिष्ट्य कोणत्याही प्रकाशात ब्राईटनेस आपोआप समायोजित करते. केवळ ५.१ मिमी स्लिम असलेला गॅलॅक्सी टॅब एस१२ अल्ट्रा हा सॅमसंगचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम टॅब आहे, तर गॅलॅक्सी टॅब एस१२+ ची जाडी ५.३ मिमी आहे.

Freelancers आणि YouTubers सावधान! डॉलरची कमाई खात्यात हवी असेल तर ‘हा’ फॉर्म भरावा लागणार

दोन्ही डिवाइसेसमध्ये ऊर्जा-कार्यक्षम ३ एनएम प्रोसेसर दिला आहे, जो आधीच्या मॉडेलच्या तुलनेत ६१% वेगवान एनपीयू, १९% वेगवान सीपीयू आणि १७% सुधारित जीपीयू पॉवर प्रदान करतो. यात अल्ट्रा मॉडेलवर २३ तासांपर्यंत आणि प्लस मॉडेलवर २१ तासांपर्यंत टिकणारी बॅटरी दिली आहे, जी ४५ वॅट अडॅप्टरने अवघ्या ९५ मिनिटांत १००% चार्ज होते. उष्णतेवर प्रभावी नियंत्रणासाठी यात नवीन ३डी व्हेपर चेंबर समाविष्ट आहे.

अँड्रॉइड १७ आणि वन यूआय ९ वर चालणाऱ्या या सिरीजमध्ये नोट असिस्ट, गुगल एआय प्रो (जेमिनायचा ६ महिन्यांचा ट्रायल) आणि सॅमसंग ब्राउझर यांसारखे गॅलॅक्सी एआय फीचर्स मिळतात. व्यावसायिक कामांसाठी अडोबी फोटोशॉप, गुडनोट्स (१ वर्ष मोफत), लुमाफ्युजन आणि क्लिप स्टुडिओ पेंट हे अ‍ॅप्स विशेष सवलतींसह उपलब्ध आहेत. पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षेसाठी या डिवाइसेसना आयपी६८ रेटिंग मिळाले असून, ७ वर्षांचे ओएस व सिक्युरिटी अपडेट्स दिले जाणार आहेत.

गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्राची सुरुवातीची किंमत १,४९,९९९ रुपये आहे, तर गॅलेक्सी टॅब एस१२+ ची सुरुवातीची किंमत १,२९,९९९ रुपये आहे. गॅलेक्सी टॅब एस१२ अल्ट्रासाठी प्रो कीबोर्ड कव्हरची किंमत २७,९९९ रुपये आहे, तर गॅलेक्सी टॅब एस१२+ साठी प्रो कीबोर्ड कव्हरची किंमत २६,४९९ रुपये आहे. दोन्ही मॉडेल्स – वाय-फाय आणि ५जी व्हेरिएंट्स, ज्यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी किंवा ५१२ जीबी स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत – ७ ऑक्टोबरपासून सॅमसंग एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स, पार्टनर स्टोअर्स, सॅमसंगडॉटकॉम आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होतील.

या सिरीजच्या खरेदीवर ग्राहकांसाठी अनेक विशेष ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये सॅमसंग स्मार्टफोनच्या खरेदीवर १५,००० रुपयांपर्यंत सूट, निवडक वेअरेबल्सवर १५% सूट, प्रो कीबोर्ड कव्हरवर ३०% सूट, ५,००० रुपयांपर्यंत बँक कॅशबॅक किंवा अपग्रेड बोनस आणि प्रमुख बँक व एनबीएफसी भागीदारांद्वारे २४ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआयची सुविधा समाविष्ट आहे.

सॅमसंगने टॅबलेट्ससाठी पहिल्यांदाच ‘गॅलॅक्सी फॉरएव्हर’ हा २ वर्षांचा प्रोग्राम सादर केला आहे. १२,४९९ रुपये किमतीच्या या पॅकद्वारे ग्राहक मूळ किमतीच्या ७५% रक्कम आणि प्रोग्राम फी २४ ईएमआयमध्ये भरून टॅब खरेदी करू शकतात. यामध्ये २४ महिन्यांच्या आत ४०% पर्यंत निश्चित बायबॅक मूल्यासह अपग्रेडचा पर्याय आणि २ वर्षांसाठी मोफत सॅमसंग केअर+ सुरक्षा समाविष्ट आहे.

Facebook New Update: फेसबुकचा नवा अवतार; Home Feed हटणार, व्हिडिओला मिळणार पहिला नंबर

Web Title: Samsung galaxy tab s12 series sale starts in india slimmest tablet with ai features sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • samsung
  • Samsung Galaxy
  • Tech News

संबंधित बातम्या

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा
1

AI Agents: समान काम, समान तंत्रज्ञान तरीही महिला AI एजंटला कमी पैसे? लिमरिक विद्यापीठाचा धक्कादायक खुलासा

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!
2

India Mobile Congress 2026: देशाच्या कानाकोपऱ्यात 5G कनेक्टिव्हिटीचा विस्तार; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य!

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
3

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
4

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.