
Airtel Update: अनलिमिटेड 5G वापरताय? Airtel च्या प्लॅनमध्ये हॉटस्पॉटवरून डेटा शेअर करण्यास बंदी! यूजर्सनी व्यक्त केला संताप
याच अटी आणि नियमांमध्ये असे देखील सांगितलं आहे की, एअरटेल 5G प्लस केवळ नेटवर्कच्या उपलब्धतेनुसार निवडक भागांमध्येच उपलब्ध आहे. अनलिमिटेड 5G डेटाचा वापर केवळ अशाच ठिकाणी केला जाऊ शकतो, जिथे एअरटेलचे 5G नेटवर्क उपलब्ध आहे. एअरटेलच्या अनलिमिटेड 5G डेटा रेस्ट्रिक्शन्सबाबत जाणून घेऊया.
Airtel’s official Unlimited 5G Data Offer Terms & Conditions explicitly state that customers cannot share Unlimited 5G data via a mobile hotspot. pic.twitter.com/cWfSkTSusT — Utsav Techie (@utsavtechie) July 16, 2026
टिप्स्टर Utsav Techie ने अलीकडेच त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, एअरटेलच्या अधिकृत अनलिमिटेड 5G डेटा ऑफरच्या नियम आणि अटींमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की, यूजर्स मोबाईल हॉटस्पॉटद्वारे अनलिमिटेड 5G डेटा शेयर करू शकत नाही. टिप्स्टरने शेअर केलेला हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर अनेक यूजर्सनी संताप व्यक्त केला आहे. काही यूजर्सनी असं म्हटलं आहे की, त्यांना या हॉटस्पॉट निर्बंधाबद्दल माहिती नव्हती आणि असा युक्तिवाद केला की जेव्हा प्लॅन्स अनलिमिटेड म्हणून प्रमोट केले जातात, तेव्हा अशा अटी अधिक स्पष्टपणे दिसल्या पाहिजेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
हॉटस्पॉटवरील निर्बंधांव्यतिरिक्त, यूजर्सना असा देखील अनुभव आला आहे की, अनलिमिटेड 5G च्या नावाने प्रमोट केल्या जाणाऱ्या एअरटेल प्लॅन्समध्ये एक हिडन लिमिट देखील लपलेली असते. अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर करण श्रॉफ नावाच्या एका यूजरने 399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवरील 5G डेटा वापरासंदर्भात एअरटेल कस्टमर सपोर्टकडून आलेला एक ईमेल शेअर केला आहे.
ईमेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 399 रुपयांचा हा प्लॅन अनलिमिटेड 4G + 5G डेटा ऑफर करतो. मात्र यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, 30 दिवसांच्या आत डेटा वापर 300 जीबीपर्यंत मर्यादित आहे, कारण त्या लिमिटपेक्षा जास्त वापर व्यावसायिक वापर मानला जाईल. या ईमेलमुळे आता यूजर्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कारण अनेक यूजर्सच्या मते जेव्हा एखादा प्लॅन अनलिमिटेड म्हणून विकला जातो, तेव्हा त्यावर कोणतीही मर्यादा नसावी.
@airtelindia @Airtel_Presence @DoT_India @TRAI @jagograhakjago @consaff
Your own email confirms the ₹399 “Unlimited 4G+5G Data” plan is capped at 300GB/30 days. If there’s a cap, why advertise it as “Unlimited”? Please remove the restriction on my data immediately. pic.twitter.com/6DtmhTQpbX — Karan Shroff (@KShroff15) July 14, 2026
एअरटेलच्या या नियम आणि अटींंवर आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच यूजर्सनी संताप देखील व्यक्त केला आहे. एका यूजरने प्रश्न उपस्थित केला आह की, जर अनलिमिटेड 5G मोबाइल हॉटस्पॉटद्वारे शेअर केला जाऊ शकत नाही, तर हा डेटा अनलिमिटेड कसा असू शकतो. एका यूजरने म्हटलं आहे की, ते कामासाठी हॉटस्पॉट कनेक्टिविटीवर अवलंबून असतात. कारण त्यांच्या लॅपटॉपमध्ये सिमकार्ड सपोर्ट नसतो. लोकांचं असं म्हणणं आहे की, हॉटस्पॉटचा वापर बंद केल्यामुळे अनलिमिटेड डेटा प्लॅनचा वापर कमी होतो.