Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Ajio च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. कंपनीने स्वतः पोस्ट करून अकाऊंटवर असामान्य हालचाली झाल्याची माहिती दिली असून, यानंतर हॅकिंग की तांत्रिक बिघाड, याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 17, 2026 | 11:54 AM
Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट

Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट झालं Hacked? यूजर्सना गेले अतरंगी मेसेज! पोस्ट शेअर करत कंपनीने केलं स्पष्ट

Follow Us
Follow Us:
  • Ajio ने इंस्टाग्राम अकाऊंटवर असामान्य हालचाली आणि अनपेक्षित डीएम संदर्भात अधिकृत माहिती दिली.
  • कंपनीच्या म्हणण्यानुसार, पाठवलेल्या मेसेजमध्ये कोणत्याही हानिकारक लिंक आढळलेल्या नाहीत.
  • यूजर्सनी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन, मजबूत पासवर्ड आणि सुरक्षा सेटिंग्ज नियमित तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Ajio बाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Ajio चं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे का? सध्या याबाबत सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. कंपनीने स्वत: त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत अकाऊंटवरील असामान्य हालचालींबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता कंपनीचं इंस्टाग्राम अकाऊंट खरंच हॅक झालं आहे का की, ही कोणती मार्केटिंग ट्रिक आहे अशी चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे.

काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर

कंपनीने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही असामान्य ॲक्टिव्हिटी आढळल्या आहेत. तुमच्यापैकी अनेक लोकांना आमच्या अकाऊंटवरून गेल्या 24 तासांत काही अनपेक्षित मेसेज देखील आले असतील. आमची टीम या समस्येचा तपास करत आहे आणि ती सोडवण्यासाठी काम करत आहे. संयम बाळगण्यासाठी धन्यवाद.  (फोटो सौजन्य: Pinterest)

पोस्ट शेअर करत कंपनीने कॅप्शनमध्ये स्पष्ट केलं आहे की, नमस्कार फॉलोअर्स, आमच्या लक्षात आले आहे की अलीकडेच तुमच्यापैकी काहींना आमच्या इंस्टाग्राम हँडलवरून काही असामान्य आणि संदर्भहीन असे ‘डायरेक्ट मेसेजेस’ (DMs) आले आहेत; याबद्दल आम्ही तुम्हाला स्पष्टपणे माहिती देऊ इच्छितो. आमच्या टीमने या मेसेजेसची तपासणी केली असून, त्यात कोणताही हानिकारक उद्देश किंवा घातक लिंक्स असल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे कृपया काळजी करू नका. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. आम्ही या प्रकरणाच्या मूळ कारणाचा शोध घेत आहोत आणि हा प्रकार लवकरात लवकर पूर्णपणे थांबवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तुमचा विश्वास आणि सुरक्षितता ही आमच्यासाठी नेहमीच सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे. या गोष्टीकडे आमचे लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद. – टिम अजिओ

कंपनीने शेअर केलेल्या या पोस्टनंतर आता विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. तसेच यूजर्सच्या सुरक्षेवर देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कंपनीने स्पष्ट केलं आहे की, त्यांच्या अकाऊंटवरून पाठवल्या जाणाऱ्या मेसेजमध्ये कोणत्याही हानिकारक लिंक्स आढळल्या नाहीत.

इंस्टाग्राम अकाऊंट हॅकर्सपासून कसं ठेवाल सुरक्षित?

तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमचे अकाऊंट हॅकर्सपासून सुरक्षित ठेऊ नका.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन

इंस्टाग्राम अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करू शकता. यामुळे तुमच्या अकाऊंटच्या सुरक्षेत आणखी एक स्तर जोडला जातो. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन फोन किंवा कंप्यूटरने तुमच्या अकाऊंटमध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न करता, तेव्हा मोबाईलवर एक कोड येतो. हा कोड एंटर केल्याशिवाय तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट दुसऱ्या डिव्हाईसवर चालू होत नाही. सेटिंगमध्ये जाऊन टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करू शकता. तसेच तुमचे अकाऊंट कधी आणि कुठे लॉगिन झाले आहे, याची माहिती देखील तुम्हाला इंस्टाग्राम सेटिंगमधून मिळू शकते.

मजबूत पासवर्ड सेट करा

अकाऊंटसाठी नेहमी असा पासवर्ड सेट करा जो अगदी सहज ट्रॅक केला जाऊ शकत नाही. यामध्ये अक्षर, संख्या आणि स्पेशल सिम्बल्सचा वापर करा. पासवर्ड वेळोवेळी बदला आणि कोणासोबत शेअर करू नका.

OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सुरक्षा सेटिंग्स वेळोवेळी तपासा

वेळोवेळी तुमची सुरक्षा सेटिंग तपासत राहा. तुमचा ईमेल आणि फोन नंबर योग्य अकाऊंटसोबत जोडला असल्याची खात्री करा. कोणत्याही संशयास्पद हालचाली नजर आल्यास तात्काळ अकाऊंटचा पासवर्ड बदला. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

Web Title: Is ajio instagram account hacked users are getting out of context dms company shared official post tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट
1

आता तुमचा WhatsApp बनेल AI हब! यूजर्ससाठी येणार मोठं अपडेट, तुमच्या आवडीनुसार जोडता येणार थर्ड-पार्टी एआय एजंट

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
2

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
3

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
4

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.