
OpenAI चे पहिले हार्डवेअर डिव्हाईस लाँच! Codex Micro ने सर्वांनाच केलं आकर्षित; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
ओपनएआयने लाँच केलेल्या या नवीन डिव्हाईसचे नाव कोडेक्स मायक्रो असे आहे. हे प्रोग्रामेबल मॅकेनिकल मॅक्रोपॅड आहे, ज्याला विशेषतः कोडेक्ससाठी डिझाईन करण्यात आलं आहे. जगभरात कोडेक्सचे सुमारे 90 लाख युजर्स आहेत. कंपनीने या नवीन डिव्हाईसची किंमत 230 डॉलर्स म्हणजेच सुमारे 22,000 रुपये ठेवली आहे. (फोटो सौजन्य: X)
Yes, we heard you. Get your Codex Micro:https://t.co/e0I7xWZZQG https://t.co/XnCaWG4v9f pic.twitter.com/B5G2vJe7Yq — OpenAI Developers (@OpenAIDevs) July 15, 2026
ओपनएआयने सांगितलं आहे की, हे डिव्हाईस वर्क लाउडरसोबत लिमिटेड पार्टनरशिप करत लाँच करण्यात आले आहे. वर्क लाउडरने असेच प्रोडक्ट क्रिएटर मायक्रो 2 देखील लाँच केले आहे, ज्याला फिग्माच्या सहकार्याने डिझाईन करण्यात आले आहे. कंपनीचं म्हणणं आहे की, कोडेक्स मायक्रोच्या मदतीने युजर्स अगदी सहज एआय एजेंट मॉनिटर आणि मॅनेज करू शकतात.
या डिव्हाईसमध्ये 6 एजेंट – की दिल्या आहेत, ज्या चमकतात आणि चालू असलेल्या थ्रेड्सची स्थिती दर्शवतात. यासोबतच एक जॉयस्टिक देखील आहे, जे रिक्वेस्ट रिव्यू आणि रिफैक्टरिंग वर्कफ्लो सुरू करतात. यामध्ये एक डायल देखील दिले आहे, जे रिजनिंग ऍडजस्ट करते. वर्क लाउडरच्या स्टँडर्ड क्रिएटर मायक्रो 2 ची किंमत 144 डॉलर्स आहे. याच्या तुलनेत ओपनएआयने लाँच केलेले डिव्हाईस थोडे महाग आहे. स्टँडर्ड डिव्हाईसमध्ये देखील असे अनेक फिचर्स आहेत, जे कोडेक्स युजर्ससाठी डिझाईन करण्यात आले आहे. यामध्ये देखील 6 वेगवेगळ्या एजंटसाठी स्वतंत्र बटणे आहेत.
डिव्हाईसच्या बटणांवरील चमकणारे लाईट स्टेटस दर्शवतात. व्हाईट लाईट आयडल मोड, ब्लू लाइट प्रोसेसिंग सुरु करणं, ग्रीन लाईट टास्क पूर्ण होणं आणि रेड लाईट एखादी समस्या हायलाईट करते. सिंगल की प्रेस केल्यानंतर एजेंट असाइन होते आणि डबल प्रेस केल्यानंतर एजेंट विंडो समोर येते. हे बटन यूजर्स कस्टमाइज देखील करू शकतात. याव्यतिरिक्त, प्रत्येक बटणामध्ये पुश-टू-टॉक वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे यूजर्स कोडेक्समध्ये बोलून कमांड देऊ शकतात.
कोडेक्स मायक्रोमध्ये मिळणारे प्रत्येक बटन प्रोग्रामेबल आहे आणि यूजर्स हे बटन स्वाईप किंवा त्यांच्या गरजेनुसार बदलू शकतात. वर्क लाऊडरचं असं म्हणणं आहे की, त्यांच्या बॉक्समध्ये 32 एक्ट्रा बटन मिळतात. यासोबतच यूजर्सना साइलेंट किंवा क्लिकी स्विच निवडण्याचा देखील पर्याय मिळतो. कोडेक्स मायक्रो यूएसबी-सी केबल किंवा ब्लूटूथने कनेक्ट केली जाऊ शकते.