7100mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने केला धमाका! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज... जाणून घ्या किंमत
जगातील पहिला Agentic AI स्मार्टफोन लाँच! फ्लाईटपासून हॉटेल बुकींगपर्यंत करणार सर्व कामं
नवा स्मार्टफोन कंपनीने 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 256GB या बेस व्हेरिअंटची किंमत 54,999 रुपये आहे. तर टॉप एंड व्हेरिअंट 12GB + 256GB ची किंमत 59,999 रुपये आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर खास बँक ऑफर देखील देणार आहे. निवडक बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना 5 हजार रुपयांपर्यंत इंस्टंट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. स्मार्टफोनची विक्री 5 जुलैपासून मोटोरोलाच्या ऑनलाईन स्टोअरवर सुरु होणार आहे. ग्राहक हा नवीन स्मार्टफोन पँटोन ॲक्वा ग्रे, पँटोन डार्क शॅडो आणि पँटोन आइस मेल्ट रंगांच्या पर्यायात खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Motorola)
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, मोटोरोला एज 70 मॅक्समध्ये 6.8-इंच QHD+ एक्सट्रीम अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या नव्या स्मार्टफोनमध्ये 7,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देखील देण्यात आली आहे. फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन आणि ओल्या हातांनी अधिक चांगल्या टच रिस्पॉन्ससाठी ‘वॉटर टच’ फीचर देखील देण्यात आले आहे.
नव्या डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 16 वर बेस्ड हेलो यूआय मिळणार आहे. या डिव्हाईसला 3 वर्षांपर्यंत ओएस अपग्रेड आणि पाच वर्षांपर्यंत सिक्योरिटी अपडेट देण्याचा दावा करण्यात आला आहे. फोनमध्ये 3nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेट देखील मिळणार आहे. यासोबतच या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील देण्यात आले आहे. या हँडसेटमध्ये 5,500 चौ.मिमी उष्णता बाहेर टाकण्याच्या क्षेत्रावर पसरलेले व्हेपर चेंबर कूलिंग सोल्यूशन देखील आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या नव्या स्मार्टफोनमध्ये IP68 + IP69 रेटिंग दिली आहे.
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. फोनमध्ये सोनी एलवायटी-710 सेंसर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनवाला 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा प्राइमरी कॅमेरा देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 119-डिग्री फील्ड ऑफ व्यू आणि ऑटोफोकस मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूला 32-मेगापिक्सेल (f/2.2) चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
काय आहे सरकारची नवी MPMS स्कीम? स्मार्टफोनची किंमत होणार कमी? जाणून घ्या सविस्तर
फोनमध्ये 7,100mAh बॅटरी दिली आहे, जी 90W (वायर्ड) आणि 25W (वायरलेस) फास्ट चार्जिंगसह 5W वायर्ड रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी डिव्हाईसमध्ये 5G, 4G एलटीई, वायफाय 7, ब्लूटूथ 6, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, गॅलिलिओ, नाविक, बेईडू आणि क्यूझेडएसएस पर्याय दिले आहे.






