एका नव्या स्टाईलमध्ये Alexa ची एंट्री, ऑर्डर देताच बुक करणार गाडी आणि तिकीट! महत्त्वाच्या गोष्टीही ठेवणार लक्षात
सर्वांची आवडती Alexa आता एका नव्या रुपात आली आहे. अमेझॉनने Alexa चे नवीन वर्जन लाँच केलं आहे. नवीन वर्जन अतिशय प्रगत आणि अपडेट्सने भरलेले आहे. यामध्ये अनेक मजेदार फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या नवीन वर्जनमधील Alexa आता फक्त गाणी आणि हवामान अपडेट देण्यापूरतीच मर्यादित नसेल तर आता Alexa तुमच्यासाठी गाडी आणि तिकीट देखील बुक करू शकणार आहे. होय, आता तुम्हाला गाणी ऐकवणारी तुमची अलेक्सा तुमच्या प्रवासाची तिकीट बुक करण्यासाठी देखील सक्षम असणार आहे.
अमेझॉनने लाँच केलेलं Alexa चं नवीन वर्जन अधिक स्मार्ट आहे आणि पूर्वीपेक्षा अधिक पर्सनलाइज केलं जाऊ शकतं. आता युजर्सना अलेक्साशी बोलताना चांगला अनुभव घेता येईल आणि हा पर्सनल असिस्टेंट युजर्सचे म्हणणे चांगल्या प्रकारे समजू शकेल. एवढंच नाही तर नवीन वर्जनमधील Alexa तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी देखील लक्षात ठेवणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Amazon ने सांगितलं आहे की, Amazon डिव्हाईस कॉन्टॅक्स्ट आणि नॉलेजच्या मदतीने एक स्मार्ट होम एक्सपीरियंस देणार आहे. युजर्स एका रिक्वेस्टने अनेक स्मार्ट डिव्हाइस कंट्रोल करू शकतात आणि वॉइस कमांडच्या मदतीने रुटीन तयार करू शकतात.
उदाहरणार्थ, जर एखाद्या युजरने Alexa+ ला संध्याकाळ झाल्याचे सांगितले तर ते आपोआप दिवे चालू करेल. नवीन वर्जनसह, युजर्स गाणी वाजवण्याची विनंती करू शकतील तसेच त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल बोलू शकतील. त्याचप्रमाणे, ते अलेक्सावरून चित्रपटातील पात्रे आणि दृश्ये इत्यादींबद्दल माहिती गोळा करू शकतील. ते ChatGPT सारख्या कठीण प्रश्नांची उत्तरे देखील देऊ शकते. नवीन वर्जनमधील Alexa+ तुमची एक चांगली मैत्रिण म्हणून तुमची अनेक कामांसाठी मदत करू शकते.
Alexa+ सोबत कोणत्याही विषयावर दीर्घ संभाषण करता येते आणि ते रिअल-टाइम बातम्या देण्यास देखील सक्षम आहे. ते रेसिपी, तिकिट क्रमांक आणि रेस्टॉरंटची नावे इत्यादी लक्षात ठेवू शकते. आहार इत्यादींबाबत सूचना देताना, यूजर्सचा आहार आणि अॅलर्जींचाही विचार केला जातो. ते कोणत्याही फोटो, नोट्स आणि कागदपत्रे इत्यादींची माहिती देऊ शकते. व्हॉइस कमांडच्या मदतीने ते किराणा मालाची यादी बनवू शकते आणि ती ऑर्डर देखील करू शकते. इमेज जनरेट करण्याव्यतिरिक्त, ते विशिष्ट Amazon डिव्हाइसेसवर अनाउंसमेंट देखील पाठवू शकते.
अमेझॉन प्राइम सबस्क्राइबर्सना Alexa+ चा मोफत अॅक्सेस दिला जात आहे. मार्चच्या अखेरीस ते एलिजिबल कस्टमर्ससाठी सुरू होईल. त्याचा अर्ली अॅक्सेस प्रथम Echo Show 8, 10, 15 आणि 21 वर उपलब्ध असेल.