महाशिवरात्रीसाठी उज्जैनला जाण्याचा प्लॅन करताय? रांगेत उभं राहण्याची चिंता सोडा आणि अशा प्रकारे बुक करा ऑनलाईन तिकीट
26 फेब्रुवारी रोजी बुधवारी सर्वत्र महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यावेळी महादेवाच्या मंदिरात प्रचंड गर्दी असते. महाशिवरात्रीला उज्जैनमधील महाकाल मंदिरात दर्शनासाठी अनेक भाविक पोहोचतात. येथे दर्शनासाठी भक्तांची लांब रांग असते. तुम्ही देखील यंदाच्या महाशिवरात्रीला उज्जैनलला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
तुम्ही महाशिवरात्रीला उज्जैनलला दर्शनासाठी गेल्यानंतर तुम्हाला भल्या – मोठ्या रांगेत उभं राहावं लागणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात होणाऱ्या भस्म आरतीला उपस्थित राहण्यासाठी अॅडव्हान्स ऑनलाइन तिकिटे बुक करू शकता. भस्म आरतीची तिकिटे अॅडव्हान्स बुक केल्याने मंदिरात पोहोचल्यानंतर तुम्हाला रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही. यासाठी तुम्ही ऑनलाईन बुकींग पद्धत वापरू शकता. https://shrimahakaleshwar.com/ या अधिकृत साईटला भेट देऊन ऑनलाइन तिकिटे सहजपणे बुक करता येतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
ऑनलाइन तिकिटे बुक करण्यापूर्वी, तुमचं ओळखपत्र तसेच ज्या लोकांची तिकिटे तुम्हाला बुक करायची आहेत त्यांचे ओळखपत्र तुमच्याजवळ ठेवा. यानंतर मंदिराच्या अधिकृत साईट https://shrimahakaleshwar.com/ वर जा.
महाकाल, उज्जैन शहरात पोहोचण्यासाठी तुम्ही बस, ट्रेन आणि विमानाने जाऊ शकता. या शहराचे सर्वात जवळचे विमानतळ इंदूर आहे, जे येथून 53 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्हाला ट्रेनने जायचे असेल तर उज्जैन हे पश्चिम रेल्वेवरील एक स्टेशन आहे. याशिवाय, अनेक शहरांमधून बस सेवा देखील उपलब्ध आहेत.
Apple iPhone Update: Apple च्या फोल्डेबल iPhone बाबत समोर आली मोठी अपडेट, अशी असू शकते हटके डिझाईन
दिल्लीहून इंदूरला अलायन्स एअर, एअर इंडिया, विस्तारा आणि इंडिगोच्या दररोज उड्डाणे आहेत. या विमान सेवा सकाळपासून रात्रीपर्यंत उपलब्ध असतात. जर तुम्हाला दिल्लीहून ट्रेनने उज्जैनला जायचे असेल तर दररोज अनेक ट्रेन उपलब्ध आहेत. उज्जैनी एक्सप्रेस, मालवा सुपरफास्ट एक्सप्रेस, इंदूर इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस सारख्या गाड्या धावतात. जर तुम्हाला दिल्लीहून उज्जैनला बसने जायचे असेल, तर दोन्ही शहरांमध्ये दररोज अनेक बसेस धावतात.
दिल्लीहून उज्जैनला विमानाने जाण्यासाठी, तुम्हाला दिल्लीहून इंदूरला जाणारे विमान पकडावे लागेल. या दोन्ही शहरांमधील विमान प्रवासासाठी किमान 3100 रुपये खर्च करावे लागतील. यानंतर तुम्ही इंदूरहून उज्जैनला ट्रेन किंवा बसने जाऊ शकता.






