Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस... डील्स पाहताच व्हाल खूश
परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन 17 आता 79,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या दरवाढीनंतर कंपनीने या आयफोन मॉडेलची किंमत 99,900 रुपये केली होती. मात्र आता फ्लिपकार्ट सेलमध्ये हा आयफोन ऑफर्स आणि डिस्काऊंटसह कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच कंपनी या डिव्हाईसच्या खरेदीवर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज बोनस देखील देत आहे. ज्यामुळे ग्राहकांना अधिक फायदा होऊ शकतो. (फोटो सौजन्य – AI Created)
जर तुम्ही आयफोन 15 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 63,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. खरं तर या आयफोन डिव्हाईसची एमआरपी 74,900 रुपये आहे. सहसा हा आयफोन 67,999 रुपयांपर्यंतच्या किंमतीत उपलब्ध होतो. मात्र आता या डिव्हाईसची किंमत आणखी कमी झाली आहे. आता फ्लिपकार्टवर ग्राहकांना आयफोन 15 चे 128GB व्हेरिअंट 63,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
सॅमसंगच्या गॅलेक्सी A सीरीजमधील सॅमसंग गॅलेक्सी ए 36 5G स्मार्टफोन आता केवळ 25,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची एमआरपी 39,499 रुपये आहे. ही किंमत फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी उपलब्ध आहे. या डिव्हाईसमध्ये 5000mAh बॅटरी आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप सारखे फीचर्स मिळणार आहे.
ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 8000mAh बॅटरी आणि 144Hz डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन पूर्वी फ्लिपकार्टवर 29,999 रुपयांत उपलब्ध होता. मात्र आता या डिव्हाईसची किंमत 25,999 रुपये झाली आहे.
पोको स्मार्टफोनमध्ये 9000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 6एस जेन 4 प्रोसेसरसारखे फीचर्स ऑफर केले जाणार आहेत. हा स्मार्टफोन सेलमध्ये 24,999 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. तर पूर्वी या स्मार्टफोनची किंंमत 26,999 रुपये होती.






