Oppo Find X10 चा प्रीमियम लूक होणार आणखी खास! चीनमध्ये नवे Forest Green व्हेरिअंट लाँच, 'या' दिवशी सुरु होणार विक्री
X युजर्ससाठी Elon Musk चा मोठा प्लॅन! Like बटण दाबा अन् पाठवा $1 टिप… नव्या फीचरची सर्वत्रच चर्चा
कंपनीने लाँच केलेल्या डिव्हाईसच्या नवीन कलर व्हेरिअंटची विक्री चीनमध्ये 30 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. अद्याप या नवीन व्हेरिअंटची किंमत जाहीर करण्यात आली नाही. तसेच हे नवीन कलर व्हेरिअंट भारत किंवा इतर देशांमध्ये लाँच केले जाणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. (फोटो सौजन्य: X)
कंपनीने अद्याप ओप्पो फाईंड एक्स 10 फॉरेस्ट ग्रीन व्हेरिअंटची किंमत जाहिर केली नाही. मात्र या स्मार्टफोनच्या आधीपासूनच उपलब्ध असलेल्या व्हेरिअंटची सुरुवातीची किंमत चीनमध्ये 5,499 युआन म्हणजेच सुमारे 78 हजार रुपये आहे. तर डिव्हाईसच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1,39,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन ग्लेशियर ब्लू, मिस्ट टायटॅनियम आणि कोरल रंगात लाँच करण्यात आला आहे. आता यामध्ये एक नवीन फॉरेस्ट ग्रीन व्हेरिअंट देखील जोडले आहे.
नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 6.59 इंच एलटीपीओ अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. डिव्हाईसच्या चारही बाजूला 0.99mm चे सिमेट्रिकल बेजल्स मिळणार आहे, जे अतिशय प्रिमियम अनुभव ऑफर करतात. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9600M प्रोसेसर देखील मिळणार आहे. या डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज पर्याय मिळणार आहे.
सॉफ्टवेअरबद्दल बोलायचं झालं तर नवीन ओप्पो डिव्हाईसमध्ये अँड्रॉईड 17 वर आधारित कलरओएस 17 मिळणार आहे. या फोनमध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. स्मार्टफोनमध्ये माइक्रो-टेक्सचर्ड मेटल फ्रेम आणि वेलवेट फिनिशवाले ग्लास बॅक देखील मिळणार आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये IP66, IP68 आणि IP69 रेटिंग मिळणार आहे.
Tech Tips: एका Earbud मधून कमी आवाज येतोय? घरबसल्या दूर करा समस्या, वापरा या ट्रिक्स
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यासोबतच या फोनमध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन म्हणजेच ओआयएससह 200MP चा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. या फोनमध्ये 200MP चा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 50MP चा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे.
Ans: ओप्पोने फाईंड एक्स10 स्मार्टफोनचे नवीन फॉरेस्ट ग्रीन कलर व्हेरिएंट सादर केले आहे. या व्हेरिएंटची चीनमध्ये विक्री ३० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
Ans: कंपनीने नवीन फॉरेस्ट ग्रीन व्हेरिएंटची किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. मात्र, चीनमध्ये आधीच्या व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत ५,४९९ युआन म्हणजेच अंदाजे ७८ हजार रुपये आहे.
Ans: नवीन फॉरेस्ट ग्रीन व्हेरिएंट भारतात लॉन्च होणार की नाही, याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.






