
Disha Patani: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
दिशा पटानीला चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्याची कला चांगलीच अवगत आहे. पुन्हा एकदा तिने आपल्या नव्या पोस्टमधून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक रहस्यमय व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अनेक मॉनिटर्ससमोर दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तिच्यावर कोणीतरी नजर ठेवत असल्याचे जाणवते. Disha Patani:
या पोस्टमध्ये दिशाने एक गूढ संदेशही लिहिला आहे, ज्यामुळे चाहत्यांच्या मनातील उत्सुकता आणखी वाढली आहे. तिने लिहिले आहे, “संपूर्ण सूर्यमालेत चर्चा आहे की तुम्ही रस्ता भरकटला आहात आणि माणसांना दारातच सोडत आहात. आता DZ ची वेळ आली आहे!”
मात्र, दिशा नेमक्या कोणत्या नव्या प्रोजेक्टकडे संकेत देत आहे, याचा खुलासा तिने अद्याप केलेला नाही. त्यामुळे तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हा एखादा नवा गाण्याचा प्रोजेक्ट आहे, मोठा चित्रपट आहे की काहीतरी वेगळेच? याचे उत्तर येणारा काळच देईल.
याआधीही दिशाने अनेक रहस्यमय पोस्ट आणि इन्स्टाग्राम स्टोरीज शेअर केल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता तिच्या नव्या पोस्टमुळे या चर्चांना आणखी उधाण आले आहे.
दरम्यान, कामाच्या आघाडीवर दिशा पटानी तिच्या आगामी ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘आवारापन 2’ या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. याशिवाय, ‘द पोर्टल ऑफ फोर्स’ या सुपरनॅचरल अॅक्शन-थ्रिलर चित्रपटाद्वारे ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
आता दिशाच्या या रहस्यमय पोस्टमागे नेमके काय दडले आहे आणि तिचा आगामी प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.