Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon चा मोठा प्लॅन! कंपनी लाँच करणार स्वत:चा स्मार्टफोन? बाजारात सुरु झाली नव्या प्रोजेक्टची चर्चा

ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन आता एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे. हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत काही माहिती देखील समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 21, 2026 | 09:34 AM
Amazon चा मोठा प्लॅन! कंपनी लाँच करणार स्वत:चा स्मार्टफोन? बाजारात सुरु झाली नव्या प्रोजेक्टची चर्चा

Amazon चा मोठा प्लॅन! कंपनी लाँच करणार स्वत:चा स्मार्टफोन? बाजारात सुरु झाली नव्या प्रोजेक्टची चर्चा

Follow Us
Follow Us:
  • Amazon पुन्हा स्मार्टफोन मार्केटमध्ये? Alexa सपोर्टसह नव्या फोनवर सुरू काम
  • Fire Phone नंतर Amazon ची नवी एंट्री? AI-इनेबल्ड स्मार्टफोनवर मोठा खुलासा
  • Amazon आणणार खास स्मार्टफोन; Alexa असेल सर्वात मोठी ताकद
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनने 2014 मध्ये त्यांचा पहिला स्मार्टफोन अमेझॉन फायर फोन लाँच केला होता. स्मार्टफोन लाँच झाल्यानंतर केवळ एका वर्षातच कंपनीने त्यांच्या या हँडसेटचे प्रोडक्शन बंद केले. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, ई कॉमर्स कंपनी आता एका नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन अमेझॉनचे वॉयस असिस्टेंट अलेक्सासोबत जोडला जाऊ शकतो. अशी माहिती मिळाली आहे की, कंपनीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) सपोर्ट दिला जाणार आहे, यामध्ये अलेक्सा प्रमुख भूमिका निभावणार आहे. असं सांगितल जात आहे की, अमेझॉन डिव्हाईस युनिटचे एक वर्षाआधीचे गट या प्रोजेक्टची कमान हाती घेणार आहे. या गटाचे नाव ZeroOne आहे. हे नवीन हँडसेट, मिनिमलिस्ट लाईन फोनने प्रेरित आहे.

BGMI 4.3 Update: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात रोलआऊट झाले नवे अपडेट, APK डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

अमेझॉन लाँच करू शकते AI-इनेबल्ड स्मार्टफोन

अशी माहिती समोर आली आहे की, अमेझॉन एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे. हा स्मार्टफोन कंपनी ट्रान्सफॉर्मर नावाच्या एका प्रकल्पांतर्गत डिझाईन करत आहे. हा एक पर्सनलाइड डिव्हाईस असू शकतो जो अलेक्सासोबत सिंक असणार आहे. व्हॉईस असिस्टंट अलेक्सा संपूर्ण दिवस अमेझॉन आणि युजर्स यांच्यामध्ये सतत संपर्काचे माध्यम म्हणून काम करेल. (फोटो सौजन्य – Pinterest) 

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रान्सफॉर्मर प्रोजेक्ट, जेफ बेझोस यांच्या दीर्घकाळापासूनच्या दूरदृष्टीचा एक भाग आहे. या दूरदृष्टीमध्ये ‘स्टार ट्रेक’ या विज्ञान-कथा मालिकेत दाखवलेल्या आवाजाने नियंत्रित होणाऱ्या संगणकांप्रमाणे एक “सर्वव्यापी, आवाजाने चालणारा संगणकीय सहाय्यक” तयार करण्याचा प्रयत्न होता. मिळालेल्या माहितीनुसार, बेझोस यांनी प्रामुख्याने खरेदीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका स्मार्टफोनची कल्पना केली होती. एक असा स्मार्टफोन जो जलद शिपिंग आणि ॲमेझॉन प्राइम सदस्यत्वाद्वारे सवलती देऊन टेक कंपनी ॲपलशी स्पर्धा करू शकेल.

ट्रान्सफॉर्मर प्रोजेक्टची किंमत, लाँच टाईमलाईनबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र रिपोर्टमध्ये असं सांगितलं जात आहे की, जर कंपनीने त्यांची रणनिती बदलली किंवा काही आर्थिक अडचणी आल्या तर हा प्रोजेक्ट तात्काळ बंद केला जाऊ शकतो. असं सांगितलं जात आहे की, अ‍ॅमेझॉनच्या ट्रान्सफॉर्मर प्रकल्पाचे नेतृत्व ॲमेझॉनच्या डिव्हाइसेस विभागातील झीरोवन (ZeroOne) नावाचा एक नवीन गट करत आहे. या गटाची कमान मायक्रोसॉफ्टचे फॉर्मर एग्जीक्यूटिव जे. अलार्ड यांच्या हाती आहे. जे. अलार्ड यांनी यापूर्वी झून आणि एक्सबॉक्स सारख्या प्रोडक्ट्सवर काम केले होते. असं सांगितलं जात आहे की, केवळ बेसिक फीचर्स असलेला लाईट फोन अ‍ॅमेझॉनसाठी आदर्श ठरणार आहे.

स्टाईल आणि किंमतीचा परफेक्ट कॉम्बो! Oppo ने गुपचूप लाँच केला 6,500mAh बॅटरीवाला स्वस्त 5G फोन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचा

अ‍ॅमेझॉनचा हा कथित स्मार्टफोन पर्सनलाइजेशनवर अधिक जोर देणार आहे. याद्वारे यूजर्स अ‍ॅमेझॉनवर अगदी सहज शॉपिंग करू शकणार आहेत आणि प्राईम व्हिडीओवर कंटेंट स्ट्रीम करू शकणार आहेत. यासोबतच, यूजर्स प्राईम म्युझिक देखील तात्काळ एक्सेस करू शकणार आहेत आणि ग्रबहबद्वारे जेवण ऑर्डर करता येईल. या प्रोजेक्टमध्ये अनेक एडवांस्ड AI फीचर्स इंटीग्रेट केले जाऊ शकतात. ज्यामुळे ॲप्स डाउनलोड आणि नोंदणी करणे आवश्यक असलेल्या ट्रेडिशनल ॲप स्टोअर्सची गरज नाहीशी होईल. अशी आशा आहे की, डिव्हाईसमध्ये व्हॉईस असिस्टेंट Alexa एक महत्त्वाची भुमिका निभावणार आहे. ॲमेझॉन फायर फोन जून 2014 मध्ये 649 डॉलर म्हणजेच सुमारे 60,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र या स्मार्टफोनची मागणी नसल्यामुळे ॲमेझॉनने सप्टेंबर 2015 मध्ये या मॉडेलची विक्री बंद केली.

Web Title: Amazon is planning to launch new smartphone what will be the features know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • amazon
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
1

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी
2

बजेट सेगमेंटमध्ये मोठा धमाका! तगड्या फीचर्ससह भारतात ZENO 300 स्मार्टफोनची एंट्री, किंमत 10 हजार रुपयांहून कमी

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव
3

YouTube यूजर्स सज्ज व्हा! कंपनी घेऊन येतेय एकापेक्षा एक तगडे फीचर्स, आता बदलणार व्हिडीओ पाहण्याचा अनुभव

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर
4

Tech Tips: Air Fryer ची स्वच्छता करताना तुमची ही चूक पडू शकते महागात, हीटिंग सिस्टिमला पोहोचू शकते नुकसान! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.