Oppo Find X8 Pro: Oppo च्या प्रीमियम स्मार्टफोनवर मिळतंय बंपर Discount, Amazon देतोय बेस्ट डिल! संधी चुकवू नका
तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे का? पण बजेट कमी आहे? चिंता करू नका. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon तुम्हाला एक बेस्ट डिल देत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही कमी पैशांत प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करू शकता. Amazon ने एक उत्तम ऑफर आणली आहे जिथे तुम्हाला Oppo Find X8 Pro वर तब्बल 12,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. ज्यामुळे तुम्ही डिस्काऊंट आणि ऑफरसह अगदी कमी पैशांत Oppo Find X8 Pro स्मार्टफोनची खरेदी करू शकता.
बजेट स्मार्टफोनवरून प्रीमियम स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सर्वोत्तम डील असू शकते. Oppo Find X8 Pro या प्रिमियम डिव्हाइसमध्ये उच्च दर्जाची कॅमेरा सिस्टम, दीर्घ बॅटरी लाइफ आणि आकर्षक डिझाइन आहे, ज्यामुळे हा फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये एक उत्तम फोन बनतो. चला तर मग Amazon च्या या डिलवर नजर टाकूया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Oppo ने त्यांचा प्रिमियम स्मार्टफोन Oppo Find X8 Pro भारतात 99,999 रुपयांना लाँच केला होता. मात्र आता ऑफर्स आणि डिस्काऊंटसह हा स्मार्टफोन Amazon वर 87,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला या स्मार्टफोनवर तब्बल 12 हजार रुपयांचं डिस्काऊंट दिलं जाणार आहे. म्हणजेच तुम्ही कमी पैशांत आणि बचत करून एका प्रिमियम स्मार्टफोनची खरेदी करू शकता.
याशिवाय तुम्ही फोनवर HDFC Bank कार्डसह 1500 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट मिळवू शकता. BOBCARD EMI ऑप्शनसह 1250 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट देखील दिलं जाणार आहे. एवढेच नाही तर फोनवर एक खास एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे, ज्याद्वारे तुम्ही डिव्हाइस आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफरसह, तुम्हाला डिव्हाइसवर 49,200 रुपयांची सूट मिळू शकते. ज्यामुळे प्रिमियम स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होते.
प्रिमियम स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, Oppo Find X8 Pro या डिव्हाईसमध्ये 6.78 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 4500 निट्सपर्यंत पिक ब्राइटनेस दिली जाते. यासोबतच डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. Oppo Find X8 Pro मध्ये डॉल्बी विजनचा सपोर्ट आहे. या फोनमध्ये पावरफुल मीडियाटेक 9400 चिपसेट देण्यात आले आहे. Oppo Find X8 Pro मध्ये 80W फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5910 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
Oppo च्या या प्रिमियम डिव्हाईसमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 50MP चा अल्ट्रा-वाइड, 50MP चा 3X पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आणि 50MP चा Sony IMX858 6x पेरिस्कोप टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी लवर्ससाठी या डिव्हाईसमध्ये डिवाइस 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.