Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रिलियन डॉलरच्या कंपनीला मिळाला नवा चेहरा! कोण आहेत Apple चे नवे CEO जॉन टर्नस? असा आहे त्यांचा प्रवास

टेक दिग्गज कंपनी अ‍ॅपलमध्ये मोठा नेतृत्व बदल झाला असून जॉन टर्नस यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपासून ते कंपनीची धुरा सांभाळणार असून, या निर्णयामुळे टेक इंडस्ट्रीत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 22, 2026 | 03:20 PM
ट्रिलियन डॉलरच्या कंपनीला मिळाला नवा चेहरा! कोण आहेत Apple चे नवे CEO जॉन टर्नस? असा आहे त्यांचा प्रवास

ट्रिलियन डॉलरच्या कंपनीला मिळाला नवा चेहरा! कोण आहेत Apple चे नवे CEO जॉन टर्नस? असा आहे त्यांचा प्रवास

Follow Us
Close
Follow Us:
  • जॉन टर्नस हे 25 वर्षांपासून अ‍ॅपलशी जोडलेले असून प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
  • टिम कूक आता CEO पदावरून एग्जीक्यूटिव चेयरमॅन पदावर जाणार आहेत.
  • आयफोन, मॅक, आयपॅडसारख्या प्रमुख प्रोडक्ट्सच्या विकासात टर्नस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या अ‍ॅपलमध्ये एक मोठा बदल झाला आहे. दिग्गज कंपनी अ‍ॅपलने त्यांच्या नेतृत्वात बदल केला असून जॉन टर्नस यांची नवे सिईओ म्हणून निवड करण्यात आली आहे. 1 सप्टेंबरपासून टर्नस कंपनीचे नेतृत्व संभाळणार आहेत. तर कंपनीचे सध्याचे सिईओ टिम कूक कंपनीमध्ये एग्जीक्यूटिव चेयरमॅन पदावर काम करणार आहेत. तंत्रज्ञान उद्योग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या टप्प्यातून जात असतानाच कंपनीमध्ये हा मोठा बदल करण्यात आला आहे. जॉन टर्नस कोण आहेत आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा आहे, याबाबत जाणून घेऊया.

Motorola Edge 70 Pro लाँच! 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 6500mAh बॅटरीने सुसज्ज, यूजर्सना मिळणार AI फीचर्ससह फ्लॅगशिप अनुभव

जॉन टर्नस यांच्यासोबतचा एक फोटो टिम कूक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये टिम कूक आणि जॉन टर्नस दोघेही एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो आणि ज्या कंपनीने तुम्हाला नेहमीच आमच्या कामाच्या केंद्रस्थानी ठेवले आहे, तिचे नेतृत्व करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दलही धन्यवाद. हा निरोप नाही. हे जॉनचे स्वागत आहे आणि तुम्ही त्याला माझ्यासारखेच ओळखावे यासाठी मी उत्सुक आहे!  (फोटो सौजन्य – X) 

कोण आहे जॉन टर्नस?

जॉन टर्नस अ‍ॅपलच्या अशा निवडक लीडर्सपैकी आहेत, ज्यांनी कंपनीच्या सर्वात खास आणि प्रसिद्ध प्रोडक्ट्सना आकार देण्यासाठी महत्त्वाची भुमिका बजावली आहे. गेल्या 25 वर्षांपासून जॉन टर्नस अ‍ॅपलसोबत जोडलेले आहेत. त्यामुळे त्यांना प्रोडक्ट-फोकस्ड लीडर मानले जात आहे. जॉन टर्नस तंत्रज्ञान आणि यूजरचा अनुभव यांचा मेळ घालण्यात माहिर असलेले इंजीनियर म्हणून ओळखले जातात.

I want to thank everyone for the outpouring of love and thank you for believing in me to lead the company that has always put you at the center of our work. This is not goodbye. It’s a hello to John and I can’t wait for you to get to know him like I do! 🙏 pic.twitter.com/Q43QDG3UmZ — Tim Cook (@tim_cook) April 21, 2026

शिक्षण आणि करियरचा प्रवास

टर्नस यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. अ‍ॅपल कंपनीत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी वर्च्युअर रिसर्च सिस्टिममध्ये देखील काम केले होते. त्यांनी 2011 मध्ये अ‍ॅपलसोबत आपला प्रवास सुरु केला आणि 2013 मध्ये हार्डवेयर इंजीनियरिंगटे वाइस प्रेसिडेंट बनले. त्यानंतर 2021 मध्ये ते कंपनीच्या एग्जीक्यूटिव टीममध्ये सहभागी झाले.

बजेट रेंजमध्ये प्रीमियम टच! नव्या Vivo स्मार्टफोनने वाढवली यूजर्सची उत्सुकता, 6,500mAh बॅटरी आणि 8GB रॅमने सुसज्ज

या प्रोडक्ट्समध्ये मोठी भूमिका

मिळालेल्या माहितीनुसार, जॉन टर्नस यांनी अ‍ॅपलच्या अनेक फ्लॅगशिप प्रोडक्ट्सच्या डेवलपमेंटचे नेतृत्व केले आहे. यामध्ये आयफोन, आयपॅड, मॅक, ॲपल वॉच आणि एअरपॉड्स यांचा देखील समावेश आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी मॅक लाइनअप पुन्हा एक पावरफुल करण्यासाठी आणि नवीन डिझाइन नवकल्पना अंमलात आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांना ॲपलच्या हार्डवेअर व्यवसायाला नवी दिशा देणारा चेहरा म्हणूनही ओळखले जाते.

Web Title: Apple appoints john ternus as new ceo tim cook to become executive chairman tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका बंडल्स! नव्या ईव्हेंटमुळे गेममध्ये वाढणार रंगत
1

Free Fire Max: स्पिन करा आणि जिंका बंडल्स! नव्या ईव्हेंटमुळे गेममध्ये वाढणार रंगत

Airtel चा महाराष्ट्र-गोव्यात धमाका! 3,400 नवीन 5G साइट्स कार्यान्वित; 2.2 कोटी ग्राहकांना मिळणार हायस्पीड Internet
2

Airtel चा महाराष्ट्र-गोव्यात धमाका! 3,400 नवीन 5G साइट्स कार्यान्वित; 2.2 कोटी ग्राहकांना मिळणार हायस्पीड Internet

Tech News :  इलेक्ट्रिक हीटर की स्टोव्ह ? स्वंयपाक करण्यासाठी काय आहे सर्वात बेस्ट ?
3

Tech News : इलेक्ट्रिक हीटर की स्टोव्ह ? स्वंयपाक करण्यासाठी काय आहे सर्वात बेस्ट ?

USB Killer : ५०० रुपयांची एक चूक अन् लाखोंचे क्षणात नुकसान; अनोळखी पेन ड्राईव्ह ठरतोय घातक
4

USB Killer : ५०० रुपयांची एक चूक अन् लाखोंचे क्षणात नुकसान; अनोळखी पेन ड्राईव्ह ठरतोय घातक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.