बजेट रेंजमध्ये प्रीमियम टच! नव्या Vivo स्मार्टफोनने वाढवली यूजर्सची उत्सुकता, 6,500mAh बॅटरी आणि 8GB रॅमने सुसज्ज
विवोने त्यांचा नवीन स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 6GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसची सुरुवातीची किंमत CNY 1,699 म्हणजेच सुमारे 23,300 रुपये आहे. हि किंमत 6GB + 128GB व्हेरिअंटसाठी आहे. हे डिव्हाईस फ्लोइंग क्लाउड्स व्हाइट, सनसेट ब्लू आणि ट्वायलाइट ब्लॅक या रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे डिव्हाईस विवो चायनाच्या वेबसाइटवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असून, 27 एप्रिलपासून त्याची विक्री सुरू होईल. त्यामुळे थोड्याच दिवसांत ग्राहकांना हा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
टेक कंपनी विवोने लाँच केलेल्या नव्या हँडसेटमध्ये 6.74-इंच एचडी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 4nm स्नॅपड्रॅगन 4 जेन 2 चिपसेट दिला आहे. तसेच या विवो हँडसेटमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज देण्यात आले आहे. डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर बेस्ड ओरिजिनओएस 6 ने सुसज्ज आहे.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या मागील बाजूला 13-मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा दिला आहे. या कॅमेराचा अपर्चर f/2.2 आहे आणि यामध्ये ऑटोफोकसची सुविधा देण्यात आली आहे. तर स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनचे दोन्ही कॅमेरे 1080p पर्यंत व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतात.
Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?
विवो स्मार्टफोनमध्ये 15W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि OTG रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5जी, 4जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट दिले आहे. फोन SGS 5-स्टार ड्रॉप आणि शॉक रेजिस्टेंस सर्टिफिकेशनसह येते. फोनची बॅटरी देखील दीर्घकाळ टिकणाऱ्या कामगिरीसाठी डिझाइन केलेली आहे. या डिव्हाइसमध्ये ड्युअल-सिम 5G सपोर्ट, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असून, ते अँड्रॉइड 16 वर आधारित ओरिजिनओएस 6 वर चालते.






