Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone Fold ची पहिली झलक आली समोर! 7.8 इंच स्क्रीन आणि A20 Pro चिपसेटने जिंकले यूजर्सचे मन, सोशल मीडियावर Video Viral

पहिल्या फोल्ड आयफोनची पहिली झलक अखेर सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. व्हिडीओमधील आयफोनचा कमाल लूक आणि अप्रतिम कॅमेरा डिझाईनने यूजर्सचे लक्ष वेधले आहे. फोल्ड आयफोन डिझाईनला यूजर्सनी पसंती दर्शवली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 06, 2026 | 11:32 AM
iPhone Fold ची पहिली झलक आली समोर! 7.8 इंच स्क्रीन आणि A20 Pro चिपसेटने जिंकले यूजर्सचे मन, सोशल मीडियावर Video Viral

iPhone Fold ची पहिली झलक आली समोर! 7.8 इंच स्क्रीन आणि A20 Pro चिपसेटने जिंकले यूजर्सचे मन, सोशल मीडियावर Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • फोल्डेबल आयफोनच्या संभाव्य डिझाइनचा व्हिडिओ समोर आला असून बुक स्टाईल फोल्ड डिझाईन दिसत आहे.
  • 7.8 इंच इनर ओएलईडी डिस्प्ले, ए20 प्रो चिप आणि 1 टीबी स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे.
  • किंमत अंदाजे ₹1.85 लाख ते ₹2.24 लाख दरम्यान असू शकते.
Apple यूजर्सना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रतिक्षा होती, तो क्षण आता अखेर आला आहे. कंपनीच्या पहिल्या फोल्ड आयफोनची झलक आता अखेर सर्वांसमोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कंपनीच्या पहिल्या फोल्ड आयफोनची झलक शेअर करण्यात आली आहे. AppleTrack अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये कंपनीच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनची झलक जगासमोर सादर करण्यात आली आहे. आयफोनचा लूक अतिशय कमाल आहे. तसेच कॅमेरा डिझाईनमध्ये देखील बदल पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमुळे यूजर्समध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर

असं सांगितलं जात आहे की, AppleTrack अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडीओ केवळ आगामी फोल्ड आयफोनची संभाव्य डिझाइन असू शकते. मात्र ही डिझाईन यूजर्सना प्रचंड आवडली आहे. फोल्डेबल आयफोनच्या पहिल्या झलकने यूजर्सना आनंदीत केले आहे, यात काही शंकाच नाही. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, हे डिव्हाईस आयफोन फोल्ड किंवा आयफोन अल्ट्रा या नावाने लाँच केले जाऊ शकते. जरी आतापर्यंत सॅमसंगसारखे ब्रँड या विभागात खूप पुढे असले तरी, ऍपलचे हे पाऊल बाजारात मोठा बदल घडवून आणू शकते. (फोटो सौजन्य – X) 

आगामी आयफोन फोल्डचे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओवरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, अ‍ॅपलचा फोल्डेबल आयफोन बुक-स्टाइल डिझाईनसह लाँच केला जाऊ शकतो. डिव्हाईसमध्ये 7.8 इंच मोठा इनर OLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. हा आयफोन पूर्ण ओपन केल्यानंतर टॅब्लेट सारखा अनुभव देणार आहे. फोनचा एक्सटर्नल डिस्प्ले 5.5 इंच OLED पॅनल असू शकतो. त्यामुळे यूजरना फोन न उघडताही ते सहजपणे वापरता येईल. या आगामी डिव्हाईसमध्ये लिक्विड मेटल हिन्ज मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे डिव्हाईस आणखी मजबूत आणि टिकाऊ बनू शकते. याशिवाय आगामी डिव्हासईमध्ये टाइटेनियम फ्रेम आणि ग्लास/सिरेमिक बॅक मिळू शकते. या डिव्हाईसमध्ये फेस आयडी ऐवजी टच आयडी मिळण्याची शक्यता आहे. ज्यामुळे डिव्हाईस आणखी पातल दिसणार आहे. दोन्ही स्क्रीनवर पंच-होल कॅमेरा डिझाइन आढळून येते.

This is the iPhone Fold rumored design. Would you buy one? pic.twitter.com/rmKfYCrKos — AppleTrack (@appltrack) April 4, 2026

दमदार परफॉर्मंस आणि मोठी बॅटरी

पावरफुल फोल्डेबल आयफोनमध्ये अ‍ॅपलचे नवीन A20 Pro चिपसेट मिळण्याची शक्यता आहे, जे 2nm प्रोसेसवर आधारित असणार आहे. यामुळे डिव्हाईस अधिक चांगली स्पीड आणि बॅटरी एफिशिएंसी ऑफर करणार आहे. डिव्हाईसमध्ये 12GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. एवढंच नाही तर या डिव्हाईसमध्ये 5400mAh ते 5800mAh बॅटरी मिळू शकते. हे डिव्हाईस केवळ eSIM सपोर्टसह लाँच केले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच यामध्ये फिजिकल सिम स्लॉट दिला जाणर नाही. फोल्ड आयफोनमध्ये चार कॅमेरे दिले जाऊ शकतात. मागील कॅमेऱ्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा असण्याची शक्यता आहे. सेल्फी कॅमेऱ्याबद्दल माहिती नसली तरी, त्यात एक नवीन सेंटर-पोझिशन सेन्सर असण्याची अपेक्षा आहे.

उत्तरपत्रिका तपासणीत AI ची एंट्री! CBSE ने सुरू केली ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणाली, विद्यार्थ्यांसाठी बदलणार मूल्यांकनाची पद्धत

आयफोन फोल्डची अपेक्षित किंमत

रिपोर्ट्सनुसार, फोल्ड आयफोन $2000 ते $2400 म्हणजेच सुमारे 1.85 लाख ते 2.24 लाख रुपयांच्या किंमतीत लाँच होऊ शकतो.

Web Title: Apple fans excited as first foldable iphone design leaks online premium specs and price details surface tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर
1

Samsung ने घेतला मोठा निर्णय! लवकरच बंद करणार ‘हे’ मेसेजिंग अ‍ॅप; काय आहे कारण? वाचा सविस्तर

उत्तरपत्रिका तपासणीत AI ची एंट्री! CBSE ने सुरू केली ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणाली, विद्यार्थ्यांसाठी बदलणार मूल्यांकनाची पद्धत
2

उत्तरपत्रिका तपासणीत AI ची एंट्री! CBSE ने सुरू केली ऑन-स्क्रीन मार्किंग प्रणाली, विद्यार्थ्यांसाठी बदलणार मूल्यांकनाची पद्धत

Free Fire Max: डायमंड्स खर्च करा आणि जिंका भन्नाट बंडल्स! Funny Ring इव्हेंट गेमर्ससाठी ठरणार खास
3

Free Fire Max: डायमंड्स खर्च करा आणि जिंका भन्नाट बंडल्स! Funny Ring इव्हेंट गेमर्ससाठी ठरणार खास

Honor ने पुन्हा केला धमाका! 12GB रॅम आणि 7,000mAh बॅटरीसह नवा 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत
4

Honor ने पुन्हा केला धमाका! 12GB रॅम आणि 7,000mAh बॅटरीसह नवा 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.