Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 16e: ग्राहकांनो पैसे तयार ठेवा, Apple च्या स्वस्त iPhone ची झाली एंट्री! किंमत वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Apple iPhone 16e Launched: Apple ने त्यांचा नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन iPhone 16e लाँच केला. हे iPhone 16 सिरीजमधील नवीनतम मॉडेल आहे ज्यामध्ये 6.1-इंच ओएलईडी स्क्रीन आणि ए18 चिप देण्यात आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2025 | 09:07 AM
iPhone 16e: ग्राहकांनो पैसे तयार ठेवा, Apple च्या स्वस्त iPhone ची झाली एंट्री! किंमत वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

iPhone 16e: ग्राहकांनो पैसे तयार ठेवा, Apple च्या स्वस्त iPhone ची झाली एंट्री! किंमत वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Follow Us
Close
Follow Us:

Apple च्या नव्या एंट्री-लेव्हल आयफोन मॉडेलने अखेर बाजारात एंट्री केली आहे. पण हा आयफोन लाँच होताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, कारण गेल्या अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरु होती की कंपनी iPhone SE4 लाँच करणार आहे. आणि iPhone SE4 चं कंपनीचा स्वस्त आयफोन म्हणून एंट्री करणार आहे. मात्र कंपनीने iPhone SE4 नाही तर iPhone 16e लाँच करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Facebook Update: फेसबुकच्या नियमांत मोठा बदल, इतक्या दिवसांनी डिलीट होणार युजर्सचे लाईव्ह व्हिडिओ

सप्टेंबर 2024 मध्ये लाँच करण्यात आलेल्या 16 सिरीजमधील आणखी नवीन मॉडेल iPhone 16e आता लाँच करण्यात आलं आहे. कंपनीने iPhone 16e लाँच करत 16 लाइनअपचा विस्तार केला आहे. खरं तर सर्वजण iPhone SE4 ची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. त्याबाबत अनेक अपडेट देखील समोर येत होते. त्यामुळे कंपनी iPhone SE4 च लाँच करणार अशी सर्वांना खात्री होती, मात्र आता कंपनीने 16 सिरीजमधील एंट्री-लेव्हल आयफोन iPhone 16e लाँच केला आहे. हा कंपनीचा स्वस्त आयफोन व्हेरिअंट म्हणून लाँच करण्यात आला आहे. चला तर मग कंपनीच्या या स्वस्त आयफोनचे फीचर्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – apple)

iPhone 16e किंमत आणि उपलब्धता

59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत iPhone 16e लाँच करण्यात आला आहे. Apple ने आयफोन 16 सिरीजमधील सर्वात परवडणारा iPhone 16e मॉडेल तीन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. त्याची सुरुवातीची किंमत 59,900 रुपये आहे. 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 59,900 रुपये आहे. याशिवाय, त्याच्या 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 69900 रुपये आणि 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 89900 रुपये आहे. यासाठी प्री-ऑर्डर 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू होतील. परवडणाऱ्या आयफोनची विक्री 28 फेब्रुवारीपासून सुरू होईल. iPhone 16e काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे, तर आयफोन 16 सिरीज अनेक फॅन्सी रंगांमध्ये उपलब्ध आहे.

iPhone 16e चे स्पेसिफिकेशन्स

एंट्री-लेव्हल मॉडेल असूनही, iPhone 16e मध्ये अनेक शक्तिशाली वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यात 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा नॉच iPhone 14 सारखा आहे. iPhone 16e मध्ये अ‍ॅपलचा A18 चिपसेट आहे, जो iPhone 16 सिरीजमध्ये आढळतो. हा डिस्प्ले 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. स्क्रीन मजबूत करण्यासाठी अ‍ॅपल सिरेमिक शील्डचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये 3nm A18 चिप प्रोसेसर आहे जो पहिल्यांदा आयफोन 16 मध्ये वापरला गेला होता.

ग्लोबली लाँच झाला Huawei ट्रिपल-फोल्डिंग स्मार्टफोन; तब्बल इतक्या किंमतीत मिळणार 10.2-इंच मोठ्या स्क्रीनची मजा

फोटोग्राफीच्या बाबतीत बोलायचे झाले तर, iPhone 16e मध्ये सिंगल 48MP रियर कॅमेरा आहे. त्यात अ‍ॅपलचा इन-हाऊस C1 मॉडेम आहे. A18 चिप, C1 मॉडेम आणि iOS 18 च्या कॉम्बिनेशनमुळे बॅटरीची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारली आहे, असा दावा अ‍ॅपलने केला आहे. यात USB-C पोर्ट आहे. iPhone 16e मध्ये कस्टमायझ करण्यायोग्य अ‍ॅक्शन बटण देखील आहे. अ‍ॅपल इंटेलिजेंस फीचर्सना सपोर्ट करणारा हा सर्वात परवडणारा आयफोन आहे.

आता एसई ब्रँडिंग नाही

अ‍ॅपलने ‘एसई’ ब्रँडिंग काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे, जो पूर्वी बजेट-फ्रेंडली आयफोनसाठी वापरला जात होता.

Web Title: Apple iphone 16e launched in india know about price specifications and other details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 09:07 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • tech launch

संबंधित बातम्या

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण
1

iPhone यूजर्सची डोकेदुखी वाढली! 17 Pro आणि Pro Max मध्ये चार्जिंगवेळी येतो विचित्र आवाज, नव्या समस्येने युजर्स हैराण

धोक्यात आहे तुमचा iPhone! Apple ने 1.8 अब्ज युजर्सना केले अलर्ट, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की वापरा
2

धोक्यात आहे तुमचा iPhone! Apple ने 1.8 अब्ज युजर्सना केले अलर्ट, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ टिप्स नक्की वापरा

Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स
3

Smartphone Tips: iPhone चे 7 भन्नाट ट्रिक्स! 90% युजर्सना अजूनही माहिती नाहीत हे सीक्रेट फीचर्स

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत
4

नव्या वर्षात Apple देणार ग्राहकांना खास सरप्राईज! फोल्डेबल आयफोनसह iPhone Air 2 लाँच करण्याची शक्यता, इतकी असेल किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.