Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple iPhone: आगामी iPhone सिरीजची लाँच डेट लीक! नवीन डिझाईन आणि दमदार फीचर्ससह ‘या’ महिन्यात करणार एंट्री

आयफोन 17 सिरीजमधील सर्व मॉडेल्समध्ये ओएलईडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. iPhone 17 आणि iPhone 17 Air मध्ये Apple A19 चिपसेट असेल. iPhone 17 Air हा सर्वात हलका आणि पातळ आयफोन असू शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 10, 2025 | 10:01 AM
Apple iPhone: आगामी iPhone सिरीजची लाँच डेट लीक! नवीन डिझाईन आणि दमदार फीचर्ससह 'या' महिन्यात करणार एंट्री

Apple iPhone: आगामी iPhone सिरीजची लाँच डेट लीक! नवीन डिझाईन आणि दमदार फीचर्ससह 'या' महिन्यात करणार एंट्री

Follow Us
Close
Follow Us:

सर्व अ‍ॅपल युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. अ‍ॅपलची आगामी आयफोन 17 सिरीज ज्याची सर्वजण आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत, या सिरीजची लाँच डेट आता समोर आली आहे. ही सिरीज सप्टेंबर 2025 मध्ये लाँच केली जाणार आहे. खरं तरं आयफोनच्या अनेक आयफोन सिरिज सप्टेंबरमध्ये लाँच केल्या जातात. त्याचप्रमाणे आता ही नवीन सिरीज देखील यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केली जाणार आहे. लाँच डेट समोर आल्याने आता आयफोन 17 सिरीजबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

लाँचिंगपूर्वी Samsung Galaxy F16 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक, बजेट फ्रेंडली रेंजमध्ये करणार एंट्री

अशी माहिती समोर आली आहे की, कंपनी त्यांची आगामी आयफोन सिरीज एका वेगळ्या अंदाजात लाँत करू शकते. या सिरीजचं डिझाईन मागील मॉडेल्सपेक्षा वेगळं असणार आहे. इतकंच नाही तर या आगामी सिरीजमध्ये अनेक अपग्रेड फीचर्स दिले जाणार आहेत, ज्यामुळे आयफोन 17 सिरीज इतर मॉडेल्सपेक्षा खास ठरू शकते. असं सांगितलं जात आहे की, अ‍ॅपल त्यांच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये मोठे अपग्रेड देणार आहे, ज्यामध्ये नवीन डिझाइन, चांगले सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सुधारणांचा समावेश असेल. (फोटो सौजन्य – Pinterest) 

आगामी सिरीजमध्ये या मॉडेल्सचा समावेश

आयफोन 17 सिरीजमध्ये 4 मॉडेल्स लाँच केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये iPhone 17 (स्टँडर्ड मॉडेल), iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max आणि iPhone 17 Air यांचा समावेश असणार आहे. या सिरीजमधील iPhone 17 Air हे एक नवीन मॉडेल असणार आहे जे iPhone Plus ची जागा घेऊ शकते. या आगामी आयफोन सिरीजचे काही स्पेसिफकेशन्स देखील समोर आले आहेत. ही सिरीज अनेक अपग्रेड फीचर्ससह लाँच केली जाणार आहे, त्यामुळे त्यामध्ये इतर मॉडेल्सपेक्षा नक्कीच खास फीचर्स समाविष्ट असू शकतात.

iPhone 17 सिरीज स्पेसिफकेशन्स

डिस्प्ले आणि डिझाइन

आयफोन 17 सिरीजमधील सर्व मॉडेल्समध्ये ओएलईडी डिस्प्ले असेल. iPhone 17 Pro Max मध्ये 6.9-इंच स्क्रीन दिली जाऊ शकते. iPhone 17 Pro मध्ये 6.3-इंच स्क्रीन असण्याची शक्यता आहे. iPhone 17 Air मध्ये 6.6-इंच स्क्रीन असण्याची शक्यता आहे. iPhone 17 च्या स्टँडर्ड मॉडेलमध्ये सर्वात छोटा डिस्प्ले असेल पण हा 120 हर्ट्झ प्रोमोशनला सपोर्ट करणार नाही.

परफॉर्मेंस आणि प्रोसेसर

iPhone 17 आणि iPhone 17 Air मध्ये Apple A19 चिपसेट असेल. iPhone 17 Pro आणि Pro Max मध्ये A19 Pro चिपसेट दिला जाईल. Pro मॉडेल्समध्ये 12GB RAM असण्याची अपेक्षा आहे, तर स्टँडर्ड मॉडेल्समध्ये 8GB RAM असण्याची अपेक्षा आहे.

कॅमेरा सेटअप

iPhone 17 Pro आणि Pro Max: 48MP ट्रिपल कॅमरा असेल ज्यामध्ये 5x टेलीफोटो झूम लेन्स दिली जाऊ शकते. iPhone 17 आणि 17 Air: 48MP ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. यावेळी Apple एक हॉरिजॉन्टल कॅमेरा मॉड्यूल आणू शकते, जे आतापर्यंतच्या त्रिकोणी कॅमेरा डिझाइनपेक्षा वेगळे असेल.

Ambrane ने लाँच केली ‘छोटू’ पॉवर बँक, ऑर्डर करताच 10 मिनिटांत होणार डिलीव्हरी! वाचा स्पेसिफिकेशन्स

डिझाइन आणि जाडी

iPhone 17 Air हा सर्वात हलका आणि पातळ आयफोन असू शकतो, ज्याची जाडी फक्त 5.5mm असेल. यावेळी Apple iPhone 17 मालिकेत अनेक नवीन बदल आणणार आहे, विशेषतः iPhone 17 Air बद्दल बरीच चर्चा आहे. असे मानले जाते की iPhone 17 Air हा कंपनीचा सर्वात पातळ स्मार्टफोन असणार आहे. याशिवाय, जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत या डिव्हाइसमध्ये अनेक चांगले फीचर्स दिसतील. तथापि, कंपनीने अद्याप या फोनबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

Web Title: Apple iphone 17 series will launch in september 2025 know the specifications tech marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
2

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.