Ambrane ने लाँच केली 'छोटू' पॉवर बँक, ऑर्डर करताच 10 मिनिटांत होणार डिलीव्हरी! वाचा स्पेसिफिकेशन्स
टेक कंपनी Ambrane ने नवीन छोटू पॉवर बँक लाँच केला आहे. मूर्ती लहान पण किर्ती महान, असा हा Ambrane चा नवीन पॉवर बँक आहे. MiniCharge 20 या नावाने नवीन पॉवर बँक लाँच करण्यात आला आहे. ही एक कॉम्पॅक्ट पण उच्च क्षमतेची पॉवर बँक आहे जी प्रवासी, हायकर्स आणि दैनंदिन वापरकर्ते यांच्यासाठी डिझाइन केलेली आहे.
काय आहे IVR Call Scam, ज्यामध्ये नंबरवर क्लिक करताच खाली होतंय बँक अकाऊंट? अशी करा तुमची सुरक्षा
सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ऑर्डर केल्यानंतर केवळ 10 मिनिटांत तुम्हाला या पॉवर बँकची डिलीव्हरी मिळणार आहे, आणि यासाठी झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी इन्स्टामार्ट मदत करणार आहे. भारतात उत्पादित, हा पोर्टेबल चार्जर 20,000 एमएएच बॅटरी आणि इन-बिल्ट टाइप-सी केबलसह लाँच करण्यात आला आहे. तुम्ही रोज ऑफीसला जाताना आणि कुठेही फिरायला जाताना हा पोर्टेबल चार्जर प्रवासात कॅरी करू शकता. (फोटो सौजन्य –Ambrane)
Ambrane MiniCharge 20 ची किंमत 1,899 रुपये आहे आणि ही पॉवर बँक ग्रेडियंट ब्लू आणि टायटॅनियम रंगात उपलब्ध आहे. Ambrane MiniCharge 20 च्या खरेदीवर 6 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. तुम्ही ही पॉवर बँक फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि अँब्रेनच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. तसेच Ambrane MiniCharge 20 क्रोमा, विजय सेल्स आणि रिलायन्स डिजिटलसह इतर ऑफलाइन स्टोअर्समधून देखील खरेदी केले जाऊ शकते आहे. याशिवाय, जलद डिलिव्हरीसाठी Ambrane ने झेप्टो, ब्लिंकिट आणि स्विगी इन्स्टामार्टसोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला केवळ 10 मिनिटांत Ambrane MiniCharge 20 ची डिलीव्हरी मिळणार आहे.
ISO-सर्टिफाइड मटीरियलपासून बनवलेले, MiniCharge 20 हे फ्लाइट-फ्रेंडली आणि कॉम्पॅक्ट आहे, ज्यामुळे ते आयडियल ट्रॅवल कंपॅनियन बनते. यात आकर्षक लूकसाठी प्रीमियम मेटॅलिक फिनिश आहे आणि वेगवेगळ्या उपकरणांना एककोमोडेट करण्यासाठी अनेक चार्जिंग ऑप्शन्सला सपोर्ट करते.
पॉवर बँकमध्ये वेगवेगळ्या उपकरणांना सपोर्ट करण्यासाठी अनेक चार्जिंग पोर्ट आहेत. यात 22 वॅटचा टाइप-सी पोर्ट, 22 वॅटचा यूएसबी-ए पोर्ट आणि एकात्मिक 20 वॅटचा टाइप-सी केबल समाविष्ट आहे. येथील एलईडी इंडिकेटर रिअल-टाइम बॅटरी स्थिती प्रदर्शित करतात, तर प्रगत संरक्षण सर्किट डिव्हाइस सुरक्षितता आणि बॅटरी दीर्घायुष्य सुनिश्चित करतात.