Apple यूजर्सना करावी लागणार प्रतिक्षा! iPhone 18 च्या लाँचिंगसाठी होऊ शकतो उशीर, काय आहे कारण? जाणून घ्या
खरं तर, कंपनीने सप्टेंबर महिन्यात आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्ससह त्यांचा पहिला बुक स्टाईल फोल्डेबल आयफोन डुओ सादर केला होता. मात्र यावेळी कंपनीने या सिरीजमधील स्टँडर्ड मॉडेल आयफोन 18 लाँच केले नव्हते. हे आयफोन मॉडेल जानेवारी महिन्यात लाँच केले जाणार होते. मात्र आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. असं सांगितलं जात आहे की, स्टँडर्ड मॉडेल आयफोन 18 च्या लाँचिंगसाठी थोडा उशीर होऊ शकतो. एका नव्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कॅमेरा सेंसरमधील सप्लायमुळे आयफोनच्या लाँचिंगसाठी उशीर होऊ शकतो. विशेष म्हणजे, यावेळी ॲपलला कॅमेरा सेन्सर्ससाठी त्यांचा दीर्घकाळचा पुरवठादार असलेल्या सोनीऐवजी सॅमसंगवर अवलंबून राहावे लागण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
टेक कंपनीने यावर्षी स्टँडर्ड आयफोन 18 लाँच केला नव्हता. रिपोर्ट्सनुसार, हा आयफोन पुढील वर्षी लाँच केला जाण्याची योजना होती. स्टँडर्ड मॉडेलसोबतच कंपनी कमी किंमतीत आयफोन 18 ई आणि आयफोन एअर 2 देखील लाँच करणार असल्याची चर्चा आहे. या तिन्ही डिव्हाईसची लाँच तारीख अद्याप अधिकृतपणे घोषित करण्यात आली नाही.
रिपोर्टनुसार, स्टँडर्ड मॉडेल आयफोन 18 लाँचिंगमध्ये उशीर होण्याचे सर्वात मोठे कारण कॅमेरा सेंसरचा सप्लाय असल्याचे सांगितलं जात आहे. आतापर्यंत कंपनी त्यांच्या आयफोनसाठी कॅमेरा सेंसर सोनीकडून खरेदी करत होते. मात्र कंपनीने गेल्यावर्षी सॅमसंगसोबत नवीन डिल केली होती. या करारानुसार, सॅमसंग अमेरिकेतील टेक्सासस्थित आपल्या कारखान्यात आयफोनसाठी नवीन 20-मेगापिक्सेलचे सीएमओएस (CMOS) कॅमेरा सेंसर तयार करत आहे; मात्र, या सेंसरच्या उत्पादनात विलंब झाल्यामुळे ॲपलला आवश्यक तितक्या प्रमाणात ते मिळवता आलेले नाहीत. याच कारणामुळे आयफोन 18 च्या लाँचिंगसाठी उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आगामी आयफोन 18 मध्ये ॲपलचा A20 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. तसेच डिव्हाईसमध्ये मागील मॉडेलच्या तुलनेत मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. फोनमध्ये 6.3 इंच अमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा समाविष्ट असू शकतो.
Ans: आयफोन 18 पुढील वर्षी लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, कॅमेरा सेंसरच्या पुरवठ्यातील अडचणींमुळे लाँचिंगला उशीर होऊ शकतो.
Ans: आयफोन 18 च्या लाँचिंगला उशीर होण्यामागे कॅमेरा सेंसरचा अपुरा पुरवठा हे प्रमुख कारण असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
Ans: ॲपल यावेळी सोनीऐवजी सॅमसंगकडून कॅमेरा सेंसर घेण्याची शक्यता आहे.






