Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Upcoming iPhone: आयफोन 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्सची किती असणार किंमत? लाँचपूर्वीच डिटेल्स लीक, जाणून घ्या सविस्तर

iPhone Update: तुम्ही देखील आगामी आयफोन लाँचिंगची प्रतिक्षा करत आहात का? आगामी आयफोन लाँच होण्यापूर्वीच त्यांच्या किंमतींबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. कंपनीच्या आगामी आयफोनच्या किंमती मागील मॉडेलच्या तुलनेत 12% ते 15% पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2026 | 02:46 PM
Upcoming iPhone: आयफोन 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्सची किती असणार किंमत? लाँचपूर्वीच डिटेल्स लीक, जाणून घ्या सविस्तर

Upcoming iPhone: आयफोन 18 प्रो आणि 18 प्रो मॅक्सची किती असणार किंमत? लाँचपूर्वीच डिटेल्स लीक, जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • iPhone 18 Pro आणि प्रो Max च्या किंमतीत सुमारे 200 डॉलर (जवळपास ₹19,000) वाढ होण्याची शक्यता आहे.
  • नव्या प्रो मॉडेल्समध्ये A20 प्रो चिप, AI फीचर्स आणि अपग्रेडेड कॅमेरा मिळू शकतो.
  • रॅम आणि मेमरी चिप्सच्या वाढत्या किमतीमुळे ॲपल किंमत वाढवू शकते, असा दावा केला जात आहे.
टेक जायंट कंपनी असलेल्या ॲपलची नेक्स्ट जेनरेशन फ्लॅगशिप आयफोन 18 प्रो सिरीज यावर्षी सप्टेंबर महिन्यात लाँच केली जाणार आहे. कंपनी सप्टेंबर महिन्यात या सिरीजमधील आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स असे दोन मॉडेल्स लाँच करू शकते. पण आगामी आयफोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे डिटेल्स आणि किंमती समोर आल्या आहेत. कंपनीने अधिकृत घोषणा करण्यापूर्वीच अमेरिकेत आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्सची किंमत लीक झाली आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, आयफोन 17 प्रो आणि आयफोन 17 प्रो मॅक्सच्या किंमतीच्या तुलनेत कंपनीच्या आगामी आयफोन सिरीजच्या किंमती जास्त असणार आहेत.

चीनचा मोठा निर्णय! भावनिक नातं निर्माण करणाऱ्या AI Chatbots वर बंदी, खऱ्या नातेसंबंधांना सरकारचं प्राधान्य

आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स व्यतिरिक्त ॲपलच्या संपूर्ण लाईनमधील किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रॅम आणि मेमोरी चिप्सच्या वाढत्या किंमतीमुळे कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं जात आहे. ॲपलच्या अनेक विश्लेषकांनी असा दावा केला आहे की, आगामी ‘आयफोन 18 प्रो’ सिरीजच्या किमतीत 12% ते 15% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नवीन आयफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

किती असणार आगामी आयफोनची किंमत?

लीक्स रिपोर्टनुसार, ॲपलच्या आगामी आयफोन 18 प्रो सिरीजमधील दोन्ही मॉडेल्सच्या किंमतीत 200 डॉलर्स म्हणजेच सुमारे 19,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यानंतर आयफोन 18 प्रो 1099 डॉलर्सपासून 1299 डॉलर्सपर्यंत म्हणजेच सुमारे 1,05,800 रुपयांपासून 1,25,100 रुपयांच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. तर आयफोन 18 प्रो मॅक्स 1299 डॉलर्सपासून 1499 डॉलर्सपर्यंत म्हणजेच सुमारे 1,25,100 रुपयांपासून 1,44,300 रुपयांपर्यंतच्या किंमतीत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. तसेच कंपनीने त्यांच्या आगामी फ्लॅगशिप सिरीजमध्ये अनेक अपग्रेड केले आहेत.

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

आयफोन 18 प्रो मध्ये कोणते अपग्रेड केले जाणार?

नवीन आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये नेक्स्ट जेनरेशन A20 प्रो बायोनिक चिपसेट दिला जाऊ शकतो. कंपनीची ही आगामी सिरीज नवीन आणि ॲडव्हांस एआय फीचर्सने सुसज्ज असणार आहे. कॅमेऱ्यामध्ये नवीन प्रकारचा हार्डवेअर पाहायला मिळू शकतो. तसेच कंपनी आगामी प्रो सिरीजच्या बॅटरीमध्ये देखील काही महत्त्वाचे बदल करू शकते. कंपनीची ही आगामी सिरीज मोठ्या बॅटरीसह लाँच केली जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी यामध्ये सोनी IMX905 प्रायमरी सेंसर मिळू शकतो. आयफोनच्या पुढील बाजूला मागील सिरीजच्या तुलनेत छोटा डायनॅमिक आईलँड मिळू शकतो. या सिरीजमध्ये प्रीमियम टाइटेनियम फ्रेमचा वापर केला जाऊ शकतो.

Web Title: Apple iphone 18 pro and pro max prices leaked before launch major price hike expected tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • Tech News

संबंधित बातम्या

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता
1

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव
2

भारतीय मनोरंजनाला ग्लोबल प्लॅटफॉर्म! JioHotstar ची यूके, कॅनडा आणि सिंगापूरमध्ये एंट्री; प्रेक्षकांना मिळणार नवा अनुभव

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!
3

Airtel फाउंडेशनच्या ‘द टीचरॲप’ने गाठला ३ लाख यूजर्सचा टप्पा, बनला शिक्षकांचा डिजिटल साथीदार!

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर
4

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल… भारतीय यूजर्ससाठी आलं नवं फीचर, असा करा वापर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.