Apple च्या स्मार्टवॉचना मिळालं नवीन अपडेट्स, आरोग्य आणि फिटनेससह अनेक फीचर्सचा समावेश
Apple ने watchOS 11.0.1 अपडेट आणण्यास सुरुवात केली आहे. हे अपडेट अशा यूजर्ससाठी आणले आहे ज्यांना गेल्या महिन्यात watchOS 11 रिलीज झाल्यानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. अपडेटमध्ये अनेक गोष्टी सुधारल्या गेल्या आहेत. हे नवीन अपडेट युजर्ससाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. आरोग्य आणि फीटनेससह अनेक नवीन फीचर्स युजर्सना मिळणार आहेत.
हेदेखील वाचा- सायबर फसवणुकीसाठी नागरिकांना परदेशातून येतात कॉल, सुरक्षिततेसाठी लक्षात ठेवा महत्त्वाच्या टिप्स
Apple Watch Series 6 आणि नवीन मॉडेल्ससाठी हे अपडेट आहे. या नवीन अपडेटमुळे युजर्सचा अनुभव आणि परफॉर्मेंस सुधारण्यात मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. अपडेटमध्ये घड्याळ ऑटोमॅटिक रीस्टार्ट होण्याची समस्या सोडवली गेली आहे. म्यूजिक ॲप क्रॅश, जलद बॅटरी संपुष्टात येणे आणि नवीन मॉडेल्सवर टच स्क्रीन प्रतिसाद न देणे यासारख्या अनेक समस्यांचे निराकरण करून युजर्ससाठी नवीन अपडेट सादर करण्यात आलं आहे. Apple Watch Series 9, Series 10 आणि Ultra 2 च्या युजर्ससाठी हे अपडेट खूप महत्वाचे आहे. विशेषत: त्या यूजर्सना अपडेटनंतर मोठा दिलासा मिळणार आहे, ज्यांना टच स्क्रीन प्रतिसादात समस्यांना सामोरं जावं लागतं होतं. (फोटो सौजन्य – pinterest)
हेदेखील वाचा- Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 वर मिळत आहे जबरदस्त ऑफर्स, बचत करण्याची संधी गमावू नका
watchOS 11 सह, Apple ने अनेक नवीन आरोग्य आणि फिटनेस फीचर्स देखील लाँच केली आहेत. हे फीचर्स वापरकर्त्यांना त्यांच्या फिटनेस प्रवासात मदत करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. Apple चे हे नवीन अपडेट केवळ तांत्रिक समस्या सोडवत नाही, तर नवीन फीचर्ससह वापरकर्त्यांचे आरोग्य आणि फिटनेस अनुभव देखील सुधारते. वापरकर्त्यांना हे अपडेट शक्य तितक्या लवकर इन्स्टॉल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे जेणेकरून ते या सर्व नवीन सुधारणा आणि वैशिष्ट्यांचा लाभ घेऊ शकतील.






