हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात? ओठांवरील मऊपणा टिकवून ठेवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांपासून बनवा नॅचरल लिप बाम
Lip Care: हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे थंड वारे वाहू लागतात. थंड वातावरणात शरीरसोबतच त्वचा आणि केसांच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे स्किन केअर रुटीनमध्ये बदल, हेअर केअर इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात, पण ओठांची जास्त काळजी घेतली जात नाही. ओठांवरील त्वचा कोरडी आणि निस्तेज झाल्यानंतर ओठ सुकल्यासारखे वाटतात आणि नैसर्गिक सौंदर्य़ कमी होते. ओठांवरील हरवलेली चमक पुन्हा वाढवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडे लिपबाम, लीप केअर प्रॉडक्ट मागवले जातात. फाटलेल्या ओठांमुळे जळजळ आणि वेदना वाढतात, ज्यामुळे काहीवेळा रक्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे ओठांवरील फाटलेली त्वचा मऊ आणि मुलायम करण्यासाठी महागड्या स्किन केअरचा वापर न करता पारिजातकाच्या फुलांचा वापर करून लिपबाम बनवावे. चला तर जाणून घेऊया कृती.(फोटो सौजन्य – istock)
पारिजातकाची फुले
तूप
सुती कापड
पारिजातकाच्या फुलाचे लिपबाम बनवण्यासाठी सर्वप्रथम, पारिजातकाच्या फुलांचे देठ वेगळे करून घ्या. त्यानंतर फुले पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करा. पारिजातकाच्या फुलांच्या पाकळ्या काढून खलबत्यामध्ये बारीक कुटून घ्या. त्यानंतर त्यात नारळाचे तेल घालून बारीक पेस्ट बनवून घ्या. छोट्या पॅनमध्ये पाणी गरम करून त्यात मध्यम आकारातील वाटी ठेवा. पाण्याच्या वाफेने वाटी गरम झाल्यानंतर त्यात तयार केलेली पेस्ट आणि तूप घालून चमच्याने मिक्स करा. ५ ते १० मिनिटं मंद आचेवर उकळी येण्यासाठी ठेवा. तयार केलेले मिश्रण गाळून किंवा सुती कपड्याने गाळून घ्या आणि काचेच्या डबीमध्ये भरून ठेवा.
तयार केलेले लिपबाम नियमित रात्री झोपण्याआधी ओठांवर लावावे. पारिजातकाच्या फुलांमध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात. त्यामुळे ओठांवर कोणतेही केमिकल प्रॉडक्ट लावण्याआधी त्वचेला सूट होईल की नाही याची खात्री करून नंतरच लावावे. थंडीच्या दिवसांमध्ये ओठ खूप जास्त फुटल्यासारखे झाल्यास तूप, खोबरेल तेलाचा वापर करावा. यामुळे ओठ अतिशय मऊ आणि गुलाबी होण्यास मदत होते. मऊ, मुलायम आणि नैसर्गिक गुलाबी ठेवण्यासाठी पारिजातकाच्या फुलांपासून बनवलेला लिपबाम लावावा. बऱ्याचदा वारंवार केमिकल प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे ओठांवरील त्वचा खूप जास्त कोरडी पडून जाते तर काहीवेळा इन्फेक्शन होऊन ओठ काळे पडतात. थंडीच्या दिसवांमध्ये ओठ काळे पडत असतील तर तुपाचा वापर करावा.
Ans: हिवाळ्यातील थंड आणि कोरड्या हवेमुळे ओठांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. ओठांवर तेलग्रंथी नसल्यामुळे ते कोरडे पडण्याची शक्यता अधिक असते.
Ans: होय, पारिजातकाच्या फुलांचा वापर करून घरगुती लिप बाम तयार करता येतो. मात्र, पारिजातकाच्या फुलांमुळे ओठांचा कोरडेपणा कमी होतो किंवा त्यांना विशेष पोषण मिळते, याबाबत ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत.
Ans: स्वच्छ आणि रसायनमुक्त पारिजातकाची फुले वापरून घरगुती लिप बाम तयार करण्याच्या काही पारंपरिक पद्धती आहेत. मात्र, फुलांचा अर्क थेट ओठांवर लावण्याऐवजी सुरक्षित, त्वचेसाठी योग्य घटकांचा वापर करावा आणि आधी पॅच टेस्ट करावी.






