Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन… सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

Foldable Phone खरेदी करण्याचा विचार करताय? मोठी स्क्रीन आणि आकर्षक डिझाईनमुळे तुम्हाला देखील फोल्डेबल फोन खरेदी करावा वाटत आहे का? थांबा... फोल्डेबल फोन खरेदी केल्यानंतर यूजर्सना भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याचबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 27, 2026 | 10:26 AM
फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन... सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

फोन एक पण समस्या अनेक! Foldable फोनमुळे वाढलं यूजर्सचं टेंशन... सतत करावा लागतोय या अडचणींचा सामना

Follow Us
Follow Us:
  • मोठ्या स्क्रीनमुळे फोल्डेबल फोनची बॅटरी लवकर संपते.
  • कालांतराने हिंज सैल होणे किंवा धूळ साचल्याने अडचणी येऊ शकतात.
  • नाजूक स्क्रीनमुळे डॅमेज होण्याचा धोका सामान्य फोनपेक्षा अधिक असतो.
Foldable Phone: गेल्या काही वर्षांपासून फोल्डेबल फोनची लोकप्रियता अतिशय वेगाने वाढत आहे. 2021 मध्ये फोल्डेबल फोनचे केवळ 15 लाख युनिट विकले गेले होते तर 2025 मध्ये ही संख्या करोडोंच्या घरामध्ये पोहोचली आहे. तर 2026 मध्ये ही संख्या आणखी 20 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

एकीकडे फोल्डेबल फोन खरेदी करणाऱ्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे तर दुसरीकडे हा फोन खरेदी केल्यानंतर त्रस्त असणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे असल्याचे पाहायला मिळत आहेत. फोल्डेबल फोन वापरणाऱ्या युजर्स ना अशा काही समस्यांच्या सामना करावा लागतो, ज्याबाबत सामान्य स्मार्टफोन युजर्स विचार देखील करू शकत नाहीत. तुम्ही देखील नवीन फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा फोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला कोणत्या समस्यांच्या सामना करावा लागू शकतो याबाबत सर्वात आधी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

बॅटरी लाईफ

तुम्ही कोणताही फोन खरेदी केला तरी त्याच्या बॅटरी लाईफबद्दल सतत चिंता असते. विशेषतः फोल्डेबल फोनच्या बाबतीत ही चिंता अधिक वाढते. फोल्डेबल फोनची डिझाईन पातळ असल्यामुळे यामध्ये जास्त मोठी बॅटरी दिली जाऊ शकत नाही. मात्र स्मार्टफोनची मोठी स्क्रीन वापरण्यासाठी जास्त बॅटरीची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत फोनमधील बॅटरी वारंवार चार्ज करण्याची गरज पडते.

हिंजचा टिकाऊपणा

हिंजच्या टिकाऊपणाबद्दल फोल्डेबल फोन्सना सुरुवातीपासूनच संघर्ष करावा लागला आहे. मात्र अद्याप ही समस्या सोडवलेली नाही. समोर आलेल्या काही रिपोर्टनुसार फोल्डेबल फोनच्या वापरानंतर काही काळाने फोनमधील हिंज सैल होतात. तसेच अनेक युजरचे असे म्हणणे आहे की, जर हिंजवर धूळ साचली तर ते योग्य प्रकारे काम करत नाहीत.

ॲप्ससोबत सुसंगत नसणं

फोल्डेबल फोनची जास्तीची लांबी आणि आस्पेक्ट रेशिओमुळे ॲप्स आणि फोटो-व्हिडिओसोबत सुसंगततेची समस्या निर्माण होते. फोल्डेबल फोनची एक मोठी हायलाईट त्याची मोठी स्क्रीन देखील असते. पण या फीचरचा पूर्णपणे वापर केला जात नाही. व्हिडीओ पाहताना स्क्रिनवर बरीच जागा रिकामी राहते. याव्यतिरिक्त, बिजागरीच्या ठिकाणी एक घडी किंवा रेषा दिसून येते, ज्यामुळे व्हिडीओ पाहण्याचा अनुभव प्रभावित होतो. काहींना स्क्रोलिंग करतानाही यामुळे अडचण जाणवते.

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार

डॅमेजचा धोका

फोल्डेबल फोनची स्क्रीन डॅमेज होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. या फोनची स्क्रीन सामान्य स्मार्टफनपेक्षा अधिक सॉफ्ट आणि नाजूक असते, जी पडल्यावर डॅमेज होऊ शकते. नुकसान होऊ नये यामुळे अनेक कंपन्या स्क्रीनवर प्लास्टिक स्क्रीन प्रोटेक्टर देखील लावतात. मात्र काही वेळाने या प्रोटेक्टरमध्ये बबल दिसू लागतात. सामान्य फोनच्या तुलनेत, फोल्डेबल फोनवरील स्क्रीन प्रोटेक्टर्स जास्त काळ टिकत नाहीत.

Web Title: Are you also planning to buy new foldable phone you may have to face these problems in future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • smartphone
  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
2

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
4

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.