Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान

Smartphone Tips: स्मार्टफोनवर तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर केल्याने विविध नुकसान होऊ शकतो. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया. तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासमुळे स्मार्टफोनची सुरक्षा तर कमी होतेच पण त्यासोबतच टचस्क्रीनवर परिणाम होऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 18, 2026 | 12:17 PM
Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान

Tech Tips: छोटासा तडा, पण नुकसान मोठं! स्मार्टफोनवर अजूनही तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरताय? होऊ शकतं मोठं नुकसान

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टफोनच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडू नये किंवा स्क्रीन तुटू नये यासाठी टेम्पर्ड ग्लासचा वापर करतात
  • तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर केल्यास फोनच्या स्क्रीनच्या सुरक्षेवर परिणाम होतो
  • तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर केल्याने मोबाईलच्या टचस्क्रीनवर देखील परिणाम होऊ शकतो
स्मार्टफोन आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे डिव्हाईस आहे. स्मार्टफोनमध्ये दिलेल्या विविध फीचर्समुळे आपली अनेक कामं अगदी सहज पूर्ण होऊ शकतात. स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक म्हणजेच स्मार्टफोनची स्क्रीन. स्मार्टफोनच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडू नये किंवा स्क्रीन तुटू नये यासाठी अनेक लोकं फोनवर टेम्पर्ड ग्लासचा वापर करतात.

Tech Tips: कधीकाळचं कूल Username आता वाटतंय बोरिंग? आता Instagram वर असं बदला तुमचं नाव, फॉलो करा या स्टेप्स

काहीवेळेस फोन पडला किंवा एखाद्या टोकदार वस्तूवर आदळला तर टेम्पर्ड ग्लासमध्ये क्रॅक पडू शकतात किंवा ग्लास तुटू शकते. टेम्पर्ड ग्लासमध्ये क्रॅक पडल्यानंतर किंवा ग्लास तुटल्यानंतर देखील काही लोकं त्याचा वापर करतात. तुम्ही देखील असंच करत आहात का? तर वेळीच सावध व्हा. कारण तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर केल्यास फोनच्या स्क्रीनच्या सुरक्षेवर परिणाम होतो. तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर केल्यास स्मार्टफोनवर कसा परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: istock) 

स्क्रीनची सुरक्षा कमी होऊ शकते

टेम्पर्ड ग्लासचे मुख्य काम मोबाईलच्या डिस्प्लेला स्क्रॅच आणि झटक्यांपासून वाचवण्याचे आहे. जेव्हा ग्लासमध्ये तडा जातो, त्यानंतर त्याची मजबुती कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत, फोन पुन्हा पडल्यानंतर किंवा त्याला जोरात झटका लागल्यानंतर डिस्प्लेला नुकसान पोहोचू शकते. तुटलेले टेम्पर्ड ग्लास काही प्रमाणात सुरक्षितता देऊ शकतो, मात्र तो पूर्वीइतक्याच पातळीवरील संरक्षणाची खात्री देऊ शकत नाही. त्यामुळे तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर करणं टाळा.

काचेच्या तुकड्यांनी नुकसान होऊ शकते

तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर करण्याचे दुसरे मोठे नुकसान म्हणजेच तीक्ष्ण आणि बाहेर आलेल्या कडा. तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासमधून काचेचे छोटे तुकडे बाहेर आल्यास फोनचा वापर करताना ते काचेचे तुकडे तुमच्या बोटांना लागू शकतात, यामुळे तुम्हाला इजा होऊ शकते.

सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड… गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

टचस्क्रीनवर देखील होऊ शकतो परिणाम

तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर केल्याने केवळ स्क्रीनची सुरक्षा कमी होत नाही तर यामुळे मोबाईलच्या टचस्क्रीनवर देखील परिणाम होऊ शकतो. टेम्पर्ड ग्लासचा एखादा भाग निघाला असेल किंवा डिस्प्लेवर दबाव टाकत असेल तर टचस्क्रीनचा वापर करण्यात अडचण येऊ शकते. यामुळे स्क्रीनवरील टच रिस्पॉन्स खराब होऊ शकतो. तसेच स्क्रीनवर लाईन दिसत असतील, किंवा डिस्प्लेमध्ये इतर कोणतीही समस्या असेल, तर फोन तपासून घ्या. तुटलेल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर केल्याने तुमच्या फोनचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे नेहमी चांगल्या टेम्पर्ड ग्लासचा वापर करा. यामुळे फोनची सुरक्षा वाढते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: मोबाईलचा टेम्पर्ड ग्लास तुटल्यास काय करावे?

    Ans: टेम्पर्ड ग्लासला तडा गेला असेल किंवा तो तुटला असेल, तर शक्य तितक्या लवकर तो बदलून घ्यावा.

  • Que: तुटलेला टेम्पर्ड ग्लास वापरणे सुरक्षित आहे का?

    Ans: नाही. तुटलेल्या ग्लासच्या तीक्ष्ण कडांमुळे बोटांना इजा होऊ शकते आणि स्क्रीनचे संरक्षणही कमी होऊ शकते.

  • Que: टेम्पर्ड ग्लासला तडा गेल्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनचे नुकसान होऊ शकते का?

    Ans: होय. तुटलेला टेम्पर्ड ग्लास पूर्वीसारखे संरक्षण देईलच असे नाही. त्यामुळे फोनला पुन्हा जोराचा धक्का लागल्यास स्क्रीनचे नुकसान होऊ शकते.

Web Title: Are you also using broken tempered glass on your smartphone these will be disadvantages hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • smartphone tips
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Tech Tips: कधीकाळचं कूल Username आता वाटतंय बोरिंग? आता Instagram वर असं बदला तुमचं नाव, फॉलो करा या स्टेप्स
1

Tech Tips: कधीकाळचं कूल Username आता वाटतंय बोरिंग? आता Instagram वर असं बदला तुमचं नाव, फॉलो करा या स्टेप्स

तगडे फीचर्स आणि किंमत 20 हजारांहून कमी… नवा Tecno Spark स्मार्टफोन भारतात लाँच, या दिवशी सुरु होणार विक्री
2

तगडे फीचर्स आणि किंमत 20 हजारांहून कमी… नवा Tecno Spark स्मार्टफोन भारतात लाँच, या दिवशी सुरु होणार विक्री

Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे
3

Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे

सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड… गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
4

सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड… गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.