Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे

वीने भारतातील पहिला प्रीपेड फॅमिली प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनेक सुविधा ऑफर केल्या जाणार आहेत. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याचा डेटा संपला असेल किंवा कमी डेटा शिल्लक असेल, तर त्याला सहज डेटा शेअर करण्याची सुविधा ग्राहकांना मिळते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 17, 2026 | 02:17 PM
Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे

Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे

Follow Us
Follow Us:
  • भारतातील पहिला प्रीपेड फॅमिली प्लॅन लाँच
  • प्रीपेड फॅमिली प्लॅन पारंपारिक प्लॅन्सपेक्षा खूप वेगळा
  • बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांचा समावेश असलेली नवीन जाहिरात मोहीम
भारतातील टेलिकॉम क्षेत्रात ‘वी’ ने एक मोठी क्रांती घडवली आहे. ‘वी’ ने भारतातील पहिला प्रीपेड फॅमिली प्लॅन लाँच केला आहे. याअंतर्गत प्रीपेड ग्राहकांना ‘वी’ ॲपवर देशात कुठूनही ‘वी प्रीपेड फॅमिली’ तयार करण्याची सुविधा मिळणार आहे. यामध्ये ज्यामध्ये डेटा शेअरिंग, खात्रीशीर बचत आणि विशेष ऑफर्सचा फायदा समाविष्ट असणार आहे. ‘वी पे सब है व्हीआयपी’ या विचारासह प्रत्येक यूजरला महत्त्वाचे फायदे मिळाले पाहिजेत, असा ब्रँडचा विश्वास आहे. कंपनीचा हाच विचार सत्यात उतरवण्यासाठी टेलिकॉम कंपनी ‘वी’ ने ‘वी प्रीपेड फॅमिली प्लॅन’ लाँच केला आहे. विशेष म्हणजेच हा भारतातील पहिला प्रीपेड फॅमिली प्लॅन आहे.

सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड… गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

डेटा शेअर करण्याची सुविधा

‘वी’ ने लाँच केलेला प्रीपेड फॅमिली प्लॅन पारंपारिक प्लॅन्सपेक्षा खूप वेगळा आहे. भारतातील पहिलाच असा हा प्लॅन ज्याचा लाभ घेऊन कुटुंबातील सदस्य देशात कुठेही राहून एकमेकांसोबत डेटा शेअर करू शकतात. हे नवीन वैशिष्ट्य पारंपारिक प्रीपेड अनुभवात बदल घडवून आणते. याद्वारे ग्राहक सहजपणे डेटा शेअर करू शकतात. उदाहरणार्थ, जर कुटुंबातील एखाद्या सदस्याचा डेटा संपला असेल किंवा कमी डेटा शिल्लक असेल, तर त्याला सहज डेटा शेअर करण्याची सुविधा ग्राहकांना मिळते.

वी प्रीपेड फॅमिली प्लॅन

सध्याच्या काळात इंटरनेट डेटा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण जर अचानक डेटा संपला तर डिजिटल सोयीसुविधांचा वापर करण्यात अडथळे येऊ शकतात. इंटरनेट डेटाशिवाय व्हिडिओ कॉल, ऑनलाइन क्लासम, मॅप्स किंवा आवश्यक ॲप्सचा वापर केला जाऊ शकत नाही. अशावेळी आपण आपल्या कुटूंबातील सदस्यांना मदत करत त्यांच्यासोबत मोबाईल डेटा शेअर करतो. मात्र आता ‘वी प्रीपेड फॅमिली प्लॅन’ हे चित्र बदलत आहे.

‘वी’ ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक रिचार्जवर १० टक्क्यांपर्यंत खात्रीशीर डिस्काउंट

सर्व ॲक्टिव्ह ‘वी’ प्रीपेड ग्राहक ‘वी’ ॲपचा वापर करून चार सदस्यांपर्यंतचा एक फॅमिली ग्रुप तयार करू शकतात. या ग्रुपमध्ये एक मुख्य सदस्य आणि इतर तीन सदस्य असतील. प्रत्येक सदस्य आपला मूळ प्रीपेड प्लॅन आणि त्याची वैधता कायम ठेवेल, तसेच त्यांना डेटा शेअर करण्याची आणि आपल्या कुटुंबाशी संपर्कात राहण्याची सुविधाही मिळेल. ‘वी’ प्रीपेड फॅमिली’चे सदस्य, ज्या कुटुंबातील सदस्याचा डेटा संपला आहे किंवा कमी झाला आहे, त्यांना ५०० MB डेटा शेअर करू शकतात, ज्यामुळे त्यांना ऑनलाइन राहण्यास मदत होते. याशिवाय, फॅमिली ग्रुपमधील प्रत्येक सदस्याला ‘वी’ ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक रिचार्जवर १० टक्क्यांपर्यंत खात्रीशीर डिस्काउंट मिळेल.

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांचा समावेश असलेली नवीन जाहिरात मोहीम या प्लॅनची ​​प्रमुख वैशिष्ट्ये आणि ब्रँडचे आश्वासन अधोरेखित करते ‘वी पे सब है व्हीआयपी’. या जाहिरातीत, शाहरुख खान स्पष्ट करतात की हा ‘वी’ प्रीपेड प्लॅन कसा भारतातील विविध शहरांत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना एकमेकांशी सदैव जोडलेले ठेवतो. ग्राहक वेगवेगळ्या टेलिकॉम सर्कल्समधूनही आपला फॅमिली ग्रुप तयार करू शकतात, पात्र कुटुंब सदस्यांना यात जोडू शकतात, आणि डेटा शेअरिंगसह फॅमिली मॅनेजमेंट तसेच विशेष रिवॉर्ड्सचा आनंद घेऊ शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Vi Prepaid Family Plan म्हणजे काय?

    Ans: Vi Prepaid Family Plan ही प्रीपेड ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेली सुविधा आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्य एक फॅमिली ग्रुप तयार करून एकमेकांसोबत मोबाईल डेटा शेअर करू शकतात.

  • Que: Vi Prepaid Family Plan मध्ये किती सदस्य सहभागी होऊ शकतात?

    Ans: या प्लॅनमध्ये एका फॅमिली ग्रुपमध्ये जास्तीत जास्त 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. यामध्ये एक प्रायमरी मेंबर आणि तीन सेकंडरी मेंबर्स असतील.

  • Que: Vi च्या फॅमिली प्लॅनमध्ये किती डेटा शेअर करता येतो?

    Ans: कुटुंबातील ज्या सदस्याचा डेटा संपला आहे किंवा कमी पडत आहे, त्याला एका वेळी 500MB डेटा शेअर करता येतो.

Web Title: Vi launches indias first prepaid family plan share 500mb data with family members and get up to 10 percent off on recharges hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • telecom company

संबंधित बातम्या

सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड… गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
1

सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड… गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?
2

AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट
3

नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express
4

आता वर्षभर रिचार्जचे नो टेंशन! हा आहे Airtel चा जबरदस्त प्लॅन… डेटा-कॉलिंगसह मोफत मिळणार Adobe Express

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.