
Tech Tips: कधीकाळचं कूल Username आता वाटतंय बोरिंग? आता Instagram वर असं बदला तुमचं नाव, फॉलो करा या स्टेप्स
विशेषत: इंस्टाग्राम वापरणाऱ्या यूजर्सना अनेकदा त्यांचे यूजरनेम बदलावे असे वाटते. पण इंस्टाग्राम यूजरनेम कसे बदलावे, हे अनेकांना माहिती नसते. काही लोकांना वाटते की, नवीन इंस्टाग्राम यूजरनेमसाठी आपल्याला दुसरे अकाऊंट तयार करावे लागते. पण असं नाही. कारण तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटचे यूजरनेम बदलू शकता. (फोटो सौजन्य: istock)
इंस्टाग्रामवर तुमचे युजरनेम हे तुमच्या प्रोफाईलवर दिसणाऱ्या डिस्प्ले नेमपेक्षा वेगळे ठेवले जाते. यूजरनेम तुमच्या प्रोफाईल पेजवर सर्वात वरच्या बाजूला दिसते. हे तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाईल यूआरएलचा भाग असते. यासाठी यूजरनेम युनिक असणं गरजेचं असतं. यामध्ये लेटर्स, नंबर्स, पीरियड्स आणि अंडरस्कोर समाविष्ट असू शकतं. डिस्प्ले नेम यूनिक असण्याची गरज नसते आणि त्यावर अशा प्रकारचे निर्बंध लागू होत नाहीत. यूजरनेम बदलण्यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट
यूजरनेम अपडेट केल्यानंतर इंस्टाग्राम तुम्हाला 14 दिवसांचा लॉक-इन पीरियड देतो. म्हणजेच यूजरनेम सेव्ह केल्यानंतर 14 दिवसांत तुमचा विचार बदलला, तर तुम्ही पुन्हा तुमच्या जुन्या यूजरनेमवर स्विच करू शकता. 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुमचे जुने यूजरनेम पब्लिक होते. म्हणजेच कोणताही दुसरा यूजर तुमचे जुने यूजरनेम क्लेम करू शकतो. यूजरनेम अपडेट झाल्यानंतर तुमचे प्रोफाईल यूआरएल त्वरित बदलणार आहे.
Ans: नाही, नवीन अकाउंट तयार करण्याची गरज नाही. जुन्या अकाउंटमधील Edit Profile पर्यायातून तुम्ही Username बदलू शकता.
Ans: इंस्टाग्राम प्रोफाइल उघडा, Edit Profile वर टॅप करा, यूजरनेम निवडा, नवीन Username टाका आणि बदल सेव्ह करा.
Ans: होय, इंस्टाग्राम वरील प्रत्येक यूजरनेम युनिक असणे आवश्यक आहे. आधीपासून वापरात असलेले Username तुम्हाला निवडता येणार नाही.