
सावधान! प्ले स्टोअरवर आले बनावट WhatsApp, लाखो यूजर्सनी केले डाउनलोड... गुगल प्ले स्टोअरची सुरक्षा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात
AI चॅटबोटला अपशब्द बोलता? Anthropic ने जारी केला नवा नियम, अकाउंट बंद होणार की नाही?
अलीकडेच गुगल प्ले स्टोअरवर व्हाट्सॲपचे नकली वर्जन आढळले आहे. हे वर्जन हुबेहूब खऱ्या व्हाट्सॲपसारखे दिसते. त्याचा लोगो आणि ॲपचे नाव देखील अगदी खऱ्यासारखेच आहे. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणारे हे ॲप पाच लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे. त्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.
अँड्रॉइड ऑथॉरिटीने शेअर केलेल्या एका रिपोर्ट नुसार, अलीकडेच समोर आलेल्या बनावट गुगल क्रोम ॲपनंतर आता बनावट व्हाट्सॲप ॲप देखील समोर आले आहे. बनावट गुगल क्रोम ॲप प्ले स्टोअरमधून हटवण्यापूर्वी त्याला एक लाखांहून अधिक लोकांनी डाउनलोड केले होते. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या बनावट व्हाट्सॲप ॲपची साईझ 42 MB आहे. असं सांगितलं जात आहे की डेव्हलपरने जास्तीत जास्त लोकांची फसवणूक करण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांनी हे ॲप डाऊनलोड करावे यासाठी त्याला बूस्ट केले आहे. युजर्सद्वारे शेअर करण्यात आलेल्या स्क्रीनग्रॅबमध्ये हे ॲप एक स्पॉन्सर्ड सजेशन म्हणून दिसत आहे.
अब्जावधी लोक वापरत असलेले खरे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप WhatsApp LLC डेव्हलपरच्या नावाने लिस्टेड आहे तर बनावट व्हॉट्सॲप Agment Assets sallu नावाच्या डेव्हलपरने पब्लिश केले आहे. या बनावट ॲपचे डिस्क्रिप्शन टेक्स्ट व्हॉट्सॲपच्या ऑफिशियल प्ले स्टोअर डिस्क्रिप्शनवरून कॉपी करण्यात आले आहे. स्पेसिंग आणि काही वाक्य एडिट करण्यात आली आहेत. बनावट लिस्टिंगमध्ये काही सब हेड्स, पराग्राफ्स, आणि टर्म्स ऑफ सर्विस आणि लर्न मोअरच्या लिंक्स गायब आहेत.
नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट
इतकेच नाही तर स्क्रीनशॉट आणि जाहिराती देखील कॉपी करण्यात आल्या आहेत. बनावट ॲपमध्ये एकच इमेज दोन वेळा पाहायला मिळत आहे. अँड्रॉइड ऑथॉरिटीने असा दावा केला आहे की, हे बनावट ॲप सप्टेंबर महिन्यात पब्लिश करण्यात आले आहे आणि यूजर रिव्ह्यू रोखण्यासाठी गुगल प्लेच्या अर्ली ॲक्सेसचा चुकीचं वापर केला जात असावा. अँड्रॉईड युजर्सनी लक्षात घेतले पाहिजे की गुगल प्ले स्टोअर मध्ये जेव्हा व्हाट्सॲप मेसेंजर सर्च केले जाते तेव्हा बनावट ॲप टॉप रिझल्ट्समध्ये दिसत नाही. अलीकडेच प्ले स्टोअरवर बनावट गुगल क्रोम आढळले होते त्यानंतर आता बनावट व्हाट्सॲप आढळल्याने प्ले स्टोअरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
Ans: होय. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, Google Play Store वर WhatsApp सारखे दिसणारे बनावट ॲप आढळले असून, ते 5 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले होते.
Ans: ॲपचे नाव, लोगो, डेव्हलपरचे नाव आणि अधिकृत माहिती तपासा. खरे WhatsApp ॲप Google Play Store वर WhatsApp LLC या डेव्हलपरच्या नावाने उपलब्ध असते.
Ans: रिपोर्टनुसार, बनावट ॲप Agment Assets sallu या डेव्हलपरच्या नावाने लिस्ट करण्यात आले होते.