Ashish Chanchlani की CarryMinati, कोणं करत सर्वात जास्त कमाई? सोशल मीडियावर कोणाची हवा?
व्हिडीओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म युट्यूबवर विविध कंटेट क्रिएटर्स वेगवेगळ्या विषयावरील व्हिडीओ पोस्ट करतात. युट्यूबद्वारे लोकांना केवळ ओळखच मिळत नाही तर ते पैसे देखील कमावत आहेत. जगभरात युट्यूबचा दबदबा आहे. भारतात देखील युट्यूबची क्रेझ आहे. जेव्हा भारतातील टॉप यूट्यूबर्सचा विचार केला जातो, तेव्हा आशिष चंचलानी आणि कॅरीमिनाटी ही नावं प्रत्येकाच्या मनात येतात. दोन्ही युट्यूबर्सच्या व्हिडीओचे टॉपिक्स वेगळे असतात, त्यांची एक वेगळी ओळख आहे आणि दोन्ही युट्यूबर्स त्यांच्या अनोख्या टॅलेंटसाठी ओळखले जातात.
आशिष चंचलानी आणि कॅरीमिनाटीची फॅन फॉलोविंग प्रचंड आहे. दोन्ही युट्यूबर्सची कंटेट स्टाईल पूर्णपणे वेगळी आहे. मात्र अशात आता अनेकांच्या मनात एक प्रश्न आहे की, आशिष चंचलानी आणि कॅरीमिनाटीमध्ये सर्वात जास्त कमाई कोणं करतं. चला तर मग आता आम्ही फॅन्सच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. (फोटो सौजन्य – Pinterest)
आज प्रत्येक भारतीय यूट्यूब युजर आशिष चंचलानीला ओळखतो. त्याच्या चॅनेलचे नाव “Ashish Chanchlani Vines” असं आहे. त्याच्या चॅनेलवर 30 मिलियनहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. आशिष त्याच्या कॉमेडी स्केच आणि कौंटुबिक हास्य व्हिडीओसाठी ओळखला जातो. आशिष स्क्रिप्टेड व्हिडीओ बनवतो, ज्यामध्ये त्याचे संपूर्ण मित्र परिवार आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक व्हिडीओमध्ये लाखो व्ह्युज मिळणं त्याच्यासाठी एक सामान्य गोष्ट आहे.
कमाईबद्दल बोलायचं झालं तर आशिषला YouTube AdSense, ब्रँड डील, इंस्टाग्राम प्रमोशन, लाईव्ह शो आणि चित्रपट/OTT अपिअरन्स अशा अनेक स्रोतांमधून उत्पन्न मिळते. रिपोर्ट्सनुसार, आशिष एका महिन्यात सहजपणे 20 ते 25 लाख कमवतो. Amazon, Mivi आणि Oyo सारखे मोठे ब्रँड त्याच्यासोबत पार्टनरशिप करतात.
अजय नागर म्हणजेच कॅरीमिनाटी त्याच्या रोस्ट व्हिडीओ आणि गेमिंग कंटेटसाठी ओळखला जातो. त्याचा चॅनल Carry Minati वर 42 मिलियन हून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. तो भारतातील सर्वाधिक सबस्क्राइब केलेला युट्यूबर बनला आहे. तो कॅरीइजलाइव्ह नावाचे गेमिंग चॅनल देखील चालवतो, जिथे तो लाईव्ह स्ट्रीमिंग करतो आणि लाखो ऑडियंस त्याच्यासोबत जोडली जातो.
कॅरीचा उत्पन्नाचा स्रोत यूट्यूबपेक्षा खूप मोठा आहे. तो केवळ यूट्यूब जाहिरातींमधूनच पैसे कमवत नाही तर सुपरचॅट, ब्रँड डील, म्युझिक व्हिडिओ आणि लाईव्ह इव्हेंटमधूनही भरपूर कमाई करतो. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅरीमिनाटी दरमहा 25 ते 35 लाख किंवा त्याहूनही अधिक कमाई करतो. त्याच्या गाण्यांना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे त्याला म्यूझिक प्लॅटफॉर्मवरून रॉयल्टी देखील मिळते.
कॅरीमिनाटी सध्या कमाईच्या बाबतीत आशिष चंचलानीपेक्षा पुढे आहे. जरी दोघेही आपापल्या क्षेत्रात अव्वल स्थानावर असले तरी, आशिष स्क्रिप्टेड कॉमेडीमध्ये आहे तर कॅरी रिअॅक्शन आणि रोस्टमध्ये आहे.