Acer चा बजेट फ्रेंडली AI लॅपटॉप भारतात लाँच, विद्यार्थ्यांसाठी ठरणार वरदान! केवळ इतकी आहे किंंमत, जाणून घ्या फीचर्स
लॅपटॉपच्या मदतीने आपण आपली अनेक कामं अगदी सहज पूर्ण करू शकतो. सध्याच्या डिजीटील काळात आपल्यासाठी लॅपटॉप अत्यंत गरजेचं डिव्हाईस आहे. कारण शाळा असो ऑफीस असो किंवा कॉलेज, आपल्याला आपल्या अनेक कामांसाठी लॅपटॉपची गरज असते. अशी अनेक कामं आहेत, जी आपण आपल्या स्मार्टफोनवर पूर्ण करू शकत नाही, अशाच कामांसाठी आपण लॅपटॉप खरेदी करतो. पण सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या लॅपटॉपच्या किंमती प्रचंड आहेत. त्यामुळे अनेकजण हे महागडे लॅपटॉप खरेदी करणं टाळतात.
तुम्ही देखील नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहात का, पण तुमचं बजेट कमी आहे. आता आम्ही तुम्हाला एका बजेट फ्रेंडली लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत. Acer ने Acer Aspire Go 14 हा नवीन बजेट फ्रेंडली लॅपटॉप भारतात लाँच केला आहे. हा लॅपटॉप विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे. या लॅपटॉपची किंमत बजेट रेंजमध्ये आहे. (फोटो सौजन्य – X)
Acer Aspire Go 14 शुक्रवारी भारतात लाँच करण्यात आला आहे. हा कंपनीचा बजेट फ्रेंडली AI-पावर्ड लॅपटॉप आहे. असं सांगितलं जात आहे की, विद्यार्थी, होम यूजर्स किंवा पहिल्यांदा लॅपटॉप वापरणाऱ्या युजर्ससाठी हे एक उत्तम डिव्हाईस असणार आहे. हा लॅपटॉप Intel Core Ultra 7 H-series CPU सह लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाईस 55Wh थ्री-सेल बॅटरीसह 65W USB-C अडॅप्टरला सपोर्ट करतो. लॅपटॉपमध्ये कोपायलट की आणि इंटेलचा AI Boost NPU देण्यात आला आहे. Aspire Go 14 मध्ये 14-इंच WUXGA डिस्प्ले आणि स्लीक एल्यूमिनियम बिल्ड आहे.
Acer Aspire Go 14 लॅपटॉप भारतात 59,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. हा लॅपटॉप प्योर सिल्वर फिनिशसह उपलब्ध आहे. Acer वेबसाइटसह, लॅपटॉप ऑफलाइन Acer एक्सक्लूसिव स्टोर्स आणि Amazon द्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. Acer Aspire Go 14 चा OLED व्हेरिअंट Core Ultra 7 155H CPU आणि 32GB रॅमपर्यंत सपोर्ट करतो.
Acer Aspire Go 14 मध्ये 14-इंच WUXGA IPS डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 16:10 आस्पेक्ट रेशियो आहे. हे डिव्हाईस Intel Core Ultra 7 H-series CPU, Intel Arc Graphics, आणि Intel AI Boost NPU ने सुसज्ज आहे. लॅपटॉप 32GB DDR5 पर्यंत रॅम आणि 1TB PCIe Gen 3 SSD पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो. हे डिव्हाईस आउट-ऑफ-द-बॉक्स Windows 11 वर चालतो.
Acer Aspire Go 14 मध्ये डेडिकेटेड Copilot Key आहे. यामध्ये अनेक AI फीचर्स देखील आहेत, जे युजर्सना टेक्स्ट समराइज करण्यासाठी आणि वॉईसद्वारे एक्शन्स करण्यासाठी मदत करतात. लॅपटॉपमध्ये HD वेबकॅम देखील आहे, ज्यामध्ये प्रायव्हसीसाठी फिजिकल शटर आहे. Acer Aspire Go 14 मध्ये 55Wh 3-सेल बॅटरी आहे आणि हे 65W USB-C अडॅप्टरला सपोर्ट करते. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.2, एक RJ45 पोर्ट, दोन USB 3.2 Type-A पोर्ट्स आणि दोन USB Type-C पोर्ट्स यांचा समावेश आहे, ज्यामधील एक DisplayPort सपोर्ट आहे आणि चार्जिंगसाठी आहे. स्लीक एल्युमिनियम चेसिसचे वजन 1.5kg आहे आणि याची थिकनेस 17.5mm आहे.