
ग्राहकांना मोठा धक्का! Smartphone खरेदी करताय, मग जरा थांबा! रातोरात 'या' 16 स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या (फोटो सौजन्य-Gemini)
तुम्ही नवा स्मार्टफोन खेरीद करण्याचा प्लॅन आखत आहात का? असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. भारतातील अनेक लोकप्रिय मोबाईलच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी याचा ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये रियलमी, रेडमी, एआय प्लस, मोटोरोला आणि इतर अनेक ब्रँड्सनी त्यांच्या सध्याच्या अनेक फोन्सच्या किमती लॉन्चच्या वेळी असलेल्या किमतींपेक्षा वाढवल्या आहेत. ही सर्वात मोठी दरवाढ असून केवळ हाय-एंड फोन्सपुरती मर्यादित नाही. बजेट आणि मिड-रेंज स्मार्टफोन्ससुद्धा महाग झाले आहेत. याचा अर्थ एंट्री-लेव्हलपासून ते प्रीमियम सेगमेंटपर्यंत, सर्वच श्रेणींमध्ये किमती वाढल्या आहेत.
हात न लावता घर होणार स्वच्छ! Dreame चे नवे रोबोट व्हॅक्यूम क्लीनर भारतात लाँच
मिळालेल्या माहितीनुसार, हा बदल १ एप्रिल २०२६ पासून लागू झाला असून अंदाजे १६ स्मार्टफोन्सच्या किमतीत ₹५०० ते ₹३,००० पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे, जर तुम्ही फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील.
१. मोटोरोला जी०६ पॉवर
२. एआय+ पल्स
३. एआय+ नोव्हा ५जी
४. रेडमी १५सी ५जी
५. रेडमी १५ ५जी
६. रेडमी नोट १५ ५जी
७. रियलमी सी७१ ४जी
८. रियलमी सी८३ ५जी
९. रियलमी पी३ अल्ट्रा ५जी
१०. रियलमी पी४ प्रो ५जी
११. रियलमी पी४ लाईट ५जी
१२. रियलमी १५ ५जी
१३. रियलमी १५टी ५जी
१४. रियलमी १५एक्स ५जी
१५. रियलमी सी८५ ५जी
१६. रियलमी १६ प्रो ५जी
भारतात एंट्री-लेव्हल, अफोर्डेबल, बजेट, मिड-रेंज आणि अप्पर मिड-रेंज सेगमेंटमधील सर्व स्मार्टफोन महाग झाले आहेत. Ai+ Pulse, जो 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी ₹7,499 मध्ये लॉन्च झाला होता, तो आता ₹7,999 मध्ये उपलब्ध आहे. म्हणजेच ₹500 ची वाढ झाली आहे. 6GB + 128GB व्हेरिएंट देखील ₹500 ने महाग झाला आहे. Redmi 15C 5G, जो भारतात 4GB + 128GB व्हेरिएंटसाठी ₹13,999 मध्ये लॉन्च झाला होता, त्याची किंमत आता ₹15,499 झाली आहे, म्हणजेच ₹1,500 ची वाढ झाली आहे.
मोटोरोलाबद्दल बोलायचे झाल्यास, Moto G06 Power, जो ₹7,499 मध्ये लॉन्च झाला होता, त्याच्या किमतीत आता ₹2,500 ची वाढ झाली असून, त्याची किंमत ₹9,999 झाली आहे. त्याचबरोबर, रियलमीबद्दल बोलायचे झाल्यास, रियलमी पी3 अल्ट्राच्या किंमतीत आता 3000 रुपयांची वाढ झाली आहे, ज्यामुळे 8 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 25,999 रुपयांवरून 28,999 रुपये झाली आहे.