Samsung चे Galaxy A57 5G आणि A37 5G लाँच; AI फीचर्समुळे स्मार्टफोन अनुभव अधिक स्मार्ट
मुंबई : सॅमसंगचे नुकतेच लाँच करण्यात आलेल्या गॅलेक्सी ए५७ ५जी आणि गॅलेक्सी ए३७ ५जी या डिवाईसेसनी नवीन वैशिष्ट्यांसह एआय अनुभव अधिक उत्साहित केला आहे. या नवीन वैशिष्ट्यांनी आवाज व भाषांतर क्षमतांमध्ये वाढ केली आहे. इतर अपग्रेड्समध्ये मल्टी-असिस्टण्ट परिसंस्था व प्रगत फोटोग्राफी वैशिष्ट्यांचा समावेश आहे, तसेच गती, सुरक्षितता व कार्यक्षमतेसाठी डिवाईसवरील प्रोसेसिंग प्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले आहे.
गॅलेक्सी ए५७ ५जी व ए३७ ५जीमधील नाविन्यतांमध्ये अग्रस्थानी आहे डायरेक्ट वॉईसमेल, जे कॉलर्सना उत्तर न दिल्यास १०० टक्के अचूकतेसह संदेश पाठवण्याची सुविधा देते, ज्यामुळे वापरकर्ते कॉलरच्या आवाजामध्ये संदेश ऐकू शकतात. हे संदेश एआयद्वारे ट्रान्स्क्राइब केले जातात आणि नेटवर्क ऑपरेटर्सवर अवलंबून न राहता डिवाईसमध्ये सुरक्षितपणे स्टोअर राहतात. तसेच, भारतात इंग्रजी, हिंदी व गुजराती भाषांमध्ये उपलब्ध असलेले एन्हान्स ट्रान्सलेशन व ट्रान्स्क्रिप्शन वैशिष्ट्य वॉईस मेसेजेसना मजकूरामध्ये बदलते आणि भाषांतर करते, ज्यामुळे वापरकर्ते त्यांच्या स्वत:च्या भाषेमध्ये संदेश वाचू शकतात.
ई-मेल आयडी प्रोफेशनल नाही? चिंता नको! आता क्षणातच बदलू शकता तुमचे यूजरनेम, फक्त फॉलो करा या स्टेप्स
वाहतूक, विमानतळ, मार्केटप्लेस किंवा मेट्रो अशा गोंगाटाच्या ठिकाणी कॉल कॅप्शन्स एकाच वेळी वाचन व ऐकण्यासाठी रिअल-टाइम ट्रान्स्क्रिप्शन देते, तर वॉईस फोकस गोंगाटामध्ये आसपासचा आवाज कमी करत कॉल्सदरम्यान स्पष्टपणे ऐकू येण्याची खात्री देते.
सॅमसंगच्या एआयचे लोकशाहीकरण करण्याप्रती कटिबद्धतेशी बांधील राहत गॅलेक्सी ए५७ ५जी व ए३७ ५जी मध्ये स्मार्टफोन अनुभवाच्या विविध पैलूंमधील ऑसम इंटेलिजन्स आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मल्टी-असिस्टण्ट परिसंस्था, जेथे वन यूआय ८.५ अंतर्गत बिक्स्बी, जेमिनी व परप्लेक्सिटीचा समावेश आहे, ज्यामुळे वापरकर्ते त्यांच्या टास्क्ससाठी सर्वोत्तम असिस्टण्टची निवड करू शकतात. यामुळे वापरकर्त्यांना पाहिजे असलेल्या एआयचा वापर करण्याचा पर्याय मिळतो आणि माहितीचा शोध, कन्टेन्टचा सारांश व डिवाईस नियंत्रणासाठी एकाच यंत्रणेवरील अवलंबन दूर होते.
हार्डवेअरमध्ये करण्यात आलेल्या सुधारणा या एआय वैशिष्ट्यांना अधिक साह्य करतात. गॅलेक्सी ए५७ ५जी मध्ये एक्झिनॉस १६८० प्रोसेसर आहे, जे ३३ टक्के अधिक एनपीयू कार्यक्षमता देते, तर गॅलेक्सी ए३७ ५जी एक्झिनॉस १४८० प्रोसेसरवर चालतो, जेथे मागील जनरेशनच्या तुलनेत एनपीयू कार्यक्षमतेध्ये १६२ टक्के सुधारणा करण्यात आली आहे. हे अपग्रेडेड प्रोसेसर्स डिवाईसवरील एआय क्षमतेमध्ये अधिक वाढ करतात, इमेज प्रोसेसिंग, ट्रान्स्क्रिप्शन व व्हिज्युअल सर्च अशा टास्क्सना जलदपणे करते, तसेच क्लाऊड प्रोसेसिंगवरील अवलंबन कमी करते.
सर्कल टू सर्च विथ गुगल व्हिज्युअल डिस्कव्हरी वैशिष्ट्य आता अपग्रेड करण्यात आले आहे, ज्यामुळे वापरकर्ते अॅप्समध्ये बदल न करता त्यांच्या स्क्रिनमधून प्रत्यक्ष एकाच इमेजमध्ये विविध वस्तूंचा शोध घेऊ शकतात. कॅमेरा सिस्टममध्ये एआय एकीकरण देखील करण्यात आले आहे. ही सिस्टम बाहेरील स्थितींनुसार समायोजित होते, कॅप्चर केल्या जाणाऱ्या घटकांना ओळखते आणि सुस्पष्ट फोटोसाठी कमी आवाज व नैसर्गिक स्किन टोनसह आपोआपपणे फोटोंमध्ये सुधारणा करते.
एआय-समर्थित एडिटिंग टूल्स देखील सुधारण्यात आले आहेत. सुधारित ऑब्जेक्ट इरेजर प्रत्यक्ष डिवाईसवर फोटोंमध्ये नको असलेले घटक दूर करते, तर बेस्ट फेस विविध फ्रेम्सना एकत्र करत सुस्पष्टपणे ग्रुप फोटो कॅप्चर करते, जेथे प्रत्येक घटकासाठी सानुकूल अभिव्यक्तींची निवड करते.
वैयक्तिक वैशिष्ट्यांव्यतिरिक्त ऑपरेटिंग सिस्टममध्ये एआयचा समावेश करण्यात आला आहे. वन यूआय ८.५ मध्ये एआय-संचालित प्रायव्हसी अलर्ट्स आहेत, जे अॅप्स कॉन्टॅक्ट्स, फोटो किंवा लोकेशन असा संवेदनशील डेटा अॅक्सेस करत असताना वापरकर्त्यांना सूचित करते. गॅलेक्सी ए५७ ५जी आणि गॅलेक्सी ए३७ ५जी सह सॅमसंग एआयला दैनंदिन स्मार्टफोन वापरामध्ये एकीकृत करण्यात आलेले व्यावहारिक उपयुक्त वैशिष्ट्य म्हणून स्थित करते, जे डिवाईसमध्ये अर्थपूर्ण अपग्रेड्सचा शोध घेत असलेल्यांसाठी परिपूर्ण आहे.






