
फोटो सौजन्य सोशल मिडिया
‘आजूबाजूचे लोक टीका करण्याआधी तुमची ऑडिओ उत्पादने अपग्रेड करा’ या संकल्पनेवर आधारित ही मोहीम सणासुदीच्या आणि दैनंदिन जीवनातील ओळखीच्या प्रसंगांमधून योग्य तंत्रज्ञानामुळे संगीत ऐकण्याचा, घरच्या घरी मनोरंजनाचा आनंद घेण्याचा आणि खास क्षण साजरे करण्याचा अनुभव कसा अधिक चांगला होऊ शकतो, हे दाखवते.
दिवाळीच्या काळात ग्राहक घरांची सजावट, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य देतात, मात्र दैनंदिन वापरातील ऑडिओ आणि इतर तंत्रज्ञान उपकरणांकडे अनेकदा दुर्लक्ष होते. बोटने याच ‘फेस्टिव्ह मिसमॅच’ संकल्पनेच्या माध्यमातून हलक्याफुलक्या शैलीत हे अधोरेखित केले आहे की, सणासुदीच्या तयारीत केवळ घर आणि पेहरावच नव्हे, तर मनोरंजन आणि कनेक्टिव्हिटीशी संबंधित उत्पादनांचे अपग्रेड करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
या मोहिमेतील तीन डिजिटल चित्रफितींमधून ही संकल्पना वेगवेगळ्या प्रसंगांच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. रवी किशन एका कार्यालयीन प्रसंगात दिसतात, जिथे वेगवेगळ्या मतांमुळे साध्या संभाषणाचे रूपांतर विनोदी गोंधळात होते आणि बोटचे उत्पादन ही परिस्थिती हाताळण्यास मदत करते. श्रेया कालरा यांच्या चित्रफितीत दिवाळीच्या पार्टीत खराब आवाजाच्या गुणवत्तेमुळे बिघडणारा माहोल बोटचे स्पीकर्स कसे सुधारतात हे दाखवले आहे, तर सूफी मोतीवाला घरात मित्र-परिवारासोबत वेळ घालवताना उत्तम ध्वनी गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित करतात.
बोटच्या प्रवक्त्याने सांगितले की , “सणासुदीचा काळ ग्राहकांसाठी दैनंदिन वापरातील तंत्रज्ञानाशी संबंधित उत्पादनांचे पुनर्मूल्यांकन आणि अपग्रेड करण्याची महत्त्वाची संधी असते. ‘अपग्रेड टू बोट’च्या माध्यमातून आम्हाला ही संकल्पना सहज आणि मनोरंजक पद्धतीने मांडायची होती. सणासुदीच्या काळात प्रत्येकाचे स्वतःचे मत असते; मात्र, योग्य तंत्रज्ञान अनुभव अधिक चांगला बनवू शकते.
रवी किशन, श्रेया कालरा आणि सूफी मोतीवाला यांच्या माध्यमातून आम्ही ही संकल्पना वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मांडत आहोत. त्याचबरोबर, ऑडिओ, होम एंटरटेनमेंट, स्मार्टवॉच आणि पॉवर बँक यांसह आमच्या विस्तृत उत्पादन श्रेणीची ओळखही या मोहिमेतून करून दिली जात आहे.”
या मोहिमेतील उत्पादनांच्या श्रेणीत वैयक्तिक ऑडिओअंतर्गत रॉकरझ ६५० प्रो, एअरडॉप्स प्राइम ८००डी, निर्वाणा झेनिथ प्रो आणि निर्वाणा यूटोपिया २ एएनसी यांसारखी आधुनिक उत्पादने समाविष्ट आहेत, ज्यामध्ये ॲक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन आणि स्पेशियल ऑडिओ ही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
होम एंटरटेनमेंट श्रेणीत अवांते प्राइम एक्स, अवांते प्राइम ५०००डीए साउंडबार आणि पार्टीपाल ६५० हे पर्याय उपलब्ध आहेत, जे चित्रपट व कौटुंबिक कार्यक्रमांचा आनंद द्विगुणीत करतात. याशिवाय, क्रोम सीरिज (आयरिस, आयव्हरी, ईऑन, होरायझन), अल्टिमा वोग २, स्टॉर्म कॉल ४ आणि सेलर नॅव्ह या स्मार्टवॉचेससह प्रवास व खरेदी दरम्यान चार्जिंगच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एपेक्स पॉवर बँक सीरिज (पीबी४००, पीबी ४००प्रो, पीबी ४४५, पीबी ३३२) सादर करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत बोटच्या या सर्व उत्पादनांवर कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळासह फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर ८० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे.