BSNL Recharge Plan: 2.5GB डेटा अन् अनलिमिटेड कॉलिंग... सरकारी कंपनी घेऊन आली नवा स्वस्त रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या किंमत
बीएसएनएलने लाँच केलेल्या नव्या रिचार्ज प्लॅनची किंमत केवळ 225 रुपये आहे. एकीकडे देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्या महागडे रिचार्ज प्लॅन लाँच करत आहेत. तर दुसरीकडे बीएसएनएल अजूनही त्यांच्या यूजर्ससाठी नवीन – नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना 30 दिवसांची म्हणजेच संपूर्ण एका महिन्याची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना दररोज 2.5GB हाय स्पीड डेटा देखील मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 75GB डेटा मिळणार आहे. डेली डेटा लिमीट संपल्यानंतर इंटरनेटची स्पीड कमी होणार आहे. याशिवाय, या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा देखील ऑफर केली जात आहे.
Apple ने अचानक का बंद केले लेदर iPhone Cases? काय आहे कारण? वाचून तुम्हीही व्हाल हैराण
तसेच, बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 100 मोफत एसएमएस ऑफर केले जातात. ज्यामुळे कॉलिंग आणि मेसेजिंग दोन्ही पावरफुल बनते. ऑनलाईन क्लास, सोशल मीडिया, व्हिडीओ स्ट्रीमिंग किंवा वर्क फ्रॉम होम सारख्या कामांसाठी जास्त डेटाची गरज असते. अशावेळी कंपनीने लाँच केलेला हा नवीन प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
या प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज 2.5GB डेटा ऑफर केला जाणार आहे. त्यामुळे ज्या यूजर्सना जास्त इंटरनेट डेटाची आवश्यकता असते, अशा यूजर्ससाठी हा प्लॅन बेस्ट ठरणार आहे. जर तुमच्या परिसरात बीएसएनएल चांगली सर्विस ऑफर करत असेल तर तुम्ही हा प्लॅन खरेदी करण्याचा विचार करू शकता.
कंपनीने त्यांच्या नव्या रिचार्ज प्लॅनबद्दल एक्सवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. पोस्टमध्ये कंपनीने म्हटलं आहे की, खरं सांगायचं तर… तुमच्या स्क्रीन टाइमला पुरस्कार मिळायलाच हवा. सतत स्क्रोलिंग करण्यापासून ते न थांबता चॅटिंग, स्ट्रीमिंग आणि यांसारख्या इतर सर्व गोष्टींमुळे तुमचा फोन कधीच थांबत नाही. मग अशा रिचार्जवर का समाधान मानायचं, जो या वेगाशी जुळवून घेऊ शकत नाही? BSNL ₹225/- प्लॅन #BReX द्वारे स्मार्ट रिचार्ज करा.
Let’s be honest… your screen time deserves an award. From endless scrolling to non-stop chatting, streaming and everything in between your phone never takes a break. So why settle for a recharge that can’t keep up? BSNL ₹225/- Plan Recharge smart via #BReX
👉… pic.twitter.com/MJTGWjErPO — BSNL India (@BSNLCorporate) July 3, 2026






