BSNL शिवभक्तांसाठी घेऊन आलाय एक खास गिफ्ट! केवळ 196 रुपयांत मिळणार अमरनाथ यात्रा SIM
तुम्ही देखील अमरनाथ यात्रेला जाण्याचा विचार करत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी असलेल्या BSNL ने अमरनाथ यात्रेला जाणाऱ्यांसाठी एक खास सिम कार्ड लाँच केला आहे. या सिम कार्डची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे. खरं तर, सरकारी टेलीकॉम कंपनीने अमरनाथला जाणाऱ्या श्रध्दाळू लोकांसाठी एक खास सिम कार्ड लाँच केलं आहे. या सिमला कंपनीने यात्रा सिम असं नाव दिलं आहे. या सिम कार्डची किंमत केवळ 196 रुपये आहे आणि यामध्ये 15 दिवसांची व्हॅलिडिटी देण्यात आली आहे.
कंपनीने असा दावा केलाआहे की, हे सिम पूर्ण यात्रेदरम्यान उत्तम 4G कनेक्टिविटी ऑफर करणार आहे. ज्यामुळे यात्रेला जाणाऱ्या श्रध्दाळू लोकांना संपूर्ण प्रवासात उत्तम 4G कनेक्टिविटीचा वापर करता येईल आणि ते चांगल्या नेटवर्कने जोडले जाऊ शकतील. याशिवाय त्यांना नेटवर्कसंबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये, म्हणून कंपनीने हा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट देखील शेअर केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
खरंतर, बीएसएनएलने अमरनाथ यात्रेचा कठीण मार्ग लक्षात घेऊन हे खास सिम डिझाइन केले आहे. यात्रेदरम्यान, असे आढळून आले आहे की अनेक वेळा इतर कंपन्यांचे नेटवर्क योग्य प्रकारे काम करत नाही, ज्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. याशिवाय नेटवर्कच्या समस्येमुळे यात्री त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकत नाहीत. या समस्येवर मात करण्यासाठी, BSNL ने स्वदेशी 4G तंत्रज्ञानाने आपले नेटवर्क अपग्रेड केले आहे, ज्यामुळे आता सर्व BSNL युजर्सना यात्रेच्या मार्गावर चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.
श्रद्धा से जुड़ा हर कदम, अब BSNL के संग।
बीएसएनएल यात्रा सिम – 15 दिनों के लिए सिर्फ ₹196 में, प्रमुख शिविर स्थलों पर उपलब्ध है।
आस्था के साथ चलें, बीएसएनएल से जुड़े रहें।
Recharge Now : https://t.co/yDeFrwKDl1#BSNLYatraSIM #SpiritualJourney #BSNL #AmarnathYatra2025 pic.twitter.com/tlqkLsTioU
— BSNL India (@BSNLCorporate) July 6, 2025
कंपनीने घेतलेला हा निर्णय इतर टेलिकॉम कंपन्यासाठी डोकेदुखी तर ठरणार नाही ना? कारण लाखोंच्या संख्येने भाविक अमरनाथ यात्रेला जातात. अशा सर्व भाविकांसाठी कंपनीने ही खास ऑफर सुरु केली आहे. त्यामुळे BSNL च्या युजर्स संख्येत वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
BSNL द्वारे आयोजित कॅम्पमध्ये या स्पेशल सिमकार्डची खरेदी केली जाऊ शकते. लक्ष्मणपूर, भगवती नगर, चंदरकोट, पहलगाम आणि बालतालसह अनेक ठिकाणी हे कॅम्प उभारण्यात आले आहेत. प्रवासी या ठिकाणी जाऊन फक्त 196 रुपयांमध्ये हे सिम खरेदी करू शकतात आणि 15 दिवस कोणत्याही व्यत्ययाशिवाय कनेक्ट राहू शकतात.
शॉपिंगसाठी तयार आहात ना! या दिवशी सुरु होतोय Amazon प्राइम डे सेल, Top Deals चा झाला खुलासा
BSNL ने 2021 मध्येही असाच एक जबरदस्त प्लॅन लाँच केला होता, ज्यामध्ये अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरूंना 197 रुपयांमध्ये अशीच सुविधा देण्यात आली होती. बीएसएनएलचे म्हणणे आहे की नुकताच जाहीर झालेला प्लॅन पूर्णपणे वेगळा आहे आणि त्यात अपग्रेडेड नेटवर्क तंत्रज्ञान आणि चांगले कव्हरेज आहे. BSNL चा हा निर्णय केवळ एक मोबाइल प्लॅन नाही तर यात्रेकरूंना त्यांच्या कुटुंबियांशी जोडून ठेवण्याचा एक प्रयत्न आहे.