दिल्ली स्फोट प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; हमासच्या मॉड्यूलनुसार रॉकेटहल्ल्याचा होता कट
दिल्ली, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, हमासच्या मॉड्यूलनुसार ड्रोन आणि लहान रॉकेट बनवून भारतात मोठा हल्ला करण्याचा कट होता, अशी खळबळजनक माहिती दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याने चौकशी दरम्यान दिली आहे. यामुळे तपास यंत्रणा हादरून गेल्या आहेत. दानिश हा ड्रोन बॉम्ब बनवण्यात तज्ज्ञ आहे. ड्रोनवर कॅमेरा आणि बॅटरी असलेला एक बॉम्ब बसवण्याची तयारी सुरू होती, परंतु त्याला मूर्त रूप देण्यापूर्वीच हा कट उधळला गेला.
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा तपास करणान्या एनआयएला मोठे यश मिळाले आहे. एनआयएने उमरचा आणखी एक सहकारी जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला अटक केली आहे. दानिशला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली, दानिश हा जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंडचा रहिवासी आहे आणि त्याने दहशतवादी उमर उन नबीसह हल्ला करण्याचा कट रचला होता. एनआयएचे पथक जसीर बिलाल वाणीसह दिल्लीत दाखल झाले आहे. त्याला मंगळवारी सकाळी पटियाला हाऊस येथील विशेष एन्नआयए न्यायालयात हजर केले जाईल.
सुरक्षित स्थळावरून गर्दीच्या ठिकाणी ड्रोन उडवून लक्ष्यत स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. हमास आणि इतर संघटनांनी ड्रोनच्या माध्यमातून केलेल्या हल्ल्याच्या पद्धतीचा वापर केला जाणार होता. सीरिया, गाझा आणि अफगाणिस्तानसारख्या भागात असे हल्ले करण्यात आले आहेत. त्या मॉड्यूलची नक्कल करून भारतात तसे हल्ले प्रयत्न केला जात होता. त्यानुसार अमोनिया नायट्रेट आणि इतर खतरनाक स्फोटकांचा त्यांनी गोळा केला होता. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.
१० नोव्हेंबर रोजी दिल्लीत झालेल्या कार बॉम्ब स्फोटातील आणखी दोन जखमीचा मृत्यू झाला, त्यामुळे मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे. लुकमान (५०) आणि विनय पाठक (५०) अशी त्यांची नावे आहे. गेल्या गुरुवारी बिलाल नावाच्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, ज्यामुळे मृतांची संख्या १३ झाली होती.
दहशतवादी उमरचा दिल्ली बॉम्बस्फोटपूर्वीचा Video Viral
दिल्लीतील लाल किल्ला परिसरामध्ये 10 नोव्हेंबर रोजी भीषण बॉम्बस्फोट (Delhi Blast) झाला. या घटनेमध्ये 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 24 जण गंभीर जखमी झाले आहेत. या बॉम्बस्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये डॉक्टरी पेक्षा असलेल्या दहशतवाद्यांची नावे समोर आली आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी आणि जम्मू-काश्मीरचा (Jammu and Kashmir) रहिवासी असलेला दहशतवादी डॉ. उमर हा या हल्ल्लामध्ये गाडी चालवत असल्याचे सिद्ध झाले आहे. दरम्यान, डॉ. उमर याचा दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
लाल किल्ला परिसरामधील दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. दहशतवादी डॉ. उमर उन नबी याने हा आत्मघाती हल्ला केला. गाडीमध्ये सापडलेल्या त्याच्या पायाचा डीएनए देखील मॅच झाला आहे. यामुळे हा हल्ला त्यानेच घडवून आणला असल्याचे सिद्ध झाले आहे. दहशतवादी डॉ. उमर उन नबी याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. यावरुन त्याचे दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. दहशतवादी हल्ल्यापूर्वी डॉ. उमर उन नबी याचा व्हिडिओ समोर आला. यात उमर हा थेट सुसाईड बॉम्बिंगचे (आत्मघाती स्फोट) समर्थन करताना दिसत आहे.






