Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स

मुंबई, ठाणे, पालघर आणि घाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. या संकटकाळात मध्य रेल्वेच्या अधिकृत 'X' खात्याने वेळेवर आणि अचूक माहिती दिल्यामुळे अवघ्या 24 तासांत 12 हजार नव्या फॉलोअर्सची भर पडली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2026 | 02:24 PM
मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या 'X' खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या 'X' खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर एका दिवसात 12 हजार नवे फॉलोअर्स वाढले.
  • रेल्वे प्रशासनाने सातत्याने सेवा, विलंब, रद्द गाड्या आणि घाट विभागातील परिस्थितीबाबत अधिकृत अपडेट्स दिल्याने प्रवाशांचा विश्वास वाढला.
  • अधिकृत सोशल मीडिया अपडेट्समुळे अफवांना आळा बसला आणि लाखो प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करणे सोपे झाले.
गेल्या तीन दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर आणि घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पश्चिम रेल्वेवरील वसई-विरार मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली, तर मध्य रेल्वेच्या लोणावळा-कर्जत घाट विभागात दरडी कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद झाली.

Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश

या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या अधिकृत माहितीसाठी लाखो प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) खात्याकडे धाव घेतली. परिणामी, अवघ्या एका दिवसात या खात्यावर तब्बल १२ हजार नव्या फॉलोअर्सची भर पडल्याची नोंद झाली आहे. सोमवारी भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. आठवड्याचा पहिलाच कामकाजाचा दिवस असल्याने सकाळपासूनच लाखो प्रवासी घराबाहेर पडले होते, मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या अनेक सेवांवर परिणाम झाला.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

पश्चिम रेल्वेवर वसई रोड-विरारदरम्यान लोकल सेवा बंद करण्यात आली, तर मध्य रेल्वेच्या घाट विभागातील दरडींमुळे मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या, काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या.

संकटकाळात महत्त्वाचे साधन

रेल्वे स्थानकांवरही अनेक प्रवासी मोबाईलवर ‘एक्स’ खाते पाहून पुढील प्रवासाचे नियोजन करताना दिसून आले. काहींनी घरातून निघण्यापूर्वीच रेल्वेची स्थिती तपासली, तर अनेकांनी पर्यायी वाहतुकीचा निर्णयही याच माहितीच्या आधारे घेतला. त्यामुळे संकटकाळात सोशल मीडियावरील अधिकृत माहिती प्रवाशांसाठी महत्त्वाचे साधन ठरली.

अफवांना बसला आळा

मध्य रेल्वेने दिवसभरात अनेक वेळा प्रवाशांना उद्देशून सूचना, सेवा अद्ययावत माहिती आणि सुरक्षाविषयक संदेश प्रसिद्ध केले. रेल्वे प्रशासनाच्या या तत्पर माहिती व्यवस्थापनामुळे अफवांना आळा बसण्यास मदत झाली. तसेच अधिकृत माहितीवर प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ झाला.

फॉलोअर्समध्ये झपाट्याने वाढ

याचाच परिणाम म्हणून मध्य रेल्वेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर एका दिवसात तब्बल १२ हजार नव्या फॉलोअर्सची भर पडली, आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर कसा होऊ शकतो, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.

Vivo चा डबल धमाका! दोन नव्या स्मार्टफोनसह सर्वांनाच केलं चकित; जाणून घ्या प्रिमियम फीचर्स आणि किंमत

अचूक माहितीसाठी घेतला सोशल मीडियाचा आधार

यामुळे गाडी नेमकी कुठे आहे, किती उशिराने धावत आहे, कोणती गाडी रद्द झाली आहे, पर्यायी व्यवस्था काय आहे, याची अचूक माहिती मिळविण्यासाठी प्रवाशांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. मध्य रेल्वेच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावरून लोकल आणि मेल-एक्स्प्रेस गाड्याबाबत सातत्याने अद्ययावत माहिती, सेवा बदल, विलंब, रद्द झालेल्या गाड्या, घाट विभागातील परिस्थिती तसेच दुरुस्तीच्या कामाची माहिती प्रसिद्ध करण्यात येत होती. त्यामुळे प्रवाशांनी या खात्यावर मोठ्या प्रमाणात विश्वास व्यक्त केला.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Central railways x account gains 12000 followers in a day amid mumbai rain travel disruptions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • central railway
  • Tech News
  • X app

संबंधित बातम्या

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स
1

Huawei चा धमाका! जगातील पहिला वाईड-स्क्रीन हँडसेट लाँच… टॅब्लेटसारखा डिस्प्ले अन् असे आहेत पावरफुल फीचर्स

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल
2

Gen Z साठी मोठी बातमी! भारतात Starlinkची पुन्हा एन्ट्री? एलन मस्कांची नवी चाल

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
3

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा
4

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.