Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची लाँचिंग किंमत 25,999 रुपये आहे. मात्र कंपनी ऑफरअंतर्गत मर्यादित काळासाठी हा स्मार्टफोन 23999 रुपयांना खरेदी करण्याची संधी देत आहे. ग्राहक पँटोन नॉटिकल ब्लू, पँटोन फ्युशिया रेड आणि पँटोन इम्पेनिट्रेबल या तीन रंगांच्या पर्यायांत स्मार्टफोन खरेदी करू शकतात. स्मार्टफोनची विक्री 13 जुलैपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडियाची वेबसाईट आणि प्रमुखे रिटेल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य: Motorola)
कंपनीने लाँच केलेल्या नव्या मोटोरोलो स्मार्टफोनमध्ये 6.72-इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, पीक ब्राइटनेस 1,050 निट्स, डिस्प्ले कलर बूस्ट टेक्नोलॉजी आणि वॉटर टच सपोर्ट आहे. यासोबतच, या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये स्टीरियो स्पीकरसह डॉल्बी ॲटमॉस आणि हाय-रेस ऑडिओ सपोर्ट देण्यात आला आहे.
मोटोरोलाचा हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट, 8GB चे एलपीडीडीआरएक्स रॅम आणि 24GB पर्यंत रॅम बूस्टने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन 128GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. यूजर्स माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकतात.
नव्या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा सोनी LYTIA 600 प्रायमरी कॅमेरा लेंस देण्यात आले आहे. यासोबतच या फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 7i ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन एसजीएस-प्रमाणित एमआयएल-एसटीडी-810एच ड्यूरेबिलिटी, IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईड 16 वर चालतो.
मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 30W टर्बोपॉवर चार्जिंग आणि 6W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.






