फ्रीमध्ये तुमचं आवडतं Character आणि अनेक नवीन रिवॉर्ड मिळवण्याची संधी, आत्ताच वापरा Free Fire MAX मधील हे Redeem Codes
ऑनलाईन मोबाईल गेम फ्री फायर मॅक्स रिडीम कोड हे मोफत रिवॉर्ड मिळवण्याचा एक चांगला मार्ग आहे. फ्री फायरमध्ये जे रिवॉर्ड मिळवण्यासाठी तुम्हाला डायमंड खर्च करावे लागतात, असे रिवॉर्ड्स रिडीम कोडमुळे फ्रीमध्ये मिळतात. रिडीम कोडमुळे प्लेअर्सना कॅरेक्टर्ससारख्या वस्तू मिळवू शकतात. लोकप्रिय बॅटल रॉयल गेमचा डेव्हलपर गॅरेना वेळोवेळी रिडीम कोड जारी करत राहतो. प्रत्येक प्रदेशासाठी वेगळा कोड असतो आणि तो संख्या आणि अक्षरांनी बनलेला असतो. हे वेळेत वापरावे लागतील, कारण काही काळानंतर ते आपोआप कालबाह्य होतात.
प्लेअर्स रिडीम कोडद्वारे डायमंड तसेच स्कीन मिळवू शकतात. स्किन्स प्लेअर्ससाठी खेळ अधिक मनोरंजक बनवतातच, शिवाय त्यांना जिंकण्यास देखील मदत करतात. तर, डायमंड खऱ्या पैशाने खरेदी केले जातात आणि रिडीम कोडमध्ये ते मोफत उपलब्ध आहेत. प्लेअर्स रिडीम कोडमध्ये डायमंड मिळवू शकतात आणि इतर कॉस्मेटिक वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिडीम कोडद्वारे रिवॉर्ड मिळविण्यासाठी, खेळाडूंना डायमंड खर्च करावे लागत नाहीत किंवा कोणतेही काम करावे लागत नाही. गेममध्ये येणाऱ्या इव्हेंटमधून बक्षिसे मिळविण्यासाठी, खेळाडूंना विशिष्ट कार्ये पूर्ण करावी लागतात. म्हणूनच खेळाडू नेहमीच रिडीम कोडची वाट पाहतात. आज 5 एप्रिल 2025 साठी Garena Free Fire MAX रिडीम कोड येथे आहेत.
फ्री फायर मॅक्स डेली स्पेशल अंतर्गत, प्लेअर्सना अनेक कॉस्मेटिक वस्तूंवर 50 टक्के सूट मिळते. आज म्हणजेच 5 एप्रिल 2025 रोजी, गेमर्सना डिफियर अँथम बंडल, शफलिंग इमोट, जेनेसिस सारख्या अनेक वस्तूंवर सूट मिळत आहे. गेमर्ससाठी ही ऑफर फक्त आजसाठी आहे. यानंतर ऑफर बदलेल. फ्री फायर मॅक्स डेली स्पेशलमध्ये आज, प्लेअर्स 50 टक्के सवलतीत डिफियर अँथम बंडल, शफलिंग इमोट, जेनेसिस, बीपी एस10 टोकन क्रेट, स्केटर गर्ल (शूज), वेपन लूट क्रेट खरेदी करू शकतात. लक्षात ठेवा की दररोज वेगवेगळ्या वस्तूंवर सूट असते. या कारणास्तव, खेळाडूंकडे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी फक्त आजचा वेळ आहे.
शफलिंग इमोट आज 199 डायमंडऐवजी 99 डायमंडमध्ये उपलब्ध आहे. आज जेनेसिस 199 डायमंडऐवजी 99 डायमंडना खरेदी करता येईल. बीपी एस10 टोकन क्रेट आज 40 डायमंडऐवजी 20 डायमंडना खरेदी करता येईल. स्केटर गर्ल (शूज) आज 249 डायमंडऐवजी 124 डायमंडमध्ये उपलब्ध आहे. आज वेपन लूट क्रेट 40 ऐवजी 20 डायमंडना उपलब्ध आहे.